( लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा….पत्नीकडून आपल्या जीवनसाथीसाठी )
आज २ वर्षे जाहले ।
त्या अविस्मरणीय क्षणाला ।।
जेव्हा अंतरपाटाच्या पलीकडे तू ।
येणार होता कायमचा माझ्या जीवनात ।।
जेव्हा मंगलाष्टकांच्या घोषात ।
पुष्पमाला घातली मी तुझ्या गळ्यात ।।
जेव्हा आनंदी चेहऱ्यांच्या सहवासात ।
हळूच प्रविशले मी तुझ्या जीवनात ।।
जेव्हा त्या मंगलमयी वातावरणात ।
सप्तपदी चालले मी तुझिया सोबत ।।
जेव्हा तुझ्यावर ठेवून पूर्ण विश्वास ।
सोडला मी कायमचा माहेरचा सहवास ।।
माप ओलांडताना उखाण्यात घेतले मी तुझे नाव ।
आणि सुरु झाला खराखुरा भातुकलीचा हा डाव ।।
या २ वर्षांत प्रत्येकजण म्हणे "छान तुमची जोडी "।
छोट्या छोटया भांडणांतही जाणवते आता प्रेमाची गोडी ।।
आजही हा दिवस माझ्यासाठी आहे मोठा खास ।
जन्मभरी जगावा असाच तुझ्यासवे … हाच एक ध्यास ।।
- रुपाली ठोंबरे
No comments:
Post a Comment