Pages

Tuesday, March 31, 2015

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या स्वरांत
आजच्या सुदिनी जुळून आलेल्या या रेशीमगाठी

गेल्या कित्येक वर्षांच्या सुख-दुखांच्या उन्हाळा-पावसाळ्यांत
प्रती वर्षी नव्याने गुंफती हे नाते तुम्हा उभयतांसाठी

जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
झालेल्या त्या भेटी गाठी

सहवासातील गोड-कडू आठवणी
एकमेकांवरच्या विश्वासाची सावली

आयुष्यभर राहती संगती
लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात तुम्हा उभयतांसाठी


-रुपाली ठोंबरे 

इतर याच संदर्भातील कविता :

लग्नशुभेच्छा दादा-वाहिनीसाठी 

लग्नशुभेच्छा 

शुभेच्छा वाढदिवसाच्या 

शुभेच्छा जन्मदिवसाच्या 


Thursday, March 26, 2015

आज शोभतेया दारी लावून पिवळी हळदी ...


( लग्न म्हटले कि हळद आलीच. हळदीचा तो पिवळा रंग समारंभाला खरेच सोन्याचे रूप देतो . आणि अशा हळदीत नटलेली नवरी आनंदात हा सोहळा अगदी मन भरून अनुभवत असते .)



भाळी मुंडावळी ओळी
गाली मोतीयांच्या लडी
आली उन्ह पांघरून नवरी
मोडली आज पैठणीची पिवळी घडी ।।

भाव लाख सांगतात
डोळे लाजत काजळी
नाकी नथ अशी
जशी शोभे मोत्यांची पाकळी ।।

मुग्ध ओठांत त्या लाल
दडल्या किती गुजगोष्टी
ऐसे हासत लावण्य
बैसे चंदनाच्या पाटी ।।

प्रथम पाहिले होते हिला घरी पाळण्यामंदी
आज शोभतेया दारी लावून पिवळी हळदी
आई-बापास कळेलेच नाही
मोठी  झाली लेक अशी  कधी ।।

सोनचाफा हसतो केसांत
सांगतो गूज काय घडले या दिवसांत
त्याच्यासंगे झेललेल्या सरी पावसात
आज भर घालतात हिच्या सौंदर्यात ।।

गोऱ्या करांत चुडा पाचूचा खेळे मेंदीसंगे
मेंदीत दडले रंग-गंध जीवनाचे सारे
पिवळे झाले आज अंग अंग सारे
मनात वाहतात सौम्य सौख्याचे वारे ।।

                                             
                                        - रुपाली ठोंबरे


Wednesday, March 25, 2015

"आठवण".....हरवते मी तुझ्या सहवासात ।।

( "आठवण " ही प्रत्येकाच्या जीवनात असलेला अमुल्य भाग. जे भूतकाळात घडले किंवा जे दूर काही घडत असेल त्या सर्व चांगल्या-वाईट क्षणांची मालिकाच हृदयाच्या कप्प्यात उभी राहते  मग आपले वर्तमान त्या आठवणींच्या सानिध्यात तासान तास हरवून जाते. )


हळूच येते ती मनात
दूर घेवून जाई जुन्या बनात
कधी हसू , कधी रडू , भाव पालटते क्षणात ।।

काळ जुना आज नवा , भासतो तिच्या स्पर्शात
कधी नको तो कधी हवाहवा , गुंतते मन तिच्यात
दूर कुठेतरी, मागे कधीतरी, सांडलेले क्षण थांबते मी आज वेचत ।।

डोळ्यांत पाणी कधी ओठी वाऱ्याची गाणी , जीव झोके घेतो हृदय-कप्प्यात
भोवताली जग सारे, नाही माझे, वाटे मी अनोख्या दुनियेत
सखी तू माझी, "आठवण" राणी, हरवते मी तुझ्या सहवासात ।।

-  रुपाली ठोंबरे.

त्या नयनांच्या पाकळीत साठलेले भाव सारे...



त्या नयनांच्या पाकळीत साठलेले भाव सारे
दव बनुन तयांची चमक आणखी वाढवणारे ।
नाजूक काजळी रेघांत त्या, विश्वच व्यापणारे
स्वच्छंद वावरणाऱ्या बाहुलीत, दिसे बघणाऱ्याचे रूप खरे ।। 

- रुपाली ठोंबरे















Friday, March 20, 2015

Only for U....B'coz I love U

Only for U....B'coz I love U


( Its the same feeling may be everyone have in the journey from engagement and marriage)


My eagerness to meet u increases with every meeting
My heart skips a beat when I see u leaving

I see u, I feel u, and I think u in every little thing
Tell me dear, why now-a-days it’s happening?

While talking to u, don’t understand how time flies away
Don’t see anyone else around when u r with me on way

Wants to gift u all days’ n nights of my life whenever u say
Moments with u should comes forever is the only wish I pray

I feel am in heaven when u holds me in your arm
Your every touch makes me happy n warm

Life looks most beautiful then without any harm 
I feel so lucky to have u as my lucky charm

Even a moment feels like decades without u
Even in dreams it’s impossible to live without u

In your life’s every sad n happy moment, I will be there for you
Is the promise I wants to give u b'coz I LOVE U.

-Rupali Thombare

Thursday, March 19, 2015

पंखुड़ियाँ उसकी उड़कर गयी दूरतक....

( आज कभी पढ़ाईके लिए तो कभी काम के लिए बेटियाँ अपने घरसे दूर आती हैं । तब शायद वोह यही महसूस करती होगी )

एक दिनभी न ऐसे गुजरता है
कि याद तेरी नहीं आती है ।
पल-पल मुझे युँ सताती हैं
क्या करू मैं समझ न आता  हैं ।।

सपनोंका जैसे प्यारा घर अपना
याद दिलाता साथ बचपनका ।
उसकेबिना आज न कुछ लगे अच्छा
चाहें हो यहाँका माहौल सच्चा ॥

माँ के हाथोका कोमल स्पर्श
साथ दिया जिसने बरस बरस ।
आज पर मन गया है तरस
न जाने कब मिलेगी फिरसे वोह गोद ॥

बेटी नहीं मैं बेटा हूँ पापाका
मुझमेँही छुपा है ख्वाब उनके जीवनका ।
इसीलिए भेजा हैं दूर ये दिलका टुकड़ा
पर महसूस करे न जाने क्यों खुदको वोह अकेला ॥

राखीयोंके वोह प्यारे दिन
याद दिलाये भाइयों संग गुजरा बचपन ।
कभी लड़ाई कभी प्यार
आज तो बस्स उनका इंतजार ॥

ऐसा नहीं कि मैं हूँ अकेली यहाँ
साथ देने हैं सारी सहेलियाँ ।
सबकी एकजैसीही कहानियाँ
पर क्या करू जब दिलही है वहाँ ॥

मेरी खुशीमें तेरी ख़ुशी ये मैं जानू
इसीलिए कभी शिकायत न कर पाऊँ ।
कभी बहुत याद आ जाये तो क्या करू
आँखमें आंसू आ जाये न जाने क्यों ॥

ऊन बर्फीली पहाड़ियोंमें दूर
एक हमारा था प्यारासा फूल ।
पंखुड़ियाँ उसकी उड़कर गयी दूरतक
इच्छा हैं आके पास महके जीवनभर साथ-साथ  ॥


- रूपाली ठोंबरे 

Tuesday, March 17, 2015

या सुट्टीत नक्की जाऊया अशाच एका गावाला

( आपल्या लहानपणी आपल्याला जे सहज मिळाले ते कदाचित आजच्या मुलांसाठी स्वप्नच असेल. आजच्या गगनचुंबी इमारतीतील घरांमध्ये आता पूर्ण मोठ्या कुटुंबासाठी जागाच नसते. अशा वेळी आजची घरे लहान कि मन लहान होत चालले हि भावना आल्यावाचून राहत नाही . प्रत्येक सण  म्हणजे अगदी सामाजिक एकतेचे प्रतिक असायचा . गल्लीतला गणपती म्हणजे आपल्या घरातच मोठा उत्सव असे वाटायचे. दिवाळीला १ महिना अवकाश असल्या पासूनच घराघरांतून फराळांच्या तळणीचा घमघमाट असायचा . आता दिवाळी म्हणजे चायनीज दिवाबत्तीने घर उजळायचे, ठसे उमटवत ५ मिनिटांत एखादी रांगोळी उरकावावी , मॉलमध्ये लागलेल्या सेलमधुन मोठ्ठी खरेदी आणि फराळ म्हणून बाजारात मिळणारी मिठाई आहेच  . आणि शुभेच्छा म्हणाल तर अगदी शेकडो मिळतात फेसबुक ,व्होट्सअपवर पण दूर गावावरून फक्त आपल्यासाठी आलेलं पत्रं मात्र आज हरवलंय. स्पर्धा ,संगणक ,मोबाईल,इंटरनेटच्या या जगात आज  मुलांचं तर खरं जीवनच हरवलंय. संध्याकाळी देवापुढे 'शुभं करोति' म्हणणारा चिंटू आता क्वचितच पाहायला मिळेल. सुट्टी म्हणजे नेमके काय हे कदाचित त्यांना आपण कळूनच देत नाहीत.आपल्या लहानपणी मिळून आणलेल्या खाऊच्या चवथ्या भागातही जे सुख मिळायचे ते त्यांना अख्ख्या पिझ्झातुनही मिळत असेल का ? मोठ्या कुटुंबात वाढलेली तनया आज आजी-आजोबांच्या प्रेमालाच काय तर आजच्या धकाधकीच्या जीवनात चिमुकलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सतत बाहेर असलेल्या आई-वडिलांच्या प्रेमालाही पारखी झाली आहे. आणि मग तेव्हा भरपूर सुख सोयी असून सुद्धा असले एखादे स्वप्नं हळूच त्या चिमुकल्याच्या गाढ झोपेत डोकावून जाते . )


आई , मला काल पडलं एक स्वप्न ।
गेलो मी कुठेतरी, जिथं नव्हतं कोणी आपलं ।।

ओळख नाही तरी सांगतो, झाले नाहीत हाल ।
खुप मज्जा केली मी, तिथं आहे सर्व छान छान ।।

तिथं नव्हतं इथल्यासारखं इमारतीचं जाळं ।
जो-तो तिथं म्हणतो घरच माझी चाळ ।।

एवढ्याशा चौकोनात राहतात, आजी आजोबा आणि  भावंडही  दोन ।
कोणी नाही ,करमत नाही ,एकटा म्हणून कोणी करत नाही फोन ।।

तिथल्या मुलांना माहितच नाही मोबाईलवरचा गेम ।
पण लगोरी ,गोटया खेळताना चुकत नाही त्यांचा नेम ।।

भली मोठ्ठी असते गं आई त्यांची उन्हाळ्याची सुट्टी ।
नाही तेव्हा क्लासेस , असते ती फक्त मज्जा करण्यासाठी   ।।

पिझ्झा -नुडल्सची चव कदाचित माहित नसेल कुणाला।
पण  "वदनी कवळ घेता" म्हणत घेतलेला घास मला आवडला  ।।

दिवाळी असो वा होळी साजरी करतात सर्वच एकत्र ।
आता का नाही येत शुभेच्छेसाठी तसे एखादे पत्र ।।

गाव कोणते ते नाव मला नाही ठाऊक ।
पण तिथल्या आपुलकीने झालो मी पुरता भावुक  ।।

आई , अगदी खरं खरं सांगतो मी तुला ।
खूपच छान आहे तिथं, जायचंय मला पुन्हा ।।

तुला पण आवडेल नक्की ,खात्री आहे मला ।
या सुट्टीत नक्की जाऊया अशाच  एका गावाला ।।

- रुपाली ठोंबरे

Tuesday, March 10, 2015

हेमांगीच्या स्पर्शात निखिल झालेली तू माझीच सावली … माझी निर्वी ।।

( एका मैत्रिणीच्या सोनुलीसाठी लिहिलेली एक पाळणारुपी कविता )

मऊ-मऊ बिछान्यावरी
पहुडलेली इवली परी
पाहता ही निर्वी ।

वाटे झाली सारी
स्वप्ने आता पुरी
पाहिलेली आम्ही पूर्वी ।।

पाळणा छान सोनेरी
त्याला किनार रुपेरी
सजला पहा साऱ्या फुलांनी ।

झेंडू-गुलाबाच्या पाकळ्यांनी
मोगऱ्याच्या सुगंधी गजऱ्यानी
हालविते त्याला निशिगंधाची शुभ्र दोरी ।।

मधातल्या बोटावानी गोड, हसरी-गोजिरी
आली अशी तू या घरी
पुससि सारे कोण ही पाहुणी गोरी ।

पाहण्यास तिला गर्दी आली भारी
घेण्या गं तिला आतुरली सारी
नजर न लागो दृष्ट काढा गं सोनुलीची ।।

आणत या घरा दिवाळी
आली का तू परत सीतामाई ।
तुला पाहता म्हणे आजी
लक्ष्मी आलिया गं दारी ।।

रुक्मिणी का तू कुठे तुझी कान्हाई
कि आहे तू ज्ञानोबाची मुक्ताई ।
घर झाले आज गोकुळ
आहे का तू राधा कृष्णाची ।।

सौंदर्याचे रूप तुझ्या ठायी
घेवून आली का तू विद्येची शिदोरी ।
सर्व संकट निवारी
तू आहे का महिषासुरमर्दिनी ।।

पाळण्यात जो-जो हालवीत वदे बाळाची आई ,

" भाग्य उजळले, आणि तू आली माझ्या घरी
  धन्य झाले मी आज, तुला मिळवून खरी ।

  अमुच्या प्रीतीच्या अंबरी,  नक्षत्र तू रुपेरी
  कुटुंबाच्या भव्य सागरी, मोती तू या शिंपली ।

  आम्ही दोघे राजा-राणी, तू आमची राजकुमारी
  संसाराच्या वेलीवरी उमललेली तू रातराणी ।

  आनंदले मी खूप आज, उन्हात सांडल्या सुखाच्या सरी
  स्वप्नातले जग सारे हातात पाहून उसळल्या आनंदलहरी ।

  जीवनाच्या पानांत शब्द अमुचे घेवून, जन्मलेली कादंबरी
   हेमांगीच्या स्पर्शात निखिल झालेली तू माझीच सावली … माझी निर्वी ।। "


- रुपाली

Thursday, March 5, 2015

देत शुभेच्छा होळीच्या रंगांत न्हाऊ द्या आज नात्यांना ।।


( होळी हा एक  महत्वाचा सण… रंग आणि पाणी यांचा मेळ घालून संगीताच्या तालात नाचत बेधुंद होऊन सर्वाना आनंदात एकत्र आणणारा….  )

पौर्णिमेचा चंद्र रंग रुपेरी उधळतो नभात ।
इंद्रधनुही अवतरले खाली उधळीत रंग विश्वात ।।

होळीच्या धगधगत्या अग्नीचा
आज स्पर्श व्हावा अनिष्टाना ।
जाळून सारे, नाश व्हावा अशुभांचा
शुभ पसरावे चोहीकडे उधळीत सुख आनंदात ।।

जग झाले गोकुळ आणि खेळ रंगला गोकुळात
कृष्ण राधा होऊन सारेच न्हातात नवरंगात ।
पाण्यात रंग आणि पाणी रंगांत
उधळीत सारे फेर धरतात तालात ।।

फुले रंगीत आज मुले रंगीत
घर-दार, रस्ते सारे गुलालाने गंधित ।
झाडे-वेली जग सारेच आहे धुंदीत
गात आनंदात बेधुंद रंग-गीत ।।

रंगली आज धरा आणि ती वियोना
होळी घेवून आली रंगांची नवी कल्पना ।
नवे रंग हे जीवनात मिसळून अर्थ द्या जन्मांना
 देत शुभेच्छा होळीच्या रंगांत न्हाऊ द्या आज नात्यांना ।।



- रुपाली ठोंबरे

भाग्यवान मी या जन्मी जाहले….



(लग्नाच्या गोड बंधनात बांधले गेल्यावर प्रत्येकाच्या मनात हा एकाच ध्यास असेल ….Dedicated to All who married recently )


जीवन -पथावरी भेट तुझी अन माझी खास
तत्क्षणापासून सौख्याचे वारे वाहती आसपास
भाग्यवान मी या जन्मी जाहले लाभुनी तुझा सहवास
प्रीतीचा हा दीप सदा तेजस्वी राहावा हाच मनी ध्यास ।।


- रुपाली ठोंबरे 

Monday, March 2, 2015

नीज माझ्या पाखरा....स्वप्नी भेटते मी तुला ।।


( एका आईने आपल्या चिमुकल्यासाठी म्हटलेली अंगाई) 



नीज माझ्या पाखरा
बघ, निजली सारी धरा
वाहतो हा गार वारा
बिलगून असा कुशीत ये जरा ||

पाहतो तुला चांद हासरा
बरसतो ताऱ्यांचा झरा
असे आकाश तुज पांघरा
घे अशी झोप शांत लेकरा
 
दिवस कधीचाच गेला सायंकाळी
रात्रही जाईल बघ आता मध्यरात्री
निजल्या पायवाटाही अन गाव सारा
परी का तू मांडतो अजून असा पसारा

तू मला अन मी तुला
एकमेकां असू आसरा
गात अंगाई झोप येई मला
तू ही जा झोपी , स्वप्नी भेटते मी तुला ।।


 - रुपाली ठोंबरे .