Shabdkosh

कविता आणि लेख यांच्या वाचनाची आणि लेखनाची आवड जोपासत असतानाच काही परिचित आणि काही अपरिचित, कठीण काही सोपे असे अनेक शब्द मला मित्र म्हणून भेतले. माझे "शब्दकोष " हे पेज म्हणजे हाच माझा सुंदर आणि जिवलग मित्र-परिवार. यात दिवसेंदिवस वृद्धी होत जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना .



राई - अरण्य 
वेळू -बांबू 
ओज - धमक , तेज 
पायस - दूध, तांदूळ व साखर यांपासून केलेली खीर, प्रसाद.
स्थाली - थाळी 
नृप - राजा 
उपमान - तुलना 
सान - लहान
  मही - पृथ्वी ( earth  )
 अभ्र - ढग (cloud )
 रसना - जीभ , जिव्हा (tongue)
 मंद्रा - ( Pleasant ,charming )
 अपरा - ( One who comes and goes )
 अन्वी -महालक्ष्मी ( goddess Lakshmi )
 अर्वा - ( Fresh ,Pleasant )
 वियोना - आकाश (sky )
 इहिता - (Desire , fighter )
 गेश्ना - गायक (singer )
 मिहीरा - सुर्य (sun )
 केओशा - (lovely )
 मुदिता -(glad )
 ओजल - (splendor , vision )
 रुजूल - (soft spoken )
दर्पण - आरसा (mirror )
 क्षीर - दूध (milk )
 रव - आवाज (sound )
 निर्झर - झरा , धबधबा ( waterfall )
 अंकित - सुस्पष्ट  (marked, inscribed)
 संगर - युद्ध (wor )
 नेमस्त - शाश्वत ,सारखा ,अनंत (eternal,moderate )
 लंघून - ओलांडून
 मैखाना - bar
 नजम(उर्दू) - star
 अपांग -  canthus
 अनाघ्रात - दुखापत न झालेला (uninjured) 
 अचपळ - जिवंत ,आनंदी ,चैतन्यशील (lively ) 
 स्वर्धुनी -(स्वर्‌ + धुनि) स्वर्गलोकीची नदी.
 शैशव - बाल्य
 स्वये - स्वत:
 राजस - सुंदर, रजोगुणी.
 सर्ग - अध्याय. 
 कवळिती -  कवटाळणे 
अभ्यंतर - अंतरात्मा.


































































 आर्या - श्रेष्ठ स्‍त्री.
 इक्ष्वाकु कुल - सूर्यवंश.
 कल्पतरू - कल्पवृक्ष, इंद्रलोकांतील काल्पनिक वृक्ष. इच्छित वस्तू देतो अशी समजूत आहे.
 नृशंस - क्रूर.
 प्रभा - तेज ,प्रकाश
 बहुशृत - अनेक विषयांची माहिती असलेली व्यक्‍ती.
 भार्या - पत्नी
 वाजी - अश्व, घोडा, हय 
शल्य - काटा (thorn )
अलका - girl with lovely hair , beauty 
उले - उलणे, उघडणे, आतल्या जोराने फाटणे.
स्‍निग्ध , वत्सल - प्रेमळ.
सल - टोचणी
वत्स - मूल.
अवभृत -  यज्ञवेळेस करावयचे स्‍नान.
इष्टी - यज्ञ.
ईप्‍सित - इष्टित, इच्छित.
ऋष्यशृंग  - एक ऋषि. यांच्या मस्तकावर ’ऋष्य’ जातीच्या मृगाचे शिंग होते.
कश्यप - एक ऋषि.
गुर्वाज्ञा - गुरुने दिलेली आज्ञा.
जाबालि -  एक नास्तिकवादी ऋषि.
नवनीत - लोणी 
मथणे - मंथन करणे, घुसळणे.
वसिष्ट - एक प्रख्यात ब्रह्मर्षि.
सांगता - पूर्णता
धूम - धूर 
काहूर - मनातील गोंधळ, बेचैनी.
कोंदण -  दागिन्यातील हिरे वगैरे भोवतीची घडण.
यति - संन्यासी 
दुंदुभि - नगारा, एक वाद्य.
अरि - शत्रू 
ऋक्ष - अस्वल.
कबंध - धड, मस्तकहीन शरीर.
कर्दम - चिखल 
कलेवर - शरीर 
ग्रीवा - मान 
चपला - वीज 
ताडणे - मारणे, प्रहार करणे.
दाशरथी - राम (दशरथाचा पुत्र).
प्लवग - वानर.
बलाक - बगळा 
रव - आवाज 
लांगूल -शेपटी 
शुंडा - सोंड 
शोणित - रक्त 
लंबकर्ण - गाढव  
लोकमान्य -(regressive )
प्रगत - विकसनशील (progressive )
 यति - संन्यासी
घर्म - घाम




 सौदामिनी - वीज
कावा - कारस्थान, लबाडी, ढोंग.
वानणे - वाखाणणे, वर्णन करणे.
गोरस -  दूध
नवनीत - लोणी.
पांवा - बासरी, वेणु.
कानन - अरण्य, जंगल.
बाहणे  - हाक मारणे, बोलावणे.
संचित - पूर्वजन्मीचे पापपुण्य.
कातर -कापरा, आर्त.
वर्म -  दोष.
निखालस - खात्री, निर्विवाद.
धोपट - सरळ
ओज - धमक, तेज
हिमायत - पाठबळ.
गूज - गुप्‍त गोष्ट, कानगोष्ट.
मधुमालती - एक फूल ( Rangoon creeper)
रिते - रिक्त ,रिकामे, पोकळ, सुने,निरर्थक (empty ) 
अनुराग -प्रेम ,प्रीती (love )
बंध -पाश (bond ) 
विमल - स्वच्छ, निर्मल, पवित्र, पांढरा, सुंदर.
त्वदीय - तुझे. 
विजन -  ओसाड, निर्जन.
सुधा - अमृत.
शलाका - काठी.
कारा - कारावास.
सुखेनैव - सहज. 
अंतराय - विघ्न , अडथळा 
विन्मुख - तोंड फिरवलेला 
बिंबणे - ठसणे , उतरणे 
कासया - कशासाठी  
कोरांटी - एक प्रकारचे काटेरी फुलझाड 
सटवाई , जोखाई -प्रारब्ध देवता
अरुण - तांबूस /पिंगट पहाट ,पहाटेचा तांबूस प्रकाश ,सूर्यसारथी 
 अनंगपणा - सकामता, देहबुद्धी. 
अश्वत्थ - पिंपळ.
जेवी - जसा, ज्याप्रमाणे.
निरंजन - निर्गुण ब्रह्म.






No comments:

Post a Comment

Blogs I follow :