Pages

Tuesday, February 10, 2015

भ्रमंती नव्या देशाची .…

भ्रमंती नव्या देशाची .…

( नव्या देशी जाताच तिथली भ्रमंती ही  प्रत्येकाची इच्छा असते . मग नकाशे ,विचारपूस करत निरनिराळ्या ठिकाणांची सैर केली जाते . नवे सर्वच खूप हवेहवेसे जरी असले तरी कुठेतरी आपले गावच मनात खोल कोरलेले असते )

एक उनाड दिवस , झाले अल्लड हे मन,
एक अनोखी भ्रमंती, नवा देश नवे लोक,

नव्या देशी कधी पावसाच्या धारांत उन्ह सांडतं ,
कधी थांबलेलं उन्ह हळूच आभाळ पांघरतं,

शोध नव्या दिशांचा घेऊन हातात नकाशे ,
ध्यास टिपून घेण्याचा जे जे अनोळखी दिसे ,

लांब नदीच्या प्रवाही नाव दाखवी नवे गाव ,
माथ्यावर रांग पुलांची आणि सुंदर सभोवताल ,

उंच मारून भरारी झेप घेता या अंबरी ,
सफर नव्या देशाची  दोन डोळ्यांच्या कवाडातुनि ,

मोठा राणीचा महाल देश नाही जरी विशाल ,
गोष्ट याची मोठी पाहता इतिहास-भूगोल ,

टिक-टिक घडयाळ ठरते इथूनच वेळ ,
आहे सर्व तिथे पण मिळत नाही इथल्या चौपाटीची भेळ.

- रुपाली ठोंबरे

2 comments: