Pages

Saturday, February 7, 2015

सुनामीचा मारा

सुनामीचा मारा

( कधी कधी सर्व बाबतीत पुढे गेलेला मानव निसर्गाच्या आगळ्या वेगळ्या खेळांसमोर अगदीच हतबल होऊन जातो. )

पाणावल्या पापण्या पाहुनि या पाण्याला
पाणी पाणी झाले सारे दोष द्यावे कोणाला ।।

समुद्राची महाकाया ज्यांची होती जीवनधारा
जलधिनेच तयांचा हिरावला आसरा
विसरून मित्रत्वाला शत्रू झाला हा किनारा
परी पाण्यालाच या कवटाळावे पर्याय नाही दुसरा ।।

सागरा तू आहेस मोठा
त्याहूनीही मोठ्या लाटा
धावल्या बेभान त्या अशा
हरवल्या साऱ्या वाटा ।।

जीव मुठी धरुनि दूरवर धावूनि
वाचले जे ते सारे भिजले या अश्रूंनी
जे न उरले त्यांना अश्रुंचीच श्रद्धांजली
का हा निसर्गखेळ खेळते ही नियती ।।

ऐकून हाहाकार हा शहारला देश सारा
मदतीचे वारे परी दिशाभूल झाले पहा
परी यत्न कर्रिति ग्रस्त सारे वेदनांना विसरून आता
मागतात दान एकच , नको पुन्हा हा सुनामीचा मारा ।।

 -  रुपाली ठोंबरे

No comments:

Post a Comment