आता पुन्हा एकदा ,
आभाळाचा कागद लख्ख कोरा झाला आहे
काळ्या मेघांची शाई आता धूसर होते आहे
पावसा , असा दडलास तरी कुठे इतक्यातच ?
किती वाट पहाते आहे मी...आता ये ना !
रिमझिम ये ,कोसळत ये ,गडगडत ये, लखलखत ये
पण आता लवकर धावत ये, बरे का!
काळ्या काळ्या मेघांची शाई
आभाळभर सर्वत्र पसरू दे
त्यातून तुझे जलमोती शब्द होऊन
चोहीकडे आनंदाचा पाऊस बरसू दे
तुला माहित आहे ?
तुझ्या प्रत्येक लहरी सरीत
माझी एक ओळ दडलेली असते
आणि त्या प्रत्येक ओळीत
तुझ्यावरचे माझे निस्वार्थ प्रेम
या प्रेमाखातर...कोरड्या नदीसाठी
जीवनाचा अमृत सागर घेऊन ये
तुझ्यावरच्या माझ्या अधुऱ्या कवितेसाठी
भावनांच्या दाट शब्दमधुर रेघा घेऊन ये
एका पावसात जन्मलेली नवी पालवी
वाट पहाते आहे तुझी....नव्याने बहरण्यासाठी
तुझ्या स्वागतासाठी बघ ही कागदी होडी
ती ही आतुरली आहे...अलवार तरंगण्यासाठी
त्या पालवीसाठी...त्या होडीसाठी... माझ्या कवितेसाठी
आभाळ भरून खाली बरसत ये
किती वाट पाहायची रे आम्ही .... अरे ये ना !
रिमझिम ये ,कोसळत ये ,गडगडत ये, लखलखत ये
पण आता लवकर धावत-पळत पुन्हा परत ये !
- रुपाली ठोंबरे.
आभाळाचा कागद लख्ख कोरा झाला आहे
काळ्या मेघांची शाई आता धूसर होते आहे
पावसा , असा दडलास तरी कुठे इतक्यातच ?
किती वाट पहाते आहे मी...आता ये ना !
रिमझिम ये ,कोसळत ये ,गडगडत ये, लखलखत ये
पण आता लवकर धावत ये, बरे का!
काळ्या काळ्या मेघांची शाई
आभाळभर सर्वत्र पसरू दे
त्यातून तुझे जलमोती शब्द होऊन
चोहीकडे आनंदाचा पाऊस बरसू दे
तुला माहित आहे ?
तुझ्या प्रत्येक लहरी सरीत
माझी एक ओळ दडलेली असते
आणि त्या प्रत्येक ओळीत
तुझ्यावरचे माझे निस्वार्थ प्रेम
या प्रेमाखातर...कोरड्या नदीसाठी
जीवनाचा अमृत सागर घेऊन ये
तुझ्यावरच्या माझ्या अधुऱ्या कवितेसाठी
भावनांच्या दाट शब्दमधुर रेघा घेऊन ये
एका पावसात जन्मलेली नवी पालवी
वाट पहाते आहे तुझी....नव्याने बहरण्यासाठी
तुझ्या स्वागतासाठी बघ ही कागदी होडी
ती ही आतुरली आहे...अलवार तरंगण्यासाठी
त्या पालवीसाठी...त्या होडीसाठी... माझ्या कवितेसाठी
आभाळ भरून खाली बरसत ये
किती वाट पाहायची रे आम्ही .... अरे ये ना !
रिमझिम ये ,कोसळत ये ,गडगडत ये, लखलखत ये
पण आता लवकर धावत-पळत पुन्हा परत ये !
छायाचित्रसौजन्य : निखिल देशपांडे. |
- रुपाली ठोंबरे.
Very nice Rupali, awsome ...
ReplyDeleteसुंदर! असंच कोणी बतरी लिहिल, तेव्हाच तर मुलांना पावसाचा आनंद लुटणं समजेल. नाही तर घरात पडद्याआड वा उंच मनोर्यांतील Air-Conditioned बंद खोलीत बसून पावसाचा आनंद कसा लुटणार? त्यासाठी खाली पटांगणात भले छत्री घेऊन वा रेनकोट घालून कां असेना घराबाहेर पावसाच्या पाण्यात खेळायला खाली उतरतील आणि you get Bonus too with त्यांचे आईवडील, आजोबा-आजी, तरुण मुलेमुली, नविन जोडपीसुध्दा त्या मुलांच्या निमित्ताने पावसाची गम्माड-जम्मड पुन्हा अनुभवतील. कोणी चाळीशी-पन्नाशी-सत्तरीतील आपापल्या जोडीदारासह पुन्हा तरुण होतील, कोणी तरुणतरुणी पावसात एकमेकींच्या मिठीत (स्वप्नांत) गुंततील, तर काही तरुणाई पुन्हा लहान होऊन पावसात, चिखलात गेल्या मैदानात फुटबॅाल क्रिकेट, कबड्डी, खोखो खेळतील. आणि काही गरम गरम भजी बनवून सर्वांसोबत खातील. Big Bonus ना!
ReplyDeleteAwesome rupali...mast
ReplyDeleteTujhyasobat sagle vaat pahat ahet pavsachi
या प्रेमाखातर...कोरड्या नदीसाठी
ReplyDeleteजीवनाचा अमृत सागर घेऊन ये
तुझ्यावरच्या माझ्या अधुऱ्या कवितेसाठी
भावनांच्या दाट शब्दमधुर रेघा घेऊन ये
खुप सुंदर आहे ही वाक्यरचना, कमी शब्दात बऱ्याच भावना आणि अर्थ दडलेला आहे. फार छान रूपाली