कधीकधी अशी वेळ येते जेव्हा भोवतीचे सारे जग अंधारलेले वाटते... अनेकदा आपले जवळचेही साथ देत नाहीत असे वाटते. तेव्हा आपोआपच बाहेरच्या जगात आधार शोधला जातो... कुठेतरी कधीतरी तो सापडतोही... हा नवा आधार एखादी व्यक्ती असू शकते किंवा एखादी नवी संधी जी आपले जग बदलून टाकेल आणि त्या काळोख्या जगातून बाहेर काढेल. पण खूपदा जे ठरवतो ते होतेच किंवा मनासारखे मिळतेच असे नाही. या नव्या संधीसोबत बऱ्याचदा वेगळा अनुभवही येतो जो मनाला काही केल्या पटत नाही... कदाचित तो एखाद्या दुसऱ्या व्यक्तीनुसार बरोबरही असेल पण आपल्या बुद्धीला पटत नाही म्हणून तो वाईट अनुभव.आणि याचे एक वेगळेच जड ओझे मनावर निर्माण होते. आणि जेव्हा अशा वाईट अनुभवांची मालिका आयुष्यात दीर्घ होते तेव्हा जीव ज्याप्रकारे कासावीस होतो... तीच असते घुसमट.
अंधाऱ्या बंद खोलीत
अडकून पडलेला जीव
सारी कवाडे तोडून
बाहेर उडू पाहतोय
आपल्याच घराच्या भिंती कधी
आपलीच साथ देईनाश्या होतात
काळोखात चाचपडत जीव तेव्हा
क्षणाक्षणाला आत गुदमरत राहतो
पडद्याआडून मग कधीतरी दिसतो
एक किरण नव्या आशेचा,
आणि मग नकळतच
विश्वासाचा एक धागा
अवचित जुळून येतो भाग्याचा
त्या अंधाऱ्या खोलीत
एक काजवा चमकू पाहतो
विशाल सूर्याच्या प्रकाशात
नवस्वप्नांचे मनोरे रचू लागतो
अचानकच त्या किरणासोबत
धुळीचा लोट वाहू लागतो
मनाच्या गाभाऱ्यात न सांगता
एक काळा ढग गर्दी करू पाहतो
जीव गुदमरतो, आकांत करतो
पुन्हा एकदा होऊन एकाकी
त्या काळोखात तो चाचपडत राहतो
पुन्हा नवा किरण शोधण्यासाठी
प्रदूषणातही नव्याने जगू पाहतो
काळ लोटला जातो तसे
असे अनेक अनाहूत काळे ढग
आसपास - आतबाहेर चोहीकडे
पसारा करून जमत असतात
जीव आता पुरता अडकून जातो
गुदमरत राहतो , घुसमटत राहतो
आसवांच्या पावसात भिजत राहतो
पण तरी पुन्हा एकदा
अंधाऱ्या बंद खोलीत
अडकून पडलेला जीव
सारी कवाडे तोडून
बाहेर उडू पाहतोय
- रुपाली ठोंबरे.
अंधाऱ्या बंद खोलीत
अडकून पडलेला जीव
सारी कवाडे तोडून
बाहेर उडू पाहतोय
आपल्याच घराच्या भिंती कधी
आपलीच साथ देईनाश्या होतात
काळोखात चाचपडत जीव तेव्हा
क्षणाक्षणाला आत गुदमरत राहतो
पडद्याआडून मग कधीतरी दिसतो
एक किरण नव्या आशेचा,
आणि मग नकळतच
विश्वासाचा एक धागा
अवचित जुळून येतो भाग्याचा
त्या अंधाऱ्या खोलीत
एक काजवा चमकू पाहतो
विशाल सूर्याच्या प्रकाशात
नवस्वप्नांचे मनोरे रचू लागतो
अचानकच त्या किरणासोबत
धुळीचा लोट वाहू लागतो
मनाच्या गाभाऱ्यात न सांगता
एक काळा ढग गर्दी करू पाहतो
जीव गुदमरतो, आकांत करतो
पुन्हा एकदा होऊन एकाकी
त्या काळोखात तो चाचपडत राहतो
पुन्हा नवा किरण शोधण्यासाठी
प्रदूषणातही नव्याने जगू पाहतो
काळ लोटला जातो तसे
असे अनेक अनाहूत काळे ढग
आसपास - आतबाहेर चोहीकडे
पसारा करून जमत असतात
जीव आता पुरता अडकून जातो
गुदमरत राहतो , घुसमटत राहतो
आसवांच्या पावसात भिजत राहतो
पण तरी पुन्हा एकदा
अंधाऱ्या बंद खोलीत
अडकून पडलेला जीव
सारी कवाडे तोडून
बाहेर उडू पाहतोय
- रुपाली ठोंबरे.
Very nice ,chhan lihili ahe kavita ...
ReplyDeleteछान..
ReplyDelete