आज पावसाळ्यातला एक शनिवार...आणि आम्ही चौघे...कुठेतरी मजा करायला जायचे या विचाराने एकत्र आलेलो. या दिवसांत शक्यतो लोक एखादया धबधब्यावर जाणे पसंत करतात... पण आम्ही एक वेगळीच योजना आखली...Adlabs Imagica ला जाण्याची. सुरुवातीला खूप नकारात्मक विचार येऊन गेले पण शेवटी जायचेच असे ठरले आणि साधारण ११ च्या सुमारास आम्ही Imagica च्या समोर उभे होतो. अगदी दुरूनच Nitro या rideचे दर्शन घडले. मुळातच मी खूप भित्री... म्हणून माझ्या पोटात ते पाहूनच गोळा आला.पण मग फोटो काढण्याच्या नादात अचानक आलेली भीती काही अंशी क्षमली होती.पुढे तिकीट काढणे, बॅग्स स्कॅन करून योग्य ठिकाणी ठेवणे हे सर्व पार पडले आणि आम्ही imagica मध्ये प्रवेश केला.
Nitro सोडून इतरही बरेच करमणुकीचे वेगवेगळे आणि तितकेच भयानक प्रकार नजरेस पडले. कुठून सुरुवात करायची असा प्रश्न कोणालाही प्रथम क्षणी तिथे शिरल्यावर पडेल. पण आमच्यातला एक जण आधीही एकदा येऊन गेला होता म्हणून कशाला प्राधान्य द्यायचे हे काम आम्ही त्याच्यावरच सोपवले होते. अशा ठिकाणी उत्तम मार्गदर्शक सोबत असणे कधीही हिताचेच.
आणि त्यानुसार आम्ही सुरुवात केली ती 'Dare २ Drop' पासून.नावाच्या अर्थावरूनच आता आपल्या हिम्मतीची परीक्षा होणार असे वाटले. आम्ही पोहोचलो तेव्हा क्षणात गगनाला भिडलेले १६ जण नुकतेच वेगात जमिनीवर आले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद जाणवत होता. आम्ही चौघेही लगेच आसनाधीन झालो. खरे तर तेव्हा मला काहीच भीती जाणवली नाही. पण हळूहळू वर जाऊ लागलो तसे छातीत एकदम धस्स झाले. आतापर्यंत याबद्दल ऐकलेले इतरांचे अनुभव मनाच्या तारांगणात जमू लागले. आणि त्यानुसार सुन्न झालेल्या मनातही आता पुढच्याच क्षणी काय होईल या भावनेतून एक प्रकारची असह्य भीती घर करू लागली.आता काही होईल असे सारखे वाटत होते. पण छे ! एका उंचीवर जाऊन सर्व स्तब्ध झाले. छातीचे ठोके वाढू लागले तसे काही कळायच्या आत झर्र्कन आम्ही आकाशाच्या दिशेने खेचले गेलो ते थेट एकदम वरच्या टोकापर्यंत.वर जाताना जीवाचा आकांत करत बाहेर पडलेली किंचाळी त्या टोकाशी शांत झाली. अवतीभवतीचे सारे जग आता थिटे वाटत होते. क्षणभर थांबून सभोवताल पाहावा इतक्यात आम्ही जमिनीच्या दिशेने कोसळलोच पण मध्यापर्यंतच. पुन्हा तेच क्षण अनुभवले. अशाप्रकारे ३ वेळा क्रिया एकच पण प्रत्येक वेळी नव्याने अवकाशात फेकले जात होतो आणि उडत्या केसांसोबतच किंचाळण्याची उंची सुद्धा क्षणाक्षणाला गगनाला भिडत होती.पुन्हा एकदा शेवटचे मध्यावर आलो आणि वेगाने जमिनीवर पोहोचलो.
आणि त्या क्षणाला क्षणापुर्वीचे अगदी धूसर वाटू लागले पण त्याचे पडसाद एका वेगळ्याच हास्याचे रूप घेऊन चेहऱ्यावर उमटत होते.
आता आम्ही ' The Gold Rush' कडे आमचा मोर्चा वळवला. 'Dare to Drop' यशस्वीरीत्या पार पडले आणि स्वतःतली हिम्मत नव्याने अंगी संचारली.सुरुवातीला एखाद्या फलाटावरून ट्रेन सुटावी तशी ती सुरू झाली.एका ठराविक उंचीपर्यंत जसजशी ती चालत होती आसपासचे जग दूर जात असल्याचा भास होत होता. आणि त्यानंतर त्या उंचीवरून नागमोडी वळणे घेत ती अशी काही धावत सुटली कि पुढे काय होईल याचा अंदाज बांधण्याइतकेही भान उरले नाही. एका क्षणी बोगद्याला वेगाने भिडणारी ती आता आपण आपटलोच अशी शंका मनात निर्माण करून जाते. वेग आवरता घेत ती हळूहळू त्याच फलाटावर विसावली आणि एका अभूतपूर्व आनंदाची प्रचिती त्या क्षणी झाली. या फलाटाच्या आसपास आठवणीत राहतील असे फोटो काढण्यासाठी छान सोय होती. आम्ही खूप खुश होतो. त्यामागचे एक कारण म्हणजे कुठेच गर्दी नव्हती...एखादी भली मोठी रांग आम्ही दिवसभरात अनुभवलीच नव्हती. पावसाळ्यात येण्याचा आमचा निर्णय एकदम योग्य आहे असे वाटत होते.आणि पुढच्याच क्षणाला रिमझिम पाऊसधारा वेगाने कोसळू लागल्या.
आमचे पुढचे लक्ष्य होते 'Nitro-The India's biggest rollercoaster'. तिथे पोहोचलो आणि आतापर्यंत निवळलेली भीती तो पाऊस, ती नागमोडी-उलट-वेगवान वळणे पाहून पुन्हा मनाच्या गाभाऱ्यातून वर येऊ लागली. आणि झाले...हे माझ्याने शक्य नाही असे म्हणत मी माघार घेतली. माझ्या सोबतचे तिघे तो भयंकर अनुभव घेऊन आले. पुढे माझ्या सोबतीस असणाऱ्यांनी 'scream machine' सुद्धा अनुभवले.यामध्ये जमिनीपासून १४८ फूट उंचीवर १२० अंशाच्या कोनात झोके घेताना एक कधीही न विसरता येणारा आजीवन अनुभव येत असेल यात शंकाच नाही. पण त्यासाठी मी आधीपासूनच तयार नव्हते म्हणून राहून गेले असे काही वाटलेच नाही. उलट आलटून-पालटून scream machine आणि Nitro पाहून-पाहून काही न करताच मला बसल्या जागी सुद्धा गरगरल्यासारखे झाले होते . Imagica मधली सर्वात भयंकर पण अधिक आनंद देणारी Nitro मी करू शकले नाही ही खंत मात्र मनाला खूप सतावत होती.
त्यानंतर आम्ही 'अलीबाबा और चालीस चोर' या थिम पार्क मध्ये शिरलो. हा सुद्धा एक मजेदार अनुभव होता. एका गाडीत ४ जण, अशा गाडया एकामागून एक त्या गुहेत शिरल्या. चौघांकडे एकेक बंदूक आणि निशाणा मारायचा दडून बसलेल्या चोरांवर, त्यांच्या सोबत्यांवर, खजिन्यावर . प्रत्येकासमोर स्वतः कमावलेले गुण दिसत होते आणि त्यातूनच निर्माण व्हायची आपापसांत स्पर्धा. आणि स्पर्धा म्हटली म्हणजे रोमहर्षक अनुभव आलाच.
'The Curse Of Salimgarh' म्हणजे इमॅजिका मधला भूत बंगला असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. अंधारात रुळांवरून चालणाऱ्या गाडीमध्ये बसून एका भूतांच्या जगाची सैर म्हणजे एक वेगळाच अनुभव. ठिकठिकाणी रेंगाळणारे मानवी सांगाडे, अधूनमधून होणारे भयंकर आवाज,आसपास वावरणारी भूत-प्रेते, हडळी.घाबरणाऱ्यांना गाडीवर चढून अंगावर येऊन आणखी घाबरवणारे यमदूताच्या रूपातील खरी माणसे, शेवटी पायाखालची जमीन दुभंग होऊन कोसळलेले आम्ही ... बापरे ! आताही आठवले तरी अंगावर काटा उभा राहतो. त्या भयानक सफरीमध्ये अधूनमधून ती गाडी इतक्या वेळा थांबत गेली कि शेवट झाला तरी पुढे नवा धोका येईल या भीतीने अंग गारठून गेले होते. मग त्या सफरीतही एक मज्जा होती.
त्यानंतर आम्ही गेलो 'मि. इंडिया ' या थिम पार्क मध्ये. अनिल कपूर आणि श्री देवी यांचा गाजलेला चित्रपट - मि. इंडिया.त्यावर आधारित हा थिम पार्क. एक प्रकारची Virtual rideच आहे ही. आनंद ,किंचाळणे हे सर्व इथेही आपोआपच जुळून येते... एका ठिकाणी बसून सुद्धा. बराच वेळ गेल्यानंतर आता कुठे मी Nitro मध्ये बसण्यासाठी तयार झाले होते पण यातच तिची एक झलक पहिली आणि तिथेच ती योजना रद्द. इमॅजिकाला जाऊन मि. इंडियाला भेट न देणे अशक्यच.
माझा Nitro मध्ये बसण्याचा प्लॅन विस्कटला तसे सर्व अक्षरशः वैतागले. मलाही वाईट वाटत होतेच. त्यातच मी बोलून गेले की पुढची ride मी करेन. आमची पुढची कसोटी होती 'Deep Space POV '... एक दुसरी Nitroच.फरक इतकाच इथे वळणे,मार्ग काही काही दिसत नाही. अंधार असेल. नाही-हो करता करता मी तयार झाले. हळूहळू सुरु झालेल्या त्या spaceshipने अचानक वर उड्डाण घेतले आणि त्या वेगात ,त्या अंधारात काही काही समजत नव्हते. कधी वाटे खरेच अवकाशात पोहोचू पुढच्या क्षणाला. 'डोळे मिटल्याने आणखी चक्कर येते म्हणून डोळे मिटू नये ' या वारंवार उजळणी झालेल्या कानमंत्रामुळे मी उघडया डोळ्यांनी अंधारातले तारे पाहिले... तो अनुभवसुद्धा अवर्णनीयच... ८० सेकंदांत अनुभवलेला.
आता दुपारचे २ वाजायला आले आणि सर्वांच्या पोटात कावळे ओरडू लागले. आम्ही imagica capitalचे coupons आधीच घेतले असल्याने जेवायचे कुठे हा नवा प्रश्न तेव्हा उपस्थित झाला नाही. ४०० रुपयांचा बुफ्फेट लंच.... पण इतके प्रकार आणि इतके चविष्ट कि शेवटी वाटले .. पैसा वसूल. सूप ,पावभाजी ,भजी ,पुलाव ,विविध भाज्या , पाणीपुरी आणि शेवटी गुलाबजाम +आईस्क्रीम या सर्वांमुळे अगदी तृप्त झालो.
आता बरेच महत्त्वाचे आम्ही अनुभवले होते म्हणून जे समोर दिसेल ते करूया असा विचार करत आंम्ही 'the detective bow wow show' मध्ये शिरलो. असाच काहीतरी कॉमेडी शो असेल असे सुरुवातीला वाटले पण तो संपेपर्यंत आम्ही हसून हसून लोटपोट झालो होतो. जेवल्याने येणारी झोप जाऊन आता पुन्हा उत्साह संचारला होता.
त्याच उत्साहात 'Motion Box Theatre' मध्ये आम्ही मोठ्या आशेने शिरलो होतो. पण सकाळपासून तेच तेच करून आणि त्यात नाविन्य तसे पाहिल्यास काहीच नसल्याने आमचा मोठा भ्रमनिरास झाला. शो च्या सुरुवातीलाच समोरून पाणी येणार असे समजले आणि मी एका मोठया फवाऱ्याची वाट पाहत राहिले जेव्हा कि पाण्याचे फक्त काही तुषारच अंगावर जाणवले.
इमॅजिका मधले एक आणखी एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे 'I फॉर इंडिया'.येथे काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंतची सैर आभासी हेलिकॉप्टरमधून घडवून आणली जाते. ती अनुभवताना खरेच आपला देश किती सुंदर आहे आणि भारतातच राहून ही सर्व ठिकाणे न बघता आपण काय काय वाया घालवत आहोत याची खंत मनाला जाणवून जाते.आम्ही गेलो तेव्हा त्या दिवसातील तो शेवटचा शो होता आणि आम्ही त्यापासून वंचित राहण्यापासून थोडक्यात बचावलो.
'Cinema 360- Prince Of The Dark Waters' हे ही एक न सोडण्यासारखे आकर्षण आहे. दिवसभर थकून इथे जमिनीवर झोपून त्या स्वप्ननगरीत शिरण्याचा अनुभव एक रंजक अनुभव ठरला.

Very well summarized..
ReplyDelete