Pages

Thursday, August 20, 2015

श्रद्धांजली


मालवलेली प्राणज्योत तुझी
धगमगते या हृदयी आजही

गर्द आठवणींच्या दाटीत जगी 
तू जिवंत अमुच्यात अजुनही,  

दीर्घ दुराव्यात हा जीव कधी
रांगतो दुःखात भाववेडा होवूनी

गर्दकाळ्या मन-मेघांतुनी
आसवांचा पाऊस बरसून येई

कोसळणाऱ्या पाऊसधारांतही
पाहुनी उमलणारी एक कळी

लागता चाहूल मग नव आशेची
तगमग क्षीण होई या मानसी

आठवांत जन्मे पुन्हा स्वप्ने पाहिलेली
स्वप्नपूर्तता हीच तुज मजतर्फे श्रद्धांजली

- रुपाली ठोंबरे

4 comments:

  1. नमस्ते रूपाली,

    मी संदीप बरोबर काम करायचो टेक महिंद्रा मधे. अजूनही ते दिवस आठवतात। संदीप अगदी शांत पणे काम करायचा। कोणाच्या देण्यात नाही तर कोणाच्या घेण्यात नाही। त्याला फोटोग्राफीचा ही फार नाद होत. फिल्म DSLR होता त्याच्या कड़े आणि फिल्म वर चांगले फोटो घेण्याचा आत्मविश्वास। आज सारख नाही की चांगला फोटो नहीं आला की चला करा delete.

    जर मी असे सांगितले की संदीप आणि मी अगदी चांगले मित्र होतो तर हे चुकीचे राहील। कारण की कंपनी सोडल्या नंतर संपर्क ही सुटला, आणि खरे मित्र नेहमी संपर्कात राहतात। मला संदीपची दुःखद बातमी कळाली होती दुसऱ्याच दिवशी। पण कोणा कड़े जावून सांगावे हे कळले नाही म्हणून फक्त मित्रांसोबत दुःख व्यक्त केले।

    एक वर्ष झाले, संदीपची आज आठवण आली, मी सहज त्याच्या फेसबुक प्रोफाइल ची भेट घेतली। तुझे फोटो पाहिले आणि ह्या ब्लॉग ची लिंक मिळाली। पाहता पाहता कविता वाचण्यात गूंग झालो। सुरुवातीला आनंद झाला पण आता हे वाचून अश्रू आवरत नाही।

    तुमच बाळ खूपच गोजिरवाण आहे.


    आभारी
    जयेश शर्मा

    ReplyDelete
  2. तुझ लिखाण अगदी उत्कृष्ट आहे. नेहमी लिहत रहा असच

    ReplyDelete