सप्तसुरांनो, आज गा तुम्ही
अभिमानाची आरती
गाथा मोठी या महाराष्ट्राची
शिवशंभू जिचा सारथी ।
माथ्यावरी शिरोमणी सह्याद्री
पावलांशी सागरपाणी
पावलांशी सागरपाणी
दिशादिशांतुनी वारे वाहती
गाती स्वातंत्र्याची गाणी ।
घामांच्या धारांत भिजून माती
हिरव्या लाटा काळ्या सागरी
हिरव्या लाटा काळ्या सागरी
कणीदार शिंपल्यांत सुवर्णमोती
घरोघरी भरती धान्याच्या घागरी ।
कुंभ सरितांचे येथ भरून वाहती
चैतन्ये नांदती पशूप्राणीही
चैतन्ये नांदती पशूप्राणीही
किलबिल भुपाळी पाखरांची
सूर्यनारायणा प्रातः जागवी ।
धन्य धन्य ही संतांची पवित्र भक्तीभूमी
अभंग-पोवाडे येथ माणसा जागविती
अभंग-पोवाडे येथ माणसा जागविती
धन्य धन्य ही कलांची सुंदर किल्लेभूमी
तंत्र-कला-क्रीडेचा भगवा जगी फडकती ।
नमन क्रांतिकारकांच्या चरणी
रक्तरंगात धन्य जाहली ही माझी आई
रक्तरंगात धन्य जाहली ही माझी आई
ते सळसळणारे रक्त अजूनही
जिवंत आहे येथल्या मावळ्यांच्या ठायी।
संकट येवो दृश्य-अदृश्य कोणतेही
येथल्या मनामनांत दाटली राष्ट्रभक्ती
येथल्या मनामनांत दाटली राष्ट्रभक्ती
घेऊन पुन्हा वसा इतिहासाचा हाती
महाराष्ट्रा वाचवू एकवटून सारी शक्ती ।
-रुपाली ठोंबरे.
Superb Rupali... Maharshtra sathi ek surekh abhiman geet rachlays !!
ReplyDelete