चल ऊठ बाळा
आता सुरु होईल शाळा
आणला निळा फळा
पाहू स्क्रीनवरची शाळा
नको आई , नको मला
कॉम्पुटरची ती शाळा
नाही वर्ग , नाही दंगा
ही कसली शाळा ?
अनोखी ही तुझी शाळा
आवडली खूप मला
पुन्हा लहान होऊन आई
बाळासोबत शाळेत जाई
हम्म्म्म...आई आणि बाई
अडकून दोघांच्यात मी
मित्र नाही , मस्ती नाही
शाळेची मज्जाच उरली नाही
बाईंचाही तुझ्या, आला बघ फोन
पाहू तरी आता, आले कोण कोण ?
नवीन काही शिकू चला आज
मज्जाच मज्जा करू चला खास
तसाच उठून बसलो मी पहा
देतेस का गं खारीसोबत चहा ?
मुले झाले फक्त सोळा गोळा
जळू लागे आत्ताशीच माझा डोळा
खाऊ देईन, पाणी देईन
वेळही देईन हवा तेवढा
पण, आनंदाने या शाळेत मी राहीन
शब्द दे मजला तुझा फक्त एवढा
तेच तर कठीण आहे गं आई
तुला समजतच कसे ते नाही ?
खरी शाळा आठवत मला राही
जायची तिथे लागली आता घाई
त्याच्याशिवाय,
क ख ग घ... १ २ ३ ४
काहीसुद्धा कळत मला नाही
खरं खरं एकदा मला सांग
तुझी सुद्धा होती का गं ... शाळा अशी आई ?
- रुपाली ठोंबरे .
No comments:
Post a Comment