पान पान भरल्या आभाळी
सावळी वर्ण पाखरे
स्वारस्याचे थवे आगळे
मनामनांचे आरसे
अक्षरमोत्यांची कृष्ण-पागोळी
बरसत विचारांचे ओघ सारे
रंगांचे कधी कवडसे सांडले
इंद्रधनू-चित्र बोलके मग उमटले
किती शब्द अन किती ओळी
ओंजळीत झेलले बोधक सारे
काय सुटले अन काय गवसले
हिशेब नाही खऱ्या सुखांचे
क्षोभ कधी तर कुठे प्रीत कोवळी
पर्व वाचले मनात साठले
भावनांचे कवन खोल दाटत गेले
वाचूनि वेचले...वेचूनि साचले
साचूनि मग घडले...
घडले मी,अन घडवत गेले...शब्दांच्या ओळी
शब्दांच्या ओळी...सकाळ-सायंकाळी
रोज नवी रांगोळी भरल्या मनाच्या द्वारी
रोज नवी रांगोळी भरल्या मनाच्या द्वारी
पान पान भरल्या आभाळी
सावळी वर्ण पाखरे
स्वारस्याचे थवे आगळे
मनामनांचे आरसे
No comments:
Post a Comment