Pages

Friday, November 13, 2020

एक मसालेदार अनुभव

दीपावलीचे वेध लागले आहेत. आता ठिकठिकाणी आकाशकंदील , रांगोळ्या , रंगबिरंगी दिवे यांची सुरेख रेलचेल पाहावयास मिळेल. आता रांगोळीचा विषय निघालाच आहे तर मला येथे या वर्षातला एक सुंदर अनुभव सांगावासा वाटतो आहे. मी काढलेली एक चित्ररूप रांगोळी...चित्ररूप रांगोळी हा काही नवा प्रकार नक्कीच नाही. पण यात नवीन काही असेल तर ती साकार करण्यासाठी रांगोळीच्या पावडर ऐवजी वापरलेले नवे काहीतरी... काय म्हणालात?रंगीत तांदूळ? फुले ? वाळू ?... नाही यांपैकी काहीच न वापरता चित्ररूपात माझी रांगोळी उमटली ती खड्या मसाल्याच्या विविध पदार्थांनी. 

चकित झालात ना 'मसाल्यांची रांगोळी' हा प्रकार ऐकून आणि ते सुद्धा कोणत्याही प्रकारची मसाला पावडर न वापरता, म्हणजे हळद,तिखट,गरम मसाला, धणे किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या सुक्या मसाल्याची पूड...व्यर्ज म्हणजे व्यर्जच. यांचा वापर म्हणजे इतकी मेहनत घेऊनही स्पर्धेतून तडक बाहेर जाण्याचा रस्ता . हो... मसाले रांगोळीची स्पर्धा आयोजित केली होती आमच्या लेवा पाटीदार फेसबूक ग्रुपवर पुण्यातील 'सवाई मसाले ' यांनी. 

साधारण एक महिन्यापूर्वी या स्पर्धेची घोषणा करण्यात आली होती ग्रुपवर. मी एक चित्रकार असल्याने त्याकडे माझे लक्ष लगेच वेधले गेले. अगदी क्षणाचाही विलंब न लावता मनाशी ठरवून टाकले आपण यात भाग घेऊन काहीतरी भन्नाट करून दाखवू. आणि त्यासोबतच डोक्यात विचारांची चक्रे सुरु झाली. आजच्या युगात कोणीही करेल त्याप्रमाणे आधी गुगलवर या नव्या रांगोळीच्या प्रकाराचा शोध घेतला . तेव्हा समजले कि हा प्रकार म्हणजे  जवळजवळ दुर्मिळच. जे थोडेबहुत सापडले त्यातून घेता येईल असे फारसे काही नव्हतेच. परंतु त्याक्षणी जाणीव झाली ती रंगांच्या उपलब्धतेची. धणे , जिरे , दालचिनी , ओवा हे सर्वच जणू एकाच मातकट रंगाच्या विविध छटा. बडीशोप आणि वेलची त्यातल्यात्यात थोड्या हिरव्या छटा... पण उठावदार त्यावर म्हणता येईल असे चक्रीफूल , लवंग , काळी मोहरी , काळे मिरे आहेत खरे... पण त्यांचाही काही प्रमाणात एकसारखाच रंग. आता रांगोळी म्हणजे कशी ... तर लाल, गुलाबी,पिवळा , निळा,हिरवा अशा असंख्य रंगांची उधळणच . पण इथे तर रांगोळीच्या या मूळ संकल्पनेवरच हे असे मोठे बंधन. आव्हानच होते हे एक आणि मी ते स्वीकारले. 


अनेकांनी आपल्या रांगोळ्या पोस्ट करण्यास सुरुवात केली होती. अपेक्षेपेक्षाही खूप चांगला प्रतिसाद होता साऱ्या जणींचा . ते पाहून मसाल्यांपासून बरेच काही करता येऊ शकते हा विश्वास मिळाला. थोडा सकारात्मक विचार करता सुक्या मिरचीचा लाल रंग , मोहरीच्या डाळीचा पिवळा रंग , शुभ्र तिळातली पांढरी छटा असे अनेक रंग दिसू लागले आणि मीही तयारीनिशी सुरुवात केली. ऑफिस आणि घर सांभाळून हे करणे म्हणजे सुट्टीचा दिवस निवडला गेला . ज्या गोष्टी , जे रंग उपलब्ध आहेत त्यांना वापरून साजेसे काही करूया या विचाराने मी शरदातल्या जंगलातले निसर्गचित्र उमटवण्याचे ठरवले. त्यादिवशीची ही रांगोळी स्पर्धेसाठी देण्यासाठी अंतिम नसून केवळ सरावासाठी आणि एकूण कल्पना येण्यासाठी उभारलेला तो एक नमुना होता. झाडापानांचा रंग आणि रचना आरामात होऊ शकेल असे प्रथमक्षणी वाटले खरे, पण प्रत्यक्ष जेव्हा ते पूर्ण झाले तेव्हा त्यात ती मजा नव्हती. त्यामुळे निसर्गचित्राची निवड कशी चुकली हे लगेच ध्यानात आले. निसर्गचित्र तर नक्कीच करायचे नाही हे पक्के ठरले. आता काय काढावे या विचारात असतानाच कोपऱ्यात एकत्र सरकवलेल्या लाल रंगाच्या मिरच्यांवर नजर गेली. क्षणभर ते अस्ताव्यस्त पडलेले रेशमी कापडच भासले. आणि त्याच क्षणी एक कल्पना मनात रुजली. पुन्हा एकवार त्या मिरच्यांना रचून खाली धण्यांची सोनेरी किनार मांडली. लाल रंगांच्या विविध छटा आणि सोबत सोनेरी झालर... हवाहवासा घागरा तयार झाला. खूप सुंदर. आता माझ्या रांगोळीत अशी फेर घेणारी मुलगी असेल हे पक्के झाले. ओला मसाला स्पर्धेसाठी अमान्य असल्याने हिरव्या मिरच्यांचा असाच प्रयोग करता आला नाही परंतू पिवळ्या सुक्या मिरच्या असतात की... आणि तत्क्षणी पिवळ्या मिरच्यांचा शोध सुरु झाला. आसपासच्या एक दोन दुकानांत चौकशी केली तर तिथे नकारच मिळाला. पण नेहमीप्रमाणे ऍमेझॉनवर हवे ते लगेच गवसले आणि पुढच्याच क्षणी मी ऑर्डर देऊन मोकळी झाले. हे मसाले नंतर वापरता येतीलच ना...मिरच्यांचे पार्सल आले तेव्हा कळले आमची पिवळी मिरची जोधपूरवरून आली. त्याक्षणी रांगोळीची जय्यत तयारी सुरु आहे असेच सर्वांना वाटले. हे रेशमी घागरे घालून काय उभारावे असा प्रश्न पडताच लगेच त्याचे उत्तरही माझे मलाच मिळाले. काही दिवसांतच नवरात्री सुरु होणार होती. कोरोनामुळे दरवर्षीप्रमाणे धुमधडाक्यात गरबा खेळला जाणार नाही... पण त्या दिवसांची आठवण जागी करणारी कलाकृती केली तर ...?आणि हे मनाला अगदीच पटले. बेधुंद होऊन टिपऱ्या खेळण्यात गुंग अशा जोडप्याचे चित्र प्रथम कागदावर काढून घेतले. रांगोळी जमिनीवर काढतात पण मसाले वापरायचे म्हणून कागद अंथरला, चित्र काढायलाही थोडे सोपे गेले . घरात उपलब्ध मसाल्यांची शोधाशोध झाली.हवे तेवढे सर्व मसाले नव्हतेच. चक्रीफुले, जावित्री , सूंठ ,मोहरी डाळ, खसखस यांसारखे प्रकार फारच कमी प्रमाणात होते आणि मला तर ते जास्त प्रमाणात हवे होते. त्यासाठी मसाल्यांच्या दुकानात गेले. तिथे एक गंमतच घडली. मला हवे असलेल्या मसाल्यांचे विचित्र प्रमाण ऐकून न राहवून दुकानदाराने मला शेवटी विचारलेच कि , "ताई तुम्ही नक्की कोणता मसाला तयार करत आहात ?" तेव्हा 'मसाला रांगोळी' हा प्रकार ऐकून प्रथमतः तोही चकितच झाला. 

तर आता सर्व तयारी झाली. मी शनिवारचा दिवस निवडला. सकाळची जेवणे आटोपून दुपारी २ च्या सुमारास रांगोळी या उपक्रमाला सुरुवात केली. ६ वर्षांचा ओमही सुरुवातीला भारी उत्साही होता. त्याच्याच रूमवर आज मी अतिक्रमण करून हा माझा मसालेदार थाट मांडला होता त्यामुळे त्याचे येणे-जाणे मर्यादित ठेवले. पंखा , खिडकी या सर्व हवेचा झोत निर्माण करणाऱ्या गोष्टीना पूर्णविराम दिला गेला. नावापुरता कित्येक दिवसांपासून बंद असलेला AC सुरु होता पण काही वेळातच त्यानेही निराशा आणली. पण मी मात्र हे सर्व विसरून माझ्या रांगोळीकडे वळले. नेहमी सुरुवात कठीण भागाकडून करावी हा माझा नित्य नियम. आणि त्या मुलीचा चेहरा करण्यास सुरुवात केली. नाकी, डोळे, ओठ जमले तर बाकी सर्व सुरळीत होईल असा माझा एक विश्वास. पण कसले काय ? काळे जिरे आणि सोबतीला खसखस... यातून चेहरा जिवंत करण्याचा माझा प्रयत्न. सुरुवातीला जितके सोपे वाटले होते ते तितकेच कठीण काम. सारखी इतस्ततः पळणारी खसखस आणि जराश्या धक्क्यानेही आपली जागा सोडणारे जिरे यांचा योग्य मेळ बसवता बसवता नाकी नऊ आले होते . त्यात तिच्या चेहऱ्यावर हावभावही हवेच ना? शेवटी तो त्या चित्राचा महत्त्वाचा भाग. केसर आणि जावित्रीच्या साहाय्याने ओठांची कमान सांभाळणे हेही महत्त्वपूर्णच. मनासारखा हसरा चेहरा मिळाला आणि हुश्श झाले. कागद सरकून रांगोळी बिघडू नये त्यामुळे सुरूवातीलाच तो चोहीकडून चिकटपट्टीच्या साहाय्याने चिकटवून घेतला होता. पण कितीही प्रयत्न केला तरी एक फुगवटा निर्माण झाला होता. त्यामुळे कागदावरील एका भागावर जरी काही पडले तरी त्याचा परिणाम रांगोळीवर सर्वत्र दिसून यायचा. आणि झालेही तसेच. डोळ्यांमध्ये रोवलेल्या शुभ्र तिळांना पेन्सिलच्या साहाय्याने ठीक करत असतानाच ती पडली. चेहऱ्यावर नाही...पण कागदावर पडली आणि इतक्या मेहनतीने निर्माण केलेले ते अप्रतिम सौन्दर्य एका क्षणात उद्ध्वस्त झाले. खुप वाईट वाटले , राग आला...अनेक भावना एकत्रित दाटल्या. पण पुन्हा सर्व रचण्याशिवाय पर्याय नव्हता. पुन्हा नव्या उमेदीने , त्याच उत्सुकतेने पण जरा सतर्क राहून ते दृश्य पुन्हा नजरेसमोर आणण्यास यश मिळाले. केस, फुले, दागिने असा साजश्रुंगार सुरु झाला. रंगांची कमतरता होती खरी पण थोडे डोके चालवले आणि नवे रंग सापडू लागले. चक्रीफूलाच्या पाकळ्या विलग केल्यानंतर त्यात मिळणारी नारिंगी गुलबट छटा तर या पाकळ्या एकत्र मांडल्यावर अधिकच खुलून दिसायची आणि चित्रातल्या चोळीला एक सुंदर रूप प्राप्त झाले. त्यावर धण्यांचा सोनेरी हार आणि याच चक्रीफूलाचे नाजुकशे पदक. या यशानंतर या चित्रातल्या सर्वात मोठे आकर्षण ठरलेल्या घागऱ्याला सुरुवात झाली. मलाही ते करताना फार मजा आली. कमी वेळात सुंदर काही तयार करण्याचा आनंद आगळाच असतो. ओढणीच्या सोबतच नाजूक कमरपट्टाही शोभू लागला. लाल मिरच्यांनी घेर घालण्यास सुरुवात केली तसे चित्राला एक वेगळा दृष्टिक्षेप लाभला. त्याखाली धण्यांची सोनेरी झालर. त्यातही पिवळ्या मोहरीवर लवंग ,मिरे ,चक्रीफुलांनी मांडलेली गोलाकार नक्षी हे सर्वच त्या असंख्य मिर्यांत सुंदर दिसत होते. मुलगी नखशिखांत पूर्ण झाली तसे हायसे वाटले खरे पण एक नाजूक धक्काही काय भूकंप आणू शकतो याची कल्पना काही तासांपूर्वीच आल्याने भीती वाटत होती. जेवढी ही भीती जास्त तेवढी सावधानता वाढू लागली. त्या जोडप्यातील मुलाने मला अजिबात त्रास दिला नाही. पाठमोरा उभा असल्याने चेहऱ्यावरच्या हावभावांचा प्रश्नच नव्हता तरी चेहऱ्याचा जितका भाग दिसत होता तो अचूक जमला. पगडीवर मोहरीच्या डाळींवरच्या जावित्रीच्या पाकळ्यांनी सुंदर छटा निर्माण केल्या. मेथ्या आणि पिवळी मोहरी एकत्र आल्या आणि त्याचा कुर्ता जरीदार बनत गेला. चक्रीफुलाने नक्षीकामाची कामगिरी अगदी चोख बजावली. पिवळ्या सुक्या मिरच्यांनी घेरदार कुर्त्याला छान सजवले. कमरेला बांधलेल्या नक्षीदार शेल्याचा रंग ठरवताना खरेतर सुचेनासे झाले होते. पिवळा आणि पांढरा या दोन रंगांत शोभेल असा रंग. तो सापडला आणि एका अस्ताव्यस्त पण विशिष्ट रचनेत मांडलेल्या लवंगीने त्यास अलंकारिक रूप प्राप्त करून दिले. धोतीचा शुभ्र रंग आणि त्यासाठी शुभ्र तीळ हे समीकरण माझे फार आधीपासूनच ठरलेले होते. तर पाहता पाहता जोडपे समोर उभे झाले. या सर्वांत मुलीच्या चेहऱ्यानंतर जर काही फार कठीण वाटले असतील तर ती म्हणजे बोटे. मला आठवते पेन्सिलने चित्र काढताना मी बोटांच्या पकडीकडे आणि त्यांच्या आकाराकडे किती लक्ष दिले होते ... मात्र खसखशीने रंग भरताना ते आकार दिसेनासेच झाले. तरीही टिपऱ्या धरलेली बोटे जमलीच . तिची उडती वेणी आणि त्याचा उडता पगडीचा भाग यामुळे नृत्यात फेर धरतानाचे दृश्य टिपण्याचा माझा प्रयत्न दिसून येईल. एव्हाना त्या बंद खोलीत मसाल्याचा घमघमाट दाटला होता. सर्वच काही एकदम मसालेदार झाले होते. आता महत्वाच्या व्यक्तिरेखा तर सुखरूप पार पाडल्या परंतु त्यांना अधिक सौन्दर्य प्राप्त होते ते सभोवतालच्या वातावरणाने. तर हे जाणून मी वातावरण निर्मिती सुरु केली. हिरवीगार बडीशोप आसपास अंथरली आणि एक सुरेख गवताच्या गालिच्याची त्या मैदानावर निर्मिती झाली. जिऱ्यानी त्या दोघांची सावली चित्रित झाली निव्वळ खऱ्या चित्राकडे वळण्याचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून. दालचिनी हा खोडाचाच भाग आणि म्हणून तो झाडाचे खोड म्हणूनच उत्तमरीत्या वापरावे या दृष्टिकोनातून मी एक झाड उभारले. त्यामुळे एक नैसर्गिकपणा त्या चित्रात डोकावला. खरे तर फक्त कसूरी मेथी वापरून झाड बहरले असते पण तरी हिरव्या वेलचीचा तो पर्णाकृती आकार मला फार भावला. आणि या वेलचीच्या पानांना विशिष्ट आकारात एकमेकांत गुंफून त्या झाडावरच्या फांद्याफांद्यांवर पालवी फुटली आणि हळूहळू एक टुमदार झाड आकार घेऊ लागले. त्यात हिरव्यागार कसुरी मेथीचा वापर केल्याने झाडाला एक प्रकारचा भरगच्चपणा मिळाला. त्यावर सांडलेली मोहरीची डाळ म्हणजे फुलांचा मोहोरच...खाली गवतावर स्वतःच्याच सावलीवर पानांचा वर्षाव करणारे ते झाड... त्यावर विहरणारे चक्रीफुलापासून निर्मिलेले फुलपाखरू... असे हे चित्र क्षणाक्षणाला आपले रूप पालटत गेले आणि त्यासोबत माझ्या चेहऱ्यावरचे भावही. उजवीकडचे झुडूप म्हणजे माझ्या कल्पनेतले एक झाड. तेजपानांच्या गर्दीत बोर मिरची आणि जावित्रीची फुले आणि फळे दडलेली होती. खाली सूंठ एकमेकांवर चढून नैसर्गिकरित्या रचल्या गेलेल्या दगडांची भूमिका पार पाडत होती. आता जवळजवळ ९०टक्के रांगोळी पूर्ण झाली होती. माझ्या मते १० टक्के म्हणजे आकाशाला त्याचे रूप देणे अजून बाकी होते. रात्रीचे काळेभोर आकाश , फुलून हसणारा चांदवा, अवतीभवती चमचम असंख्य तारका आणि या चांदण्यात सुरु असलेला हा नृत्याविष्कार... असे काहीसे चित्र माझ्या मनात कुठेतरी दडलेले होते. त्याप्रमाणे काळी मोहरी आकाशभर पसरली देखील पण छे ! हे सर्व इतके चांगले जुळून आले नाही आणि त्वरित माझा निर्णय बदलला. अंथरलेली मोहोरी जरा बाजूला केली आणि त्यामागे संध्याकाळची गुलबट केशरी दृष्टीस पडली. तिला पाहता कलेच्या क्षेत्रात माझ्या गुरुजनांकडून मिळालेले धडे आठवले. पूर्ण कागद रंगानी भरायलाच हवा असे गरजेचे नसते. कधीकधी गरज पडेल तेथे निगेटिव्ह स्पेस सोडायला हवी. त्यामुळे पॉजिटीव्ह स्पेस आणखी उठून दिसते. आणि मग मनाशी ठरवले केशरी सोनेरी रंगांत रंगलेल्या संध्याकाळी हा नृत्यसोहळा मांडावा. पुन्हा एकदा मेहनतीने केलेली रचना पुसण्यात दुप्पट मेहनत घेतली गेली आणि एक नवा धडा मिळाला. पण त्या मुळे काही ठिकाणी काळी बॉर्डर आपोआपच घडून आली हा एक प्रकारे झालेला फायचाच म्हणावा लागेल. जावित्रीच्या केशरी किरणांनी माझ्या चित्रात सूर्योदय झाला. तिळांनी त्या ढगांची मोहक दुलई आकाशभर पसरली. आणि या देखाव्यात जसे मला वाटले होते त्याप्रमाणेच ते नृत्य करणारे जोडपे अधिकच खुलून दिसू लागले. खोलीचा दरवाजा पूर्ण उघडला आणि बंद खोलीतला मसालेदार मंद सुगंध घरभर पसरला. त्या सोबतच सर्वांची पार शिगेला पोहोचलेल्या उत्सुकतेला पूर्णविराम मिळाला आणि माझ्यावर कौतुकाची रिमझिम बरसात झाली.  

अशी ही चित्ररूपी रांगोळी पूर्ण होता होता रात्रीचे १० वाजले होते. त्यासोबत बसून चांगला फोटो घेण्याचेही त्राण उरले नव्हते. ती रांगोळी दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत त्या रूमची शोभा वाढवत राहिली. आणि त्यानंतर सुरु झाला आणखी एक नवा अध्याय. मांडलेले सारे उचलायचे. आता सर्व पदार्थ भविष्यात नेहमीसारखेच वापरायचे असे ठरवल्यावर त्यांना वेगवेगळे करणे भाग होते. माझ्या एका मैत्रिणीने आयडिया दिली कि सर्व मसाले एकत्र करून टाक आणि मसाला बनवून टाक. पण हे खरेच इतके सोपे असते का ?मसाला बनवायलाही एक प्रमाण लागते प्रत्येक गोष्टीचे. त्यात माझ्या रांगोळीत सर्वच बहुतेक एकत्र आलेले. आता मेथ्या, पिवळी मोहरी, मोहरीची डाळ , काळे जिरे हे सर्व वेगळे करणे तर भागच होते. हा प्रयत्नही खूप वेळ रंगला. यात माझी मदत कोणी केली असेल तर सहा वर्षांच्या ओमने. का कुणास ठाऊक पण हे असे निवडून वेगवेगळे करण्याचे कंटाळवाणे काम त्याला फारच भारी वाटत होते. खरेच , मुलांना कधीही काहीही आवडू शकते . जसजसा त्याला कंटाळा येऊ लागला तसे त्याने मला काही सल्ले देण्यास सुरुवात केली. जसे कि आता हे सर्व एकत्र कर आणि मग उद्या ताटात घेऊन वेगवेगळे कर. हो खरेतर हे माझ्या डोक्यात आले होते पण असो.शेवटचा चिकवलेला कागद उचलल्यावर थोडी आवराआवर आणि झाडलोट करून होती तशी ती रूम आता सुस्थितीत दिसू लागली. 


दुसऱ्या दिवशी ही रांगोळी मसाले रांगोळी स्पर्धेत समाविष्ट झाली आणि खरंच खूप छान प्रतिसाद मिळाला... कदाचित माझ्या अपेक्षेपेक्षाही अधिक. त्याक्षणी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटले.निकाल काहीही असो पण भरभरून कौतुकाची थाप पाठीवर पडली. यासाठी लेवा ग्रुप आणि त्यातील सभासदांचे विशेष आभार मानावेसे वाटते. कलाकार मेहनत घेतो पण त्या कलेला दादही हवी असते ती अधिक बहरण्यासाठी. २५ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर झाला आणि विजेत्यांच्या यादीत स्वतःचे नाव पाहून खूप छान वाटले. फक्त २-३ जणांना बक्षिसाचे मानकरी करण्यापेक्षा शक्य तितक्या साऱ्या जणींचे अशा प्रकारे कौतुक करण्याची ही तऱ्हाही खूप आवडली.ही रांगोळी नेहमीप्रमाणे सोपी नाही. खूप मेहनत लागते. आणि त्या मेहनतीला सलाम हा मिळायलाच हवा होता. खरे सांगते मसाल्यांपासून रांगोळी हा असा प्रकार करण्याचे कधी स्वप्नातही माझ्या मनात आले नसते . आणि मसाल्यांपासून इतके सुंदर काही होऊ शकले असते यावर कधी विश्वासही बसला नसता. खरेतर सर्वच सहभागी झालेल्या रांगोळ्या अप्रतिम होत्या. मी तर म्हणेन , महिलांतील कल्पनाशक्ती ,चिकाटी , कष्ट घेण्याची वृत्ती या सर्वांचेच प्रतीक होती ही रांगोळी. आणि हा अविष्कार घडवताना विशेष आभार मानावेसे वाटते ते घरच्यांचे, ज्यांनी प्रोत्साहनासोबतच कौतुकही केले. माझ्या चिमुकल्याचा तर फार मोठा वाटा आहे. मध्यावर आल्यावर सारखे वाटे कि जर हा चुकून चिडला तर कोणत्याही क्षणी माझी रांगोळी उद्ध्वस्त करू शकतो त्यामुळे दिवसभर त्यालाही देता येईल तितका वेळ देत आनंदी ठेवण्याचा माझा प्रयत्न शेवटी सफल झाला. त्यालाही हा असा आगळावेगळा बेत पाहायला मज्जा अली होती. पुढे अनेक दिवस निवडनिवडीचे कार्य सुरु राहिले. काही खडे मसाले एकत्र कुटून नवा गरम मसालाही तयार झाला. खरेतर हा असा आगळावेगळा उपक्रम घडवून आणून त्यात आम्हाला समाविष्ट केल्याबद्दल आम्हीच सवाई मसालेचे आभार मानले पाहिजे. पण एक दिवस लॉकडाऊनच्या या काळातही घरपोच एक पार्सल आले ज्यात एक अप्रतिम ट्रॉफी आली, सोबत मसाल्यांच्या झणझणीत मेजवानी घेऊन. स्पर्धा जितकी आगळीवेगळी तितकीच ट्रॉफी सुद्धा वेगळीच होती. अक्ख्या महाराष्ट्र होता तो मसाल्यानी नटलेला. हि ट्रॉफी जोपासायला नक्कीच आवडेल. शेवभाजीच्या झणझणीत मसाल्यापासून कालच घरी मसालेदार खान्देशी मस्त अशी शेवभाजी बनली. आणि या रांगोळीच्या आठवणी काढत आम्ही सर्वांनी त्यावर यथेच्छ ताव मारला.अशाच प्रकारे, कायम आठवणीत राहावा असा हा जीवनातील एक मसालेदार अनुभव... मनाला तृप्त करणारा. 

- रुपाली ठोंबरे. 



Saturday, July 11, 2020

तो... आणि ती (भाग १२)

" निर्वी , ऊठ आता . घड्याळात पाहिलेस का ? १०.३० वाजायला आलेत."
वहिनी खिडकीवरचे लाल-गुलाबी पडदे दूर सारत खिडकी उघडत निर्वीला उठवत होती .आणि निर्वी अजूनही गाढ झोपेतच. प्रखर सूर्यप्रकाशाची किरणे डोळ्यांवर पडताच काहीसे वैतागून आणि चादर चेहऱ्यावर ओढून घेत निर्वीने कूस बदलून पुन्हा झोपी जाण्याचा प्रयत्न केला.
"वहिनी , झोपू दे ना गं. खूप उशिरा झोपले आहे मी काल रात्री."
वहिनी निर्वीशेजारी येऊन बसली.तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली ,
"ते माहित आहे मला. काल जे झाले त्यानंतर घरात कुणाच्याच डोळ्याला डोळा लागला नाही. पण बाळा, आता ऊठ. खरंच खूप उशीर झाला आहे. आई अशाच खूप रागात आहेत. पुन्हा त्यांचा राग ओढवून घ्यायचा आहे का?"
ह्म्म्म.... निर्वीने चादरीतून डोके बाहेर काढत सरिता वहिनीकडे पाहिले.  तिचा हसरा चेहरा पाहिला आणि निर्वीला पुन्हा रडू आले. तिने मिठीच मारली. आणि हुंदके देत वहिनीची माफी मागू लागली.
"सॉरी ... आय एम सो सॉरी वहिनी. माझ्यामुळेच झाले ना सर्व ? मी तुला आधीच सर्व सांगायला हवे होते. आई खूप ओरडली ना तुला? माझ्यामुळेच ... सॉरी. "
रडणाऱ्या आपल्या नणंदेला भानावर आणत सरिताने पुन्हा तिला उठण्याची विनंती केली.
"अगं वेडाबाई , चूक काय फक्त तुझीच होती काय? सर्वांचीच झाली थोडीफार. आणि माझ्या हातून थोडी जास्तच. चल आता. जेवणाची तयारी सुरु करायला हवी. नाहीतर बाबांच्या रागाचाही सामना करावा लागेल."
निर्वी आता चांगलीच उठली हे पाहून वहिनी खोलीतून निघून तिच्या कामाला लागली.

इकडे निर्वी ला अचानक काही आठवले आणि अस्ताव्यस्त झालेल्या बिछान्यामध्ये ती अधाश्यासारखे काही शोधू लागली . फोन मिळाला आणि तिला हायसे वाटले. तिने आलेले मेसेजेस पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावरचे हसू कुठल्या कुठे गायब झाले. गेल्या काही दिवसांमध्ये असे प्रथमच झाले होते कि सार्थकचा 'Good morning ' मेसेज तिला आला नाही. तिला वाईट वाटले. पण मनाशी काही ठरवून तिनेच त्याला मेसेज केला आणि रूमबाहेर पडली. दुपारच्या जेवणाची वेळ होत आली. निर्वी अजूनही त्या फोनला चिटकून होती. जरा कुठे काही वाजले कि तिची नजर लगेच त्याचे शब्द शोधू लागे. पण सारे व्यर्थ. तिने पुन्हा स्वतःच  त्या एकतर्फी संवादात आणखी मेसेजेस ची भर घातली. आणि पुढच्याच क्षणी १-२-३-४....  कितीतरी मोठी किलबिल तिच्या फोनवर झाली. तिने त्वरेने त्यावर आलेले नवीन मेसेजेस वाचले,
"Hi निर्वी
कशी आहेस तू?
अगं आपले सुहासच्या बर्थडे पार्टीचे फोटो तुझ्याकडे आहेत ना ?
प्लिज पाठवशील का मला ?
मला ना त्याला एक सरप्राईझ द्यायचे आहे.त्यासाठी हवेत. माझ्याकडे होते गं . पण नेमका तो फोन हरवला गेल्या महिन्यात. सो प्लीज पुन्हा दे मला ई-मेल वर .
चल बाय . बोलू लवकरच.
नक्की पाठव बरे...आणि लवकर :-)"
तिची जुनी मैत्रीण, प्रियाचा मेसेज पाहून निर्वीचा हिरमोडच झाला. ती तशीच तिच्या खोलीत गेली. जेवायलाही आली नाही. स्वतःशीच रडली ... रुसली... काय करावे हे तिला सुचेचना. घरी सुद्धा आता तिला कोणाशीच काही बोलावेसे वाटेना.तो इतका का रागावला असेल हे ही तिला समजेना ...बोलून गोष्टी सुकर होतात ना ? मग ? एकदा फोन लावून देखील पाहिला . पण त्याने तो उचलला नाही. सावरलेली ती पुन्हा रडू लागली. आणि तशीच झोपी गेली.

कर्णकर्कश आवाजात तिचे आवडते गीत फोनवर वाजू लागले आणि ती झोपेतून उठली. रिंग ट्यून होती तिची ती. 'Priya Office' नाव पाहिले आणि वैतागून फोन कट केला तिने. तिला आता कोणाशीच बोलण्याचे मन नव्हते.  खिडकीबाहेर नजर गेली तर जाणवले... अरेच्चा !संध्याकाळ झाली ? इतका वेळ झोपून होते मी. पुन्हा एकदा फोन तपासून पाहीला. हवा असलेला कॉल किंवा मेसेज आला नाही हे पाहून हिरमुसून गेली. पण ती तशीच उठून'हॉल मध्ये आली. सर्व आपापल्या कामात व्यस्त. किचनमध्ये डोकावून पाहिले तर स्वयंपाकाची तयारी सुरु होती . आईने तिच्यावर एक कटाक्ष टाकला आणि न बोलताच बरेच काही बोलून गेली ती. निर्वी रागानेच हॉलमध्ये येऊन रिमोट घेऊन TV समोर बसली. आज कोणीच कोणाशी फारसे बोलत नव्हते. बाबा आणि वहिनी थोडे फार सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत असले तरी एक प्रकारची शांतता पसरली होती त्या घरामध्ये. प्रियाचा वारंवार येणारा फोन ती शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत होता. पण निर्वीचे त्याकडे दुर्लक्ष होते. तिने पुन्हा एकदा सार्थकला कॉल करून पाहिला . पण छे ! यावेळी पण फक्त रिंग वाजत राहिली. 



स्वयंपाक झाल्यावर लगबगीने वहिनी बाहेर आली,
" बाबा स्वयंपाक झाला आहे. चला जेवायला.निर्वी, चल ऊठ बेटा . सकाळपासून काहीच खाल्ले नाहीस तू पण. जेवून घे. तुझ्या आवडीचे पराठे केलेत मी."
निर्वी मुकाटपणे डायनिंग टेबलवर येऊन बसली. सारे जेवत असतानाही प्रियाचा येणारा फोन आता सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. शेवटी आईच म्हणाली ,
" अगं घे तो फोन . कधीपासून नुसता वाजतोय. आणि नाही बोलायचे असेल तर फोन सायलेंट वर तरी ठेव. डोके भणाणून गेलेय नुसते. "
आईचा वैतागवाणा सूर ऐकून निर्वीने शांतपणे एक मेसेज पाठवून त्या कॉल मालिकेला तात्पुरता स्वल्पविराम लावला. जेवल्यानंतर तिने प्रियाला फोन केला तर तो वैतागूनच ,
"अगं , काय प्रिया , मी बोलले होते ना पाठवते म्हणून . तरी इतके कॉल्स ? यू आर इम्पॉसिबल. "
"निर्वी , तुला काय वाटते तुला मी ओळखत नाही ? एरव्ही तू लगेच पाठवले असते. पण आज सकाळची संध्याकाळ होऊन गेली तरी तुझा रिप्लाय नाही आणि तुझा तो उत्साह पण आज दिसत नाही. काहीतरी नक्की बिनसलेले दिसतेय. म्हणून मी फोन करत होते पुन्हा पुन्हा ."- प्रिया 
"बरे पण तरी असे नॉन-स्टॉप कॉल्स ?" 
प्रियाच्या बोलण्यावर निर्वी चिडून म्हणाली.
आणि त्यावर तितकेच हसून प्रिया उत्तरली ,
" अगं तीच तर ट्रिक आहे जी मी सुहासबरोबर नेहमी वापरते . म्हणजे इतके फोन येत असतील तर ज्याला अजिबात बोलायचे नाही तोही माणूस वैतागून ओरडण्यासाठी का होईना पण एकदा तरी फोन उचलतोच . तेच मी केले.आणि तू रिटर्न कॉल केलास.  हा हा हा ! आता प्लीज पाठव ते फोटोज . प्लीज प्लीज प्लीज... "
"हां हां ठीक आहे. आत्ताच पाठवते. थांब. तू ना ग्रेट आहेस."
असे म्हणत निर्वीने तिचा फोन कट केला. आणि पुढच्याच क्षणाला सार्थकला फोन लावला. एकदाच नव्हे तर अंदाजे ८ वेळा.... आणि एक वेळ अशी आली कि समोरून आवाज आला ,
" काय आहे निर्वी? काय झाले आहे? किती फोन ?"
सार्थकचा वैतागून असला तरी तो आवाज ऐकून निर्वीला हायसे वाटले . आणि अगदी नकळत तिने तिच्या मैत्रिणीला शाबासकी दिली.
" अरे त्याशिवाय तू माझा फोन घेतच नव्हतास . पण प्रिया इज रिअली ग्रेट...."
"प्रिया ? आता ही कोण ?"
"अरे माझी एक मैत्रीण आहे . तिचीच ही आयडिया... बरे ते सोड. तू सांग. तुला काय झाले आहे ? इतका राग ?"
"हो मग. काल जो काही प्रकार तुझ्या घरी झाला तेव्हापासून माझे आई बाबा फार चिडलेत. आणि हे सर्व तुझ्यामुळे ?
" काय ? माझ्यामुळे ? काहीही. अरे तुला माहित आहे खूप मोठा गैरसमज झाला होता काल? त्यातूनच हे सर्व घडले. म्हणजे नक्की काय झाले सांगू का ?"
सार्थक शांत होऊन आपली बाजू समजून घेऊ इच्छितो आहे हे कळताच निर्वी घडलेली कहाणी कथन करू लागली.
"....म्हणून आई-बाबांना वाटले होते कि निहालच येईल पण आलास तू ? आणि मग गोंधळले ना ते पण... खरेतर वहिनीने थोडा घोळ घातलेला आधी.... पण ...आणि निहाल... "
इतका वेळ शांतपणे ऐकून घेणारा सार्थक पुन्हा पुन्हा येणारे निहालचे नाव ऐकून वैतागून म्हणाला ,
" आता हा निहाल कोण ?"
निर्वी जणू या प्रश्नाची वाटच पाहत होती. ती त्याच्याबद्दल सांगत असताना सारे काही विसरून तिच्या दुबईच्या दिवसांत हरवून गेली. निहालबद्दल निर्वीच्या मनातील अशा भावनांनी सार्थक अस्वस्थ झाला... चिडला....
"काय ? तू आपल्याबद्दल पण त्याला सांगितले होतेस ?"
"अरे हो . तुला माहित आहे तुला विमानतळावर भेटल्यानंतर मी फार गोंधळले होते. तो सारा गोंधळ निहालनेच दुर केला होता . त्याच्या सांगण्यामुळेच मला हिम्मत आली होती तुला खरे सांगण्याची . Actually , you should thank Nihal... "
"व्वा ! निर्वी , खरंच कमाल आहेस तू ? आता हे सर्व ऐकून माझे डोके सुन्न झाले आहे.काही सुचत नाही. "
"अरे पण ..."
"निर्वी , प्लीज मला आता पुढे काही ऐकून घ्यायचे नाही. आणि खरेतर आता समजते आहे तुझ्या आई बाबांनाही काल का निहाल येईल असे वाटत होते ते .... "
"म्हणजे ?" - निर्वी . 
"तू माझ्यासमोरच त्याच्या बद्दल किती काही आणि कशा प्रकारे बोलते आहेस . नक्कीच काहीतरी असेल आणि म्हणूनच तुझ्या आईला ..." -सार्थक . 
"सार्थक... एक मिनिट. तू माझ्यावर संशय घेतो आहेस. माझ्या मनात असे काही नव्हते... "
"मग त्याच्या मनात असेल . त्याने सांगितले असेल. मला माहित नाही.सध्या नको हा विषय. नंतर बोलू ." - सार्थक. 
"अरे पण खरंच... " -निर्वी . 
"प्लीज निर्वी . गुड नाईट ." - सार्थक . 
निर्वी तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत राहिली पण सार्थक तिचे काहीही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हता. फोन कट झाला पण त्याचे काही शब्द मात्र तिच्या डोक्यात फिरू लागली .
'अरे हो , खरंच . आई बाबांना निहाल येईल असे का वाटले असेल . हा विचार तर केलाच नाही . ते त्याला भेटले नाहीत आणि मीही फारसे खूप काही असे सांगितले नाही कि ज्यामुळे आई असा निर्णय घेईल'
निर्वीला जुने दिवस आठवू लागले. ती पावसातली भेट, तो तिला भेटण्यासाठी आला होता.
' अरे हो , तेव्हा तो म्हणाला होता कि तो घरी गेला होता . तेव्हा भेटला होता . पण त्याने असे काही सांगितले असेल ?' 
न राहवून निर्वीला आता निहालवर राग येऊ लागला होता. इतक्यात फोनवर मेसेज आला त्यावर नजर गेली तर पुन्हा प्रियाचा मेसेज. तसे तिला काही आठवले आणि निर्वी लॅपटॉप घेऊन बसली. प्रियाला हवे असलेले सारे फोटोज एकत्र करून ती पाठवत होती. तिची नजर चॅट लीस्ट वर गेली. तिथे निहाल ऑनलाईन दिसत होता. याच्याशी आता बोलू का नको अशा दुविधेमध्ये ती प्रथमच स्वतःला पाहत होती.

तिकडे खूप दूर निहालसुद्धा बऱ्याच दिवसांनंतर ऑनलाईन आला होता. नेहमीप्रमाणे निर्वीला पाहिले... त्याला काही आठवले ... स्वतःशीच हसला तो... क्षणापुर्वी टाईप केलेला "How r u ? चा मेसेज " ती तर खूषच असेल तिच्या सार्थकसोबत असे मनातच म्हणत डिलीट केला. आणि लॉग आऊट करण्यास बोटे फिरू लागली तोच समोरून मेसेज आला ...
निर्वी : Hi !
निहाल चकित झाला आणि तेवढाच आनंद सुद्धा झाला त्याला. त्याने त्वरित रिप्लाय केला.
निहाल : Oh Hi ? How r u ?
निहालच्या या प्रश्नावर निर्वीची जी एक उत्तरमालिका समोर आली ती पाहून त्याला कितीतरी वेळ विश्वासच बसेना या सर्वावर .
निर्वी : Not fine .
निहाल : hmm ...का ?
निर्वी : तुझ्यामुळे ?
निहाल : माझ्यामुळे ? मी काय केले ?
निर्वी : तू खरे खरे सांग. तू आई बाबांना काय सांगितले ?
निहाल : कशाबद्दल ?
निर्वी : अरे आपल्याबद्दल . तू का असे काही सांगितलेस.
निहाल : म्हणजे ? निर्वी मला खरंच काही कळत नाहीय . नीट सांगशील का काय झाले आहे ते ?
निर्वी : OK. काल सार्थक त्याच्या आईबाबांसोबत घरी आला होता.
निहाल : अरे वाह ! That's good. तू आनंदी असायला हवीस मग तर.
निर्वी : तू मी काय सांगते आहे ते आधी ऐकून घेशील ? तर ते घरी आले तेव्हा त्याला पाहून आईबाबांना धक्का बसला कारण त्यांना माझ्यासाठी कोणी दुसरा अपेक्षित होता.
निहाल : दुसरा ? तू घरी आधी सांगितले नव्हतेस का ?
निर्वी : हम्म्म . ते थोडे कॉन्फयुजन झाले होते. पण हा दुसरा म्हणजे कोण माहित आहे ?
निहाल : मला या सार्थकशिवाय आणखी कुणाबद्दल तू सहसा सांगितल्याचे आठवत नाही. असा आणखी पण होता कोणी ?
निर्वी : निहाल, मला या क्षणाला मजाक नकोय.तर तो दुसरा अजून कोणी नाही तर तू होतास . 
निहाल : (आश्चर्याने ) काSSS य ? मी ? असे कसे शक्य आहे ?
निर्वी : तेच तर मला तुला विचारायचे आहे. तू त्या दिवशी माझ्या घरी येऊन काय सांगितलेस ?
निहाल : अगं, असं काही विशेष बोलणे झाले नव्हते. हा तर माझ्यासाठी पण मोठा धक्का आहे कि त्यांना तुझ्यासाठी मी योग्य वाटला.
निर्वी : हे बघ , त्यांना काहीही वाटो. पण माझ्या मनात सार्थक आहे आणि तोच राहील. हे तुलासुद्धा चांगले माहित आहे .
निहाल : हो हो. मग काय ... तुम्ही आणि सार्थक म्हणजे स्वर्गात बनलेली जोडी.. मी तर आधीच म्हणालो होतो. तुम्हालाच पटत नव्हते . 
निर्वीला आता यावर काय बोलावे ते सुचत नव्हते . निहालवरचा रागही आता शांत झाला होता. दोघांमध्ये याच विषयाला घेऊन थोड्या गप्पा झाल्या. आता घडलेल्या प्रकारातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करायला हवा हे दोघांनाही पटत होते . निहालने तिला आश्वासन दिले कि अजाणतेपणे त्याच्यामुळे हे घडले आहे म्हणून तोच यातून मार्ग काढण्यास तिला मदत करेल. तो मुंबईतच असल्याने त्यांची पुढची भेट ठरली आणि चॅट मधून दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला.

निर्वी आता फार शांत झाली होती . तिच्या मनातले वादळ शांत झाले होते . निहालसोबत बोलण्याने तिच्यावर होणारा हा परिणाम अनेकदा तिलाही चकित करून जायचा. तिथे निहाल मात्र एका वेगळ्याच विचारचक्रात होता. निर्वीच्या आईबाबांनी निर्विसाठी निहालचा विचार केला हे त्याच्या मनाला खरेच सुखावून गेले होते . पण तसे असले तरी त्याला निर्वीचे मन आता खूप चांगल्या प्रकारे समजले होते . तिच्या मनात सार्थकशिवाय कोणी नाही हे एक सत्य होते. तो आता यातून बाहेर पडण्याच्या मार्गावर विचार करू लागला . असा विचार करता करताच त्याचा डोळा लागला.

- रुपाली ठोंबरे.  

Monday, June 15, 2020

असा एक क्षण...


तो खंबीर किंवा कमकुवत नसतो
तर तो एक क्षण कमकुवत असतो 

जीवनातला असा एक क्षण 
जेव्हा प्रत्येक दिवा मालवलेला वाटतो 
जरी असेल सर्व सुखांचें लोळण 
तरी दुःखाचा एक धागा ताणून धरतो 

जीवनातला असा एक क्षण 
प्रत्येकाच्याच जीवनात कधीतरी येतो 
उद्याची चिंता अन कालचे व्रण 
मनाच्या द्विधावस्थेत जीव त्रस्त होतो 

जीवनातला असा एक क्षण 
जिथे व्यक्तीचा सहवास हवासा असतो 
मनावरचे एक असे दडपण 
जिथे आशेचा एक शब्दही कामी येतो 

जीवनातला असा एक क्षण 
जो कायमची कलाटणी देऊ शकतो 
प्रत्येकालाच प्रिय आपला प्राण 
असे असतानाही का असा निर्णय घेतो ?

जीवनातला असा एक क्षण 
जो जिद्दीने पार पडता खूप शिकवून जातो 
असेच आहे जीवनाचे हे रण 
जिथे एक बदल हरलेली बाजी जिंकून देतो 

जीवनातला असा एक क्षण 
तुमच्याही प्रियजनांच्या आयुष्यात असतो  
संवादाने दूर करू तो क्षण 
कारण प्रत्येकालाच जवळचा हवा असतो 

- रुपाली ठोंबरे. 


Monday, May 18, 2020

शुभेच्छा कॉमामॅन साठी




स्वल्पविराम... 
कायम सामान्य वाटणारा भाषेतला एक सुंदर आकार 
आणि अशोक सर ... 
या सामान्य आकाराला आसामान्य बनवणारा एक चित्रकार 

घडवून रेषांचे मिलन... 
कृष्ण-धवल रंगछटांत न्हाऊन जिवंत होणारे आभासी आकार 
जणू दुनियेची सुरेख एक सैर...  
आवर्तनांतून मनाच्या संवेदनांना स्पर्श करणारा अनुभवांचा सागर 

तव सारे अनुभव... 
प्रत्येक चित्रात उतरत वर्धत राहावा तुमच्यातला सदाबहार कलाकार
शुभेच्छा हीच आज... 
कोणत्याही पूर्णविरामाशिवाय तुमचे प्रत्येक स्वप्न होत राहावे साकार



- रुपाली ठोंबरे.  



Friday, May 15, 2020

स्क्रीनवरची शाळा


चल ऊठ बाळा 
आता सुरु होईल शाळा 
आणला निळा फळा 
पाहू स्क्रीनवरची शाळा 
नको आई , नको मला
कॉम्पुटरची ती शाळा
नाही वर्ग , नाही दंगा
ही कसली शाळा ?
अनोखी ही तुझी शाळा 
आवडली खूप मला 
पुन्हा लहान होऊन आई 
बाळासोबत शाळेत जाई 
हम्म्म्म...आई आणि बाई
अडकून दोघांच्यात मी
मित्र नाही , मस्ती नाही
शाळेची मज्जाच उरली नाही 
बाईंचाही तुझ्या, आला बघ फोन 
पाहू तरी आता, आले कोण कोण ?
नवीन काही शिकू चला आज 
मज्जाच मज्जा करू चला खास 
तसाच उठून बसलो मी पहा
देतेस का गं खारीसोबत चहा ?
मुले झाले फक्त सोळा गोळा
जळू लागे आत्ताशीच माझा डोळा 
खाऊ देईन, पाणी देईन 
वेळही देईन हवा तेवढा 
पण, आनंदाने या शाळेत मी राहीन
शब्द दे मजला तुझा फक्त एवढा 
तेच तर कठीण आहे गं आई
तुला समजतच कसे ते नाही ?
खरी शाळा आठवत मला राही
जायची 
तिथे लागली आता घाई 
त्याच्याशिवाय, 
क ख ग घ... १ २ ३ ४
काहीसुद्धा कळत मला नाही
खरं खरं एकदा मला सांग
तुझी सुद्धा होती का गं ... शाळा अशी आई ?


- रुपाली ठोंबरे .  


Friday, May 1, 2020

महाराष्ट्रा वाचवू एकवटून सारी शक्ती |



सप्तसुरांनो, आज गा तुम्ही
अभिमानाची आरती
गाथा मोठी या महाराष्ट्राची
शिवशंभू जिचा सारथी ।

माथ्यावरी शिरोमणी सह्याद्री
पावलांशी सागरपाणी
दिशादिशांतुनी वारे वाहती
गाती स्वातंत्र्याची गाणी ।

घामांच्या धारांत भिजून माती 
हिरव्या लाटा काळ्या सागरी
कणीदार शिंपल्यांत सुवर्णमोती
घरोघरी भरती धान्याच्या घागरी ।

कुंभ सरितांचे येथ भरून वाहती
चैतन्ये नांदती पशूप्राणीही
किलबिल भुपाळी पाखरांची
सूर्यनारायणा प्रातः जागवी ।

धन्य धन्य ही संतांची पवित्र भक्तीभूमी
अभंग-पोवाडे येथ माणसा जागविती
धन्य धन्य ही कलांची सुंदर किल्लेभूमी 
तंत्र-कला-क्रीडेचा भगवा जगी फडकती ।

नमन क्रांतिकारकांच्या चरणी 
रक्तरंगात धन्य जाहली ही माझी आई
ते सळसळणारे रक्त अजूनही
जिवंत आहे येथल्या मावळ्यांच्या ठायी।

संकट येवो दृश्य-अदृश्य कोणतेही 
येथल्या मनामनांत दाटली राष्ट्रभक्ती 
घेऊन पुन्हा वसा इतिहासाचा हाती 
महाराष्ट्रा वाचवू एकवटून सारी शक्ती ।

-रुपाली ठोंबरे. 

Saturday, April 25, 2020

One more messed-up painting.


That day, I was just sitting in my bedroom.Thinking about what next task to be done in this lock-down period. And suddenly one blank paper come across me. I took it in my hand. I rolled my fingers over it.A really good texture paper. It was bright. It was a good dimensions big paper with all the best qualities.The same paper I have seen once before few days and wished if I can get the same so I can create a beautiful painting for my vacant wall in the hall. Today, looking at the same paper in my hand I was very happy.I smiled at it.And asked it,
" Now whats next? You are really very good. But I am not that good artist."
The paper looked at me. smiled and expressed its desire,
"Ohhh! But I want you to add colors of your expressions on me. I liked you as an artist...as a friend...I want you to enter in my life and have good time.Let's come together...I am sure we can together create beautiful memories. We both can share the moments which will be precious for both of us."
I was already impressed by it from long before, so couldn't stop myself from going ahead. Although, I came to know that this painting cannot decorate my house. Still I was very happy to get it. I hugged it and took it in my room. At first, I drew one perfect circle in the middle of it. i was planning to work only in that circular area.But somehow my paper was not happy to knew this idea. For a moment, it stopped me,
"Rupali, what are you doing? why this boundary? I want you to get completely involved in me as I am devoted to you now. Today, I am here only for you. I am yours...believe me ,completely yours. "
"Are you sure? completely?"
I asked this question focusing on the word 'completely'.And on that it clarified one thing,
"Yes, I agree that even I have some limits. we can't go beyond that.But still I can assure you that we will have a very good time together.We will spend time with each other. I will agree to your that circular boundary also. Will not try to convince you to go beyond that.I respect your feelings. so, Let't enjoy the present. I am sure you will feel good. I want to see you happy."
And with this, our journey started together. Both of us were very comfortable with each other. One quiet communication started in between us. As I am very moody, everyday some different emotion was playing its role on that blank space. sometimes freshness of green started our day in early mornings, sometimes Reddish shades showed any anger whenever present, yellow smiles all over the body and sometimes the calm bluish violet shades in the night but the white color of purity was always there...so many colors started flowing one after another. Days passed by and our relation got stronger. Whatever I used to feel , I used to express through my strokes.With every stroke that painting started giving me positive response. Yes, now slowly that blank paper started it's journey towards a beautiful painting. I was also so much involved in that painting. There were so many works from office as well as household chores I needed to manage, but  I was always thinking about the incomplete painting I had. One day I realized now the painting is complete.We should stop experimenting more. but the painting was not at all happy to know it.It wanted something more.It was trying to convince me to go beyond your limits in order to complete. But I took it in other way and I started overworking in that completed circle again. And what happened? the newly drawn stroke just messed up my whole painting. It created one wrong mark and the beauty suddenly deteriorated.I felt very bad. But don't know what to do? Now my painting again started looking like incomplete.Something more was needed now. But what?

The painting was witnessing the whole process and it gave me suggestion,
" Why don't you utilize the remaining space to complete our painting. there is lots of space around that circle where if you wish you can enter and make the painting more beautiful. You can add new colors, new shades, new ideas...all these will surely change the view. I knew you had that imaginary boundary line in between. But  just try to cross that and go ahead. You will not regret."
That time I realized it is very difficult to explain. So I said,
" OK, as per your wish, if I cross that boundary and entered in the white space. what is the the guarantee that the painting will not mess up again in future. That time it will be more painful as I would have been utilizing more time and resources behind it. And there are my own rules which are stopping myself. And if I get involved completely and started listening my heart more than brain then it might happen that even your boundaries can't stop myself from entering...afterall flow of colors and emotions are free to move. I want this painting to be remain as it is in between us as a beautiful memory of sharing."
On this, it was speechless. May be don't know the answer or got angry. He just get away from where we were.Now I am sure that I have messed up the painting almost completely. And that painting is not even allowing me to go ahead.It stopped giving any response to my expressions. After few unsuccessful attempts, even I am loosing confidence now. I miss that beautiful relation among us ,the healthy communication , the love and care we both had for each other. But I think that painting lost interest or don't have any hopes from my art.What I could do? Shall I forget it forever? No Never...It can't happen. Because whatever I achieved, I learnt is a treasure. So shall I cross the boundaries? No it will mess up the painting more. So what I can do?

I kept on thinking without any output. Tried to get brand new good papers from cupboard and started working over that...but don't know why I couldn't concentrate on anything else. Even when same colors and shades are used ,the same communication, emotions were not possible this time. I also tried to open the similar old messed up paintings but no use. They all have no future even if I try my best. 

Don't know, if that messed up painting will come across again in my life and continue with the same friendship we had developed so far and help me in completing our painting. At least the same response, the same care and love....Nothing more and nothing less. It is always true that anything including a painting can get messed up when its overworked or is remained incomplete. But sometimes, truly speaking it feels like it was just a beautiful dream which broke after the night. I can't believe on my art that such a great paper can come across myself and ask me to own it. Even if its not a reality, I loved that dream and wish to be always live in that dream  forever with the same old beautiful colors and a healthy communication. Even if that painting will be not with me I will always try to enhance its beauty in my imaginations in my own world of dreams.
Because each painting is so special for its creator. It teaches and gives a new experience in the life to deal with new challenges coming towards in near future. 
But still one question remains unanswered...Why every time the painting gets messed up like this?


-Rupali Thombare.

Friday, April 24, 2020

तो... आणि ती (भाग ११)



बाबांनी दार उघडलें. समोर सार्थक त्याच्या आईबाबांसमवेत उभा होता. बाबांचा हसतमुख चेहरा अगदी क्षणभरासाठी विचलित झाला. यांना कुठेतरी पाहिल्यासारखे वाटते आहे असा विचार करत बाबानी किंचित चष्म्याची काच व्यवस्थित करून समोर उभ्या मंडळींना नीट निरखून पाहिले.पण काही आठवत नाही तेव्हा ते लगेच भानावर आले. आणि आलेल्या पाहुण्यांचे हसतमुखाने स्वागत करत त्यांना आत घेतले. निर्वीची आईसुद्धा तोपर्यंत तिथे पोहोचलीस होती. पण आलेल्या पाहुण्यांना पाहून ती चपापलीच.तिच्याही नकळत ती पुटपुटली ,
" आता ही बाई या वेळेला इथे कशी काय?"
" आई, काय झाले?"
पाण्यानी भरलेले ग्लास ट्रे मध्ये घेऊन येणाऱ्या वहिनीने लगेच आईंना असे गोंधळलेले पाहून प्रतिप्रश्न केला.
" अगं, काही नाही. पाणी दे त्यांना."
असे म्हणून आई पुन्हा हसतमुखाने पाहुण्यांना सामोरी गेली.
" निर्वीच्या आई , घर अगदी छोटंसं असलं तरी खूप चांगल्या रितीने सजवलंय हां तुम्ही. छान."
ते ऐकून निर्वीच्या आईच्या कपाळावर आठ्याची किंचित लकेर उमटली. देशमुख बाईंच्या बोलण्याला टोमणा समजावे कि स्तुती हेच तिला कळेना. पण थोडे गोड बोलून ही वेळ मारून घेऊ आणि या पाहुण्यांना परतीला पाठवावे असा विचार गोदावरीबाईंच्या मनात तरळून गेला आणि कपाळावरची ती रेषा कुठल्या कुठे हरवून गेली.कारण तिला निहाल आणि निहालच्या घरच्यांच्या स्वागतासाठी तयार व्हायचे होते. काही काळ शांतता पसरलेल्या त्या वातावरणात आतली कुजबुज जाणवू लागली. आत निर्वी तयार होऊन बाहेर येण्यासाठी उत्सुक होती पण आईच्या सांगण्यावरून वहिनीने तिला थांबवून ठेवले होते.
" अगं वहिनी , काय झाले आहे ? तो आला आहे ना ? मग झाले का तुमचे पाणी वैगरे देऊन. त्यानंतर माझी एन्ट्री होईल असेच ठरले होते ना आपले.... "
"निरू, हो गं. पण ना बाहेर तो आलेलाच नाही. कोणीतरी वेगळेच पाहुणे आले आहेत.असे एकंदरीत आईंच्या वागण्यावरून जाणवले मला. "
"काSSS य ? कोण ?"
" नक्की नाही माहित. पण आई ओळखतात त्यांना. आई बोलत आहेत त्यांच्याशी. तुला पण ओळखतात ते."
" ह्म्म्म... कोण असतील? आणि हीच वेळ मिळाली का त्यांना. मग वहिनी, आत्ता ?"- निर्वी.
" निरू, तू ती काळजी करू नकोस. आई प्रयत्न करत आहेत. ते बरे झाले ठरलेल्या पाहुण्यांना जरा उशीरच होतो आहे ते. "
वहिनीचे बोलणे ऐकून निर्वी पुन्हा एकदा संभ्रमात पडली. अर्ध्या तासापूर्वीच सार्थकचा मेसेज आला होता. ते घरातून निघाले असल्याचे त्याने कळवले होते. त्यांचे घर इतकेही दूर नाही. मग इतका उशीर कसा होतोय? आणि त्याबद्दल काही सांगितलेही नाही. आणि नेमके आत्ता कोण तडमडले असणार? आपले जुने ओळखीचे ... ? कोण ? अशा प्रश्नांमध्ये निर्वी हरवून गेली होती. बाहेर सुरु असलेली बोलणी कानांवर पडत असली तरी त्यातून काहीच तर्क काढता येत नव्हता. हातात घेतलेल्या फोनवर अचानक सुरु झालेली स्पंदने जाणवली आणि ती शहारली.
'इंतेहा हो गयी इंतजारकी...आयी ना कुछ खबर मेरे यारकी'
सार्थकचा या अशा प्रसंगी आलेला हा मेसेज पाहून ती जराशी चक्रावलीच. पुढे विचारांची गाडी पुढे सरकेल तोच त्याचे पुढचे मेसेजेस न थांबता येत गेले आणि ती डोळ्यांची पापणीही न लावता ते वाचत गेली.  
" अजून किती वेळ वाट पाहायची आम्ही तुमच्या येण्याची."
" किती तयार होशील. तू कशीही तयार झालीस तरी छानच दिसशील.'
' ये ना लवकर बाहेर.'
'खूप आतुरतेने तुझी वाट पाहतो आहे मी.'
आता निर्वीच्या जरा जरा लक्षात येऊ लागलं आणि ती ताड्कन उठून उभी राहिली.
" निरू काय झालं गं ?"
"वहिनी, नक्की सांग. बाहेर कोण आलं आहे ?" ती अगतिकतेने विचारू लागली. 
" अगं , खरंच मी पूर्वी नाही पाहिलं त्यांना कधीच. तुमचे जुने ओळखीचे आहेत. त्यांच्या गप्पांवरुन तरी इतकेच जाणवले कि तो मुलगा आणि तू एकाच शाळेत शिकत होतात आणि आता तो परदेशात असतो म्हणे. तोच आता बऱ्याच वर्षांनी आला आहे परत म्हणून भेटण्यासाठी आले ते असेच सांगितले त्या बाईंनी. फारच फॅशनेबल बाई वाटली ती मला तर....पण तू नकोस काळजी करू. तुझे पाहुणे येण्याआधी आई नक्कीच त्यांना परत पाठवेल बघ."
हे ऐकून निर्वी धीम्या आवाजात पण शक्य तितके ओरडून सांगू लागली,
" अगं वहिनी, हा तोच मुलगा आहे... सार्थक."
" हो हो सार्थक असेच काहीसे नाव सांगितले तेव्हा त्यांनी."
निर्वीचा चेहरा रडकुंडीला आला होता.
" ते लोक माझ्यासाठी तिथे ताटकळत बसले आहेत कधीपासून आणि मी? मी, इथे काय करते आहे? आईला बोलावं तू पट्कन.तिचे काय सुरु आहे कळतच नाहीय.सार्थकच येणार हे माहित होते ना तिला?मग ती अजून कुणाची वाट पाहत बसली आहे ?"
वहिनी, बाहेर जाऊन आईला बोलावणार तोच तीच लगबगीने आत आली. आणि निर्वीला म्हणाली,
" आपले पाहुणे अजून तरी आले नाहीत. पण आयत्या वेळी त्या देशमुखबाई आल्यात बघ आपल्या परदेशातून परतलेला मुलगा दाखवायला.उगाच फुशारक्या मारायची सवयच आहे त्या बाईला.  मी बराच प्रयत्न केला पण ते लोक तुला भेटल्याशिवाय जाणार नाहीत वाटते. म्हणून तू जा आणि थोडे बोलून ये. आणि जरा त्यालाही फोन करून बघ कि ते कधी येत आहेत. इतका उशीर का झाला?"
निर्वी आणि वहिनी दोघेही स्तब्धपणे उभ्याच  होत्या हे बोल ऐकून. निर्वीला काहीच उमगत नव्हते कि आई अशी का वागते आहे ते. आणि वहिनीला इतके मात्र कळून चुकले होते कि आपले चुकून काहीतरी नक्कीच चुकले आहे. त्यामुळे तीही शांतच होती.
"अगं आई , तू असे का करते आहेस गं ? सार्थकच तर तो मुलगा आहे ना ज्याच्याशी मला लग्न करायचे आहे आणि म्हणूनच तर त्यांना बोलावले आहे ना मी इथे तेही तुमच्याच सांगण्यावरून... मग आता काय झाले?"
" काय ? या सार्थकशी लग्न करायचे होते तुला? "
" होते नाही करायचे आहे . मग तुला काय वाटले ?"
" हिने मला निहालबद्दल सांगितले होते म्हणून तर आम्ही तयार झालो होतो...तूच सांगितले होते ना गं? पण मग हा काय प्रकार आहे ?"
आईने आपल्या सुनेकडे पाहत दोघीनांही जाब विचारला. निहालचे नाव ऐकताच निर्वी जितकी चकित झाली ती तितकीच चिडली सुद्धा?
" निहाल ? ते कसे शक्य आहे ? आणि हा विचार तर मी स्वप्नात देखील करू शकत नाही. "
"आणि मी तुला या गर्विष्ठ बाईच्या घरी नांदायला पाठवेन असा विचार तू आता स्वप्नातदेखील करू नकोस."
आईला राग आता अनावर होत होता. निर्वीची स्थिती सुद्धा सारखीच होती. आणि हे पाहून वहिनी पार घाबरून गेली होती.

बाहेर पाहुण्यांसोबत स्वतःही झालेल्या प्रकाराबद्दल अलिप्त असलेल्या बाबांना आतली कुजबुज ऐकू येत होती.
" काही प्रॉब्लेम आहे का ?"
सार्थकच्या बाबांनी प्रश्न केला. काय सुरु आहे ते पाहण्याकरता बाबा आत आले. घडला प्रकार आईने एका झटक्यात तिच्या शब्दांत वर्णन करून सांगून टाकला. बाबांसाठीही ही गोष्ट गोंधळात टाकण्यासारखीच होती . पण ती वेळ असे भांबावून जाण्याची नव्हती हे त्यांनी एका क्षणात हेरले आणि धीम्या आवाजात पण ठामपणे त्यांनी तिघींना बजावले,
" आता घडले ते घडले. त्यावर चर्चा करत बसण्याची ही वेळ नाही. बाहेर पाहुणे ताटकळत थांबून आहेत. आपल्या चुकीमुळे त्यांना असे सोडून इथे येणे मला ठीक वाटत नाही. मी बाहेर त्यांच्याकडे जातो. तुम्हीसुद्धा २ मिनिटांत मला तिथे हजर हव्या आहात. त्यांना आपण आमंत्रण दिले आहे तर कार्यक्रम करावाच लागेल. पुढचे पुढे बघू"
आईचे बोलणे क्षणभरही ऐकून न घेता आणि इतर कुणाकडेही न पाहता बाबा तडक बाहेर निघून गेले.
"आपले तर या घरात कोणीच काही ऐकत नाही . बाईसाहेब, चला आता. घातलेला गोंधळ निस्तरायला तर हवा आता."
 आई दुःखी कष्टी होत उभी राहिली आणि नाराजी दाखवत हात झटकून त्यांच्या पाठोपाठ निघून गेली. वहिनी नेहमीप्रमाणे हात मुठीत धरून तशीच उभी होती. तिलाही काय करावे ते सुचत नव्हते. तिच्यामुळे झालेला गैरसमज आणि त्यामुळे उडालेला हा गोंधळ आता प्रकर्षाने तिला जाणवत होता. पण माफी मागण्याची सुद्धा आता सोया उरली नव्हती. आणि माफी मागायची तरी कुणाची हा सुद्धा एक प्रश्नच. "
अशा विचारांतच हरवून गेलेली असताना निर्वी मात्र पुन्हा एकदा चेहऱ्यावर हास्य पांघरून दरवाजाच्या दिशेने निघाली. तिच्यापाठोपाठ वाहिनी बाहेर आली. 
निर्वीला पाहताच सार्थक पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडला. त्या पिवळ्या साडीमध्ये ती एखाद्या सोनपरीसारखी भासत होती त्याला. त्यानेच गिफ्ट केलेले नाजूक सोनेरी डूल मंद लयीत डुलत होते. त्याच्या आईच्या चेहऱ्यावर मात्र किंचित देखील कौतुक नव्हते. पण तरी त्यांनी निर्वीला जवळ बोलावून शेजारी बसवले. इकडची तिकडची चौकशी करत बराच वेळ होऊन गेला. खूप गप्पा झाल्या पण त्यांत देशमुखबाईंचा श्रीमंती आणि परदेशातून आलेला मुलगा या बद्दलची घमेंड प्रकर्षाने जाणवून येत होती. त्याचे वडील अधून मधून सर्व सांभाळण्याचा आव आणत परंतु या सर्वाचा बराच परिणाम निर्वीच्या आईबाबांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. आणि निर्वी -सार्थक ? त्यांना तर कशाचे भानच नव्हते. आणि या सर्वाची साक्ष बनून वहिनी तिथेच गुमान उभी होती. 
बोलता बोलता मिस्टर देशमुखांनी विषय काढला ,
"खरेतर सार्थकसाठी कितीतरी उच्चशिक्षित , श्रीमंत मुलींची स्थळे गेला २ वर्षांपासून येत होती . दिसायला तर एकापेक्षा एक. तसा सार्थकसुद्धा कुठे कमी नाही ना? पण आम्हाला वाटले त्याला इतक्या लवकर लग्न करायचे नसेल म्हणून आम्ही कधी विषयच काढला नाही . पण गेल्या आठवड्यात इथे आल्यावर हा असा अचानक या दोघांच्या प्रकरणाबद्दल सांगू लागला तेव्हा तर आम्ही थक्क झालो . पण शेवटी आमच्यासाठी'त्याचा आनंद महत्त्वाचा ... आणि तुम्हीही बोलावून घेतले तेव्हा आज भेटण्याचा बेत आम्ही आखला. "

काहीसे चेहऱ्यावर हसू आणत निर्वीचे बाबा त्यांचे बोलणे ऐकत असतानाच देशमुख बाईंनी मध्येच नाक खुपसले. 
" हो ना . अगदी धक्काच दिला हो याने तर आम्हांला . पण काय करणार? तशी तुमची निर्वी बरी आहे. आम्ही शोधलेल्या सर्वपरीने कितीतरी चांगल्या होत्या पण शेवटी ज्याची त्याची आवड, नाही का? आणि जर आता त्याचीच इच्छा असेल तर आम्हाला पुढे जायला हरकत वाटत नाही.आम्ही इतर सर्व विसरून आनंदाने या लग्नात सामील होऊ.  फक्त लग्न आमच्या पद्धतीत मोठे थाटामाटात व्हावे अशी आम्हा दोघांचीही इच्छा. एकुलता एक मुलगा आहे हो हा आमचा . "

कार्यालयात साधी नोकरी करणारे निर्वीचे बाबा यावर निरुत्तरीत झाले . परंतू , निर्वीची आई मात्र शांत राहिली नाही . 
"खरे आहे ताई तुमचे . तास धक्का तर आम्हांलाही आमच्या निर्विने दिला आहे. तुमचे सर्व रास्त असेलही पण निर्वीदेखील अजिबात कशात कमी नाही. आमच्या जातीमध्ये तर कितीतरी जण कधीपासूनच मागे लागलेत. एकापेक्षा एक... हिने पण अजून काही पाहिले नाही म्हणून तर हे सर्व इथवर पुढे गेले आहे .  पण आम्ही तुमच्यासारखा लगेच निर्णय घेऊ शकत नाही . २ दिवसांत कळवू आम्ही .तुम्ही येऊ शकता आता . "
गोदावरीबाईंच्या बोलण्यातली नाराजी त्या तिखट वाक्यातून सहज उमटत होती. निर्वीला मनातल्या मनात आईबद्दल राग येत होता . कारण सार्थकच्या प्रेमात आता ती पूर्णपणे विलीन झाली होती. सार्थकच्या आईबाबांसाठी अशाप्रकारचा नकार हा एक दुसरा धक्का होता . ते पुढे अधिक काळ न घालवता निरोप घेऊन तडक तिथून निघाले . हे असे काही होईल याची कल्पनाही सार्थकने केली नव्हती म्हणून तोही नाईलाजाने त्यांच्या पाठोपाठ निघून गेला. सर्व पाहुणे अशाप्रकारे निघून गेल्यावर निर्वीच्या आईला बोलण्यासाठी रान मोकळे झाले आणि ती पुन्हा पुन्हा निर्वी कशी चुकली हे सर्वांना सांगू लागली. बाबा तर अजूनही वेगळ्याच चिंतेत होते. निर्वीलाही आता राग अनावर होत होता . पण ती काही न बोलता तिच्या खोलीत रडत निघून गेली. आईच्या तोंडाचा पट्टा अजूनही सुरूच होता हे पाहून आतापर्यंत शांत असलेले बाबा कडाडले ,
" खूप झाले आता. विषय संपला आहे तेव्हा रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागा जरा ."
आणि लगेच गोदावरीबाईंनी आपला मोर्चा वहिनीकडे वळवला.
 "सुनबाई , ऐकलेस ना ? चला आता कामाला.हा सर्व जो गोंधळ आज घडला तो फक्त तुझ्यामुळे . नीट ऐकले नाही ...समजून घेतले नाहीस ... अर्धे अधिक काहीतरी ऐकून स्वप्नात गुंतवले आम्हांला आणि प्रत्यक्षात विचित्रच घडत होते मागे."
खरेतर आईंच्या बोलण्यात चूक नाही हे सरितालाही चांगलेच ठाऊक होते आणि तिला या गोष्टीचे खूप वाईट वाटतही होते . तिची चूक केव्हाच तिच्या लक्षात आली होती. पण तरीही तिच्या मनात जे काहूर माजले होते ते फक्त आणि फक्त निर्वीच्या भविष्याला घेऊन . आज जेवताना सर्वांच्या चेहऱ्यावर एकच  प्रश्न दिसत होता, 
"आता पुढे काय ? "

-रुपाली ठोंबरे. 

                                           (भाग १२ वाचण्यासाठी )

Thursday, April 23, 2020

एक पुस्तक...जणू भरलेलं आभाळ


पान पान भरल्या आभाळी  
सावळी वर्ण पाखरे
स्वारस्याचे थवे आगळे
मनामनांचे आरसे

अक्षरमोत्यांची कृष्ण-पागोळी
बरसत विचारांचे ओघ सारे
रंगांचे कधी कवडसे सांडले
इंद्रधनू-चित्र बोलके मग उमटले

किती शब्द अन किती ओळी
ओंजळीत झेलले बोधक सारे
काय सुटले अन काय गवसले
हिशेब नाही खऱ्या सुखांचे

क्षोभ कधी तर कुठे प्रीत कोवळी
पर्व वाचले मनात साठले 
भावनांचे कवन खोल दाटत गेले
वाचूनि वेचले...वेचूनि साचले
साचूनि मग घडले...
घडले मी,अन घडवत गेले...शब्दांच्या ओळी
शब्दांच्या ओळी...सकाळ-सायंकाळी 
रोज नवी रांगोळी भरल्या मनाच्या द्वारी 

पान पान भरल्या आभाळी
सावळी वर्ण पाखरे
स्वारस्याचे थवे आगळे
मनामनांचे आरसे

- रुपाली ठोंबरे. 



Friday, April 17, 2020

अविष्कार .


रात के ग्यारह बज गए।  काली अँधेरी रात तारोंकी चादर ओढ़े धरतीपर छाँ गयी थी।  ठंडी हवा के झोंकेसंग आती प्रवेशद्वार पर बिछाये मधुमालतीके फूलोंकी सुगंध मन को महका रही थी।  जैसे वोह आहट दे रही हो कि 'रुपाली,अब बहुत रात हो चुकी हैं।  सो जाओ। " अब घर में सब लोग सो चुके थे। बेटेके सो जानेका यकीन होतेही मैं चुपचाप उस कमरे की ओर बढ़ी। दो दिनसे भलेही मैं घर के कामोंमें लगी पड़ी हो पर ध्यान सिर्फ इस कमरे की ओर था। एक ऐसा कमरा... जहाँ अक्सर मेरे सिवा किसी औरका जाना-आना होताही नहीं था। पर मुझे इस कमरेसे एक खास लगाव था... हमेशासेही।  

कमरेकी नजदीक पहुँचतेही मैंने धीरेसे दरवाजा खोला।  कमरेमें चारों तरफ घनघोर अँधेरा फैला हुआ था। पर खिडकीके कोनेसे आती रोशनीके एक किरनके लकेर में मैंने उसको देख लिया।  परसो मेरे साथ ही वोह घर आया था | और जबसे आया तबसे  कमरेमें बंद करके रखा गया था। पर उसने एक उफ्फ तक नहीं की थी।  मैं उसको देखते हुए ही आगे बढ़ी और लाइट्स  शुरू कर दी।  पल में अँधेरा रोशनीमें समाँ गया और कमरेकी चारों दीवारें रोशनीसे चमक उठी।  कमरा हमेशा की तरह थोड़ी बिखरी स्थिति में ही था।  पर मैंने बिना किसी और चीज़ की तरफ ध्यान दिए सीधे जाकर उसके सामने खड़ी हो गयी।  वोह मेरी तरफ ही देख रहा था। मैं भी चारों ओरसे उसको निहारती रही। ... जाने कितनी बार। वोह थोड़ा सहमा हुवासा था। थोड़ा डर भी नज़र आ रहा था उसके चेहरेपर, न जाने अब ये क्या करनेवाली होगी। आखिर आज उसका भविष्य मेरेही हाथोमें लिखा था। डर तो मुझे भी लग रहा था। पर उससे कहीं ज्यादा  उत्सुकता थी। कुछ लगावसा हो गया था उसके साथ।मेरा एक अनुरागही था जिसके कारण वोह मेरे साथ था। आज मैं उसपर अपने मन के सारे रंग लुटा देना चाहती थी। मैं न कोई बड़ी चित्रकार थी नाही मूर्तिकार लेकिन आज मैं उसको एक नया रूप देनेवाली थी। मैं और आगे बढ़ी। मैंने अपना हाथ उसके चेहरेपर रखकर संवारना चाहा , तब एहसास हुआ की कितनी कठिनाईयोंका सामना करके वोह यहाँ मेरे पास पहुंचा था। आज मुझे सिर्फ मुझे उसके साथ सही न्याय करना था। वोह आशासे सिर्फ मुझे देखे जा रहा था। उसकी चेहरेपर और कोई भाव नहीं था । वोह पत्थर के मुरत जैसे बिना पलक झपके सिर्फ देख रहा था। यह देखते न जाने क्यू ,मेरे चेहरेपर एक पलके लिए मुस्कान आयी। मैंने आगे चलते कमरे की खिड़की खोल दी। आसमान में पूनम का चाँद खिला हुआ था। बदलोंमें से वोह भी हमें निहार रहा था...आज वह रात , वोह चाँद सारे गवाह बनने वाले थे एक खुबसुरत लम्हेके । 

कमरे के एक कोनेवाली अलमारीसे कुछ पुरानी किताबें हाथ लगी। जमीं धूल साफ करते मैं उसके पास वापस आयी। कितनी देर तक पन्ने पलटती रही। उसकी तरफ नज़र जाती तो और कुछ सोचने लगती। पर उसको किसी चीजका फरक नहीं था। वोह सिर्फ मेरी हलचल देखे जा रहा था। न कुछ बातें ना कोई हरकत। बड़ी देर बाद कुछ सोचकर मैंने पहला निशान उसके चेहरेपर बनाना चाहा। पर कुछ गलत हुआ। उसका गिरा चेहरा सब बयान कर रहा था। पर झटसे मैंने संभाल लिया उसको भी... और अपने आपको भी। सारे बनाये निशान मिटा दिए। वह फिर खिल उठा नयी तमन्ना के साथ। मैनेभी कुछ सोचा और बड़ी आत्मविश्वास के साथ आगे बढ़ने लगी। लाल, हरा ,पीला ऐसे अनेक रंग अलग अलग घोल दिए गए। और फिर शुरू हो गयी एक नयी अनोखी होली। एक के पीछे एक अलग तरहोके रंग मैं उसपर बरसाने लगी। वोह भी हर रंग के साथ अपना रूप बदलता गया। मेरी हर क्रियापर उसकी प्रतिक्रिया आती रही और फिर खेल और गहरा होता गया। मेरी हर स्पर्शसे वोह चहक उठता। उसकी हर खुशीको देखकर यहाँ मैं भी फूली न समाँती। एक अनोखा खेल चल था उस बंद कमरेमें। जिस समय पूरी धरती गहरी नींद के सायोंमें सपनोंमें लिपटी सो रही थी...पर यहाँ मैं, उस वक्त किसी रातरानी की तरह मगन हो गयी थी अपने बुने हुए सपनोंको हकिकतमें उतारने के लिए। बिना कुछ कहे मेरी कल्पनायें , मेरी ख़ुशी , मेरे सपने ,मेरा मन, मेरी भावनायें सामने खड़े चेहरेपर मैं चित्रित करे जा रही थी। नये रंग ,नयी छटाएँ, नए आकार ... सबकुछ नया था बिलकुल पहली बार... हम दोनोंके भी लिए। मैं नशेमें अपना हर रंग उसपर न्योछावर करे जाती और वोह उस हर रंगको झेलते हुए पलपल मेरा साथ देता इन रंगोंकी दुनिया में खुदको समाये लेता गया। पल....घंटा...प्रहर...समय बीतते चले जा रहा था। मैं सबकुछ भूलकर कहीं खो गयी थी। 

पर कहिना कही रुकना पड़ता है ना? किसी सूंदर अविष्कार के लिए ठीक समय, ठीक जगह रुकना भी ज़रूरी होता है। इन सब सोच में मैं डूबी थी। तभी अचानक दूरकी मस्जिदसे अजानके स्वर कानोंपर पड़े वैसे मैं तुरंत उठ गयी। खिडकीकी ओर चलती गयी। बाहर नज़ारा पूरी तरह से बदल चूका था। रात का अँधेरा अभी सुरजकी रौशनी की चपेटमें आकर गायब हो गया था। सामनेवाली पहाडीके बीचमें से निकलते सूरज की किरने एक नयी सुबह का इशारा दे रही थी। आँगन में गिरे पारिजातकी खुशबूसे सारा समाँ महक उठा था। पंछी चहकते हुए आकाशमें उड़ान ले रहे थे।  और आकाश... वह तो अब रंग चूका था। मानो रात के काले पन्नेपर किसी महान चित्रकारने अपनी कलाकारीसे सारे रंग भर दिए हो और ये सृष्टीका और एक नया अविष्कार सामने आया हो। लेकिन यह अविष्कार मैंने पहलेभी कहीं देखा था। कहाँ ?सोचते सोचते कमरे में वापस आयी। आकर फिरसे उसके सामने खड़ी हुयी तब एहसास हुआ ,वोह अविष्कार तो यहाँ मेरे सामनेही हैं जो कल रातभर मेरा साथ देता रहा... ये वोही कॅनव्हास... मेरी रंगोंकी बौछार से सुंदरता की सीमा पार कर गया हो। 

आज... इस समय भी वोह बड़ी शानसे सामने खड़ा है.... एक मौन संवाद करते हुए। उस बंद कमरेसे निकलकर यहाँ कला दीर्घा (आर्ट गैलेरी )में प्रवेश कर वह खुदको काफी खुशनसीब समझ रहा है। ख़ुशी से पागल हो गया हो।  और क्यों न हो ? आज वोह सिर्फ सफ़ेद, मौन कॅनव्हास नहीं है तो एक कहानी बयान करता चित्र बन चूका हैं। 

पल....मिनिट...घंटोंतक ... वोह मुझे और मैं उसको निहारती रही। पर आज उस नज़र में कृतज्ञता , संतुष्टि, पूर्ति छुपी हुयी थी जो मुझे नि:सन्देह नज़र आ रही थी और शायद उसको भी। 


- रुपाली ठोम्बरे

Monday, April 6, 2020

सगळीकडेच हाहाकार !


" अरे, आज अचानक काय झाले काही समजलेच नाही. एकाएकी सभोवताली अंधार दाटून आला. वेळ पाहिली तर अजून ही तर माणसांची झोपण्याची वेळ नाही. पण तरी सर्व लाईट्स बंद झाले.आणि एका क्षणात पुन्हा तोच सभोवताल दिव्यांनी झगमगून निघाला. नक्की काय सुरु आहे ?"
जमलेल्यांपैकी एकाच्या या प्रश्नावर दुसरा लगेच उत्तरला ,
" अरे , या देशाच्या पंतप्रधानांनी जनतेला दिवे लावून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवण्यास सांगितले होते. तेच सध्या सुरु आहे."
"अरे पण इतकी एकता आहे या देशात ? तर मग आपला निभाव लागणे अशक्यच, नाही का ?"
जमलेल्या कोरोना विषाणूंच्या घोळक्यातून त्यांचा म्होरक्या पुढे बोलू लागला .
" हो ती चिंता आहेच. किती आशेने आपण सर्व या देशात आलो होतो. पण काय झाले ? आपण हातपाय पसरवायला सुरुवात करताच मध्येच एके दिवशी अचानक रस्त्यांवरून लोकच गायब झाली. दिवसभर मानवी शरीर मिळालेच नाही त्यामुळे आपल्यापैकी अनेकांचा मृत्यू झाला. त्यानंतर टाळ्या , थाळ्या वाजवून किती तो नाद घुमला आसमंती.पुढे देशात अगदी २१ दिवसांचा लॉकडाऊन. मंदिरे , दळणवळण सारे सारे थांबले आपल्याला थांबवण्याकरता . देशातला प्रत्येक नागरिक जमेल तशी मदत करत आहे.हे सर्व पाहून एक वेळ वाटले आता तर इथून काढता पाय घेतला पाहिजे. "
" पण असे अनेक मूर्ख लोक पण आहेत याच देशात ज्यांना अजून आपल्या शक्तीची प्रचिती आली नाही . म्हणूनच ते कुणालाही न जुमानता खुशाल बाहेर पडत आहेत."
" आणि हो सध्या तसेच काही जण आपल्या हाती लागत आहेत . "दुसरा आनंदाने उद्गारला.
" अगदी बरोबर . तेच म्हणत आहे मी. पण ते फार काळ टिकणार नाही . इथले प्रशासन अजून कठोर कारवाई सुरु करतील आणि त्यांनाही वठणीवर आणतील. इथे येण्याआधी वाटले होते कि इतक्या मोठ्या लोकसंख्येचा देश. अगदी सहज हरवू शकणार पण याला . पण कुठेतरी ते भाकीत खोटे ठरत आहे."
आपल्या म्होरक्याच्या बोलण्यावर एक कोरोना चिंतेच्या स्वरात उत्तरला ,
" मग आता ?"
तसा त्यांच्यातील एक ज्येष्ठ कोरोना म्हणाले ,
"आता काय ? आपल्याला वाट पाहावी लागणार येथील काही देशद्रोह्यांकडून एखादी चूक झाली तर. पण मला आता तशी शक्यता कमीच  वाटत आहे . इथले शासन , प्रशासन आणि जनता सुद्धा न हरणारी आहे,जिद्दी आहे .फक्त आपणच नव्हे तर जातीवाद', धर्मवाद ,राजनीती, गरिबी  असे  इतर अनेक शत्रू या देशात कायम वावरत असतात आणि अजूनही आहेतच, पण तरी त्यांचा विश्वास ठाम आहे. आपल्या विरोधात लढाई सुरु केली आहे तर यात विजय मिळवणारच अशी शपथच घेतली आहे जणू. एका उत्कृष्ट  नेतृत्वाखाली सर्वजण एकत्र बांधले जात आहेत.समाजातील एका वर्गावर आपण आक्रमण केले तर लगेच दुसऱ्या वर्गातील लोक विविध तऱ्हेच्या सहकार्य करत धावून येतात . आपण लोकांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहोत हे लक्षात येताच आजचे प्रकाशपर्व उदयास आले. ज्यामध्ये एक नवी ऊर्जा मिळाली आहे या देशाला. अजून काही दिवस उरले आहेत. तोपर्यंत जर कोणीच बाहेर पडला नाही तर मानवी शरीरांअभावी आपले अनेक कोरोना नष्ट होतील. मग त्यापूर्वीच इथून पाय काढलेला बरा. तुम्हाला काय वाटते ?"
आपल्या पेक्षा वयाने मोठया असलेल्याचे असे विचार ऐकल्यानंतर तो म्होरक्या पुढे म्हणाला ,
" काही दिवस पाहू काय होते आहे ते ? हे लोक जर असेच घरामध्ये राहिले तर इथे आपला टिकाव लागणे कठीणच . मग तेव्हा आपल्याला इथून निघून जावेच लागेल. इथे सर्वांचे प्रयत्न पाहून मला तरी आता वाटू लागले आहे कि आपण या युद्धात हरू. तरी हाताच्या बोटांवर मोजता येण्यासारखे लोक आपल्याला मदत करतीलच . कदाचित जर तोच  माणूस शहाणा झाला नाही तर आपला निभाव लागणे शक्य होईल.नाहीतर आपले काही खरे नाही. आपण हरणार आणि भारत जिंकणार ."
बघा , त्यांच्याही जगतात तेही मानत असतीलच कि माणसाचे घरामध्ये राहणे हाच त्यांचा विनाश आहे. मग ही साधी गोष्ट आपल्याला का बरे कळू नये.कोरोनाला हरवायचे असेल तर आपण एका ठिकाणी थांबलेच पाहिजे अन्यथा सर्व काही कायमचे थांबून जाईल . लॉकडाऊन चे काही दिवसच उरले आहेत. तेव्हा सर्व नियमावलींचे काटेकोर पालन करूया. घरीच राहूया ... स्वच्छता बाळगूया... विनाकारण घराबाहेर पडणे टाळूया...डॉक्टर आणि पोलिस यांच्याबद्दल आदर दाखवूया ... घरातल्यांबरोबर नेहमी मिळत नाही तो वेळ आता मिळाला आहे . तो आनंदात घालवूया... आणि स्वतः सुरक्षित राहून देशाला वाचवूया ... कोरोनाच्या विळख्यातून या जगाला वाचवूया .

- रुपाली ठोंबरे. 

Saturday, April 4, 2020

This Too Shall Pass


आज तब्बल १२ झालेत माणूस आपल्याच घरात अडकून पडला आहे पण कशासाठी ? तर स्वतःला आणि आपल्याच प्रियजनांना एका कोरोना नामक राक्षसी शक्तीपासून वाचवण्यासाठी. एकमेकांपासून दुरी हा एकमेव उपाय आहे याला आपल्यापर्यंत पोहोचण्यापासून रोखण्याचा. काही मूर्ख अपवाद वगळता देशातला प्रत्येक जण या २१ दिवसांच्या लॉक-डाऊनमधिल नियमांचे अगदी काटेकोरपणाने पालन करताना दिसत आहे. खरेतर विशेष कौतुक वाटते ते लहानग्यांचे. दिवसभर शाळा , थोडा अभ्यास त्यानंतर खेळ असा त्यांचा साधारण नियमित दिनक्रम... मजामस्ती करत अक्खा दिवस कसा पार पडतो हे त्यांनाही कळत नाही. या रोजच्या कार्यक्रमात एक- दोन दिवसांत येणारी सुट्टी म्हणजे आनंदच आनंद . पण हा सर्व आनंद लॉक-डाऊनमध्ये मिळालेल्या सुट्ट्यांमध्ये मात्र त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. आणि खरंच फार कठीण आहे तासभरही एका ठिकाणी शांतपणे न बसणाऱ्यांना असे १० दिवस घराबाहेर जाऊ नकोस असे सांगणे आणि त्यांनीही ते समजूतदारीने पाळणे. नोकरीधारकांना ऑफिसमध्ये जाण्यास मनाई असली तरी वर्क फ्रॉम होम च्या माध्यमातून थेट ऑफिसच त्यांच्या घरी अवतरलेले दिसते. या सर्वातून वेळ काढत आपल्या मुलांसोबत वेळ घालवणे हेही एक कौशल्यच.

आमच्या घरी सुद्धा काहीसे असेच दृश्य... ५ वर्षांचा ओम शाळेतील परीक्षा रद्द होऊन १५ तारखेपासूनच घरी. सुरुवातीला कोरोनाचे इतके प्रस्थ मुंबईत वाढले नव्हते त्यामुळे दिवसभर खाली गार्डन मध्ये मुलांचा नुसता हल्ला-गुल्ला. पण हळूहळू हे चित्र बदलत गेले. वातावरण अधिक गंभीर होत गेले. सोसायटीच्या आतमध्ये सुद्धा वर्दळ विरळ होत गेली. मग घरातल्या घरात मुलांना रमवण्याचे प्रयत्न सुरु झाले. सारे बैठे खेळ मांडले गेले... कधी चित्रकला कधी आणखी काही. या दिवसांत ओमची एका खेळासोबत खास मैत्री जमली. जगाच्या नकाशावर देशांचे कोडे आणि त्यानंतर त्या परिपाटावर वेगवेगळ्या देशांच्या झेंड्याची अचूक मांडणी. तासनतास या खेळात तो रमून जायचा. सुरुवातीला आजी, आबा, मी ... सर्वांकडून  मदत घेऊन तो ती मांडणी पूर्ण करायचा पण नंतर आमच्या शिवायच तो खेळ पूर्ण होऊ लागला . दिवसेंदिवस कोरोनाच्या बातम्या वाढू लागल्या. इतर देशांचे बदलते रूप पाहून आपल्या देशात असलेली 'सोशल डिस्टन्सिंग' ची निकड अधिक तीव्रतेने जाणवू लागली. रोज टीव्हीवर जगाच्या नकाशावर कोरोनाग्रस्त देशांचे गणित आणि समोर ओमच्या खेळातील तेच सुंदर देश... या सर्वाला पाहता पाहता एक कल्पना सुचली...आणि जन्म झाला एका नव्या कलाकृतीचा.

खरेतर सगळीकडे पहिले तर कोरोनाची भीषणता , त्यामध्ये हतबल झालेले देश, काय करावे आणि काय करू नये याबद्दल जनजागृतीकरण ... असेच काहीसे दृश्य. मी काही वेगळे करण्याचे ठरवले. 'The Secret' मध्ये सांगितल्याप्रमाणे जितका सकारात्मक विचार करू तितके चांगले घडू शकेल हा विचार डोक्यात आला आणि जगाच्या येणाऱ्या नव्या भविष्याचे रूप डोळ्यांसमोर आले... नक्कीच कोरोनाच्या हल्ल्यानंतर मुक्त झालेली पृथ्वी,जनजीवन अगदी लगेच पूर्वस्थानावर येणार नाही पण तरी या कोरोनापासून भविष्यात मिळवलेली दुरी हे एक खूप मोठे यश असेल. दिवसभर कंटाळून सर्वांना त्रस्त करणाऱ्या ओमलाही मी यात सामिल करून घेतले. झेंड्यानी पृथ्वीवरील जनजीवन दाखवणे हि काहीशी त्याची कल्पना. मागे 'डॉट टू  डॉट ' या माझ्याच प्रदर्शनाच्या वेळी बिंदू , वर्तूळ यांबद्दल मनात विशेष रुची. शिवाय पुथ्वी गोल...या भयानक विषाणूचा आकार गोलाकारच. सर्व काही अगदी छान जुळून येत होते. नकाशातील प्रत्येक ध्वजांचे रंगकाम म्हणजे फार वेळ घेणारे आणि तितकेच महत्वाचे. ती पूर्ण जबाबदारी ओमने स्वतःच्या खांद्यांवर घेतली. मी फक्त झेंडे काढून दिले पण त्यांना खरे रूप दिले ते याच चिमुकल्यानेच. अगदी कोणता देश कोणत्या दिशेला .आसपासचे देश कोणते . त्यांचा आकार ... हे सर्व लक्षात घेऊन सर्व मांडण्याचा त्याचा आग्रह . किती उत्साह आणि धीर होता तेव्हा त्याच्यामध्ये. उरलेल्या जागेत आम्ही डोंगर आणि जंगलांचे दर्शन घडवले. महासागरांचे निळे पाणी दृष्टीक्षेपात आले आणि चित्रातली पृथ्वी आपलीशी वाटू लागली . ओमला तर भारीच मज्जा येत होती. पृथ्वी हे एक जग आणि कोरोना विषाणू ये दुसरे... ते विषाणू आपल्या मातीवर उतरले आणि संपूर्ण दुनियेत हाहाकार झाला. डॉक्टर्स , नर्सेस दिवसरात्र प्रयत्नांची शिकस्त करत आहेत. शासन , प्रशासन आणि जनता सर्वच एकीने लढत आहेत. या सर्वाना नक्कीच यश मिळेल. आणि हा विषाणू पृथ्वीपासून कितीतरी दूर जाऊन पडेल. आणि पुन्हा येण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्याला शिरकाव करण्यास वाव मिळणार नाही एवढी सोशल डिस्टन्सिंग निर्माण झाली असेल या दोन जगांत. तीच पोकळी निर्माण केली आहे आम्ही दोघांनी. दिवसभर सगळीकडे कोरोना कोरोना पाहून मुलांच्याही मनात काहीशी भीती निर्माण झाली आहे. कोणी भाजीपाल्यासाठी बाहेर जाऊ लागले कि अडवतात कि "बाहेर कोरोना आहे.नका जाऊ." चित्रातील कोरोनाची मालिका काढत असतानाही ओम विशेष काळजी घेत होता कि चुकूनसुद्धा त्याचा स्पर्शही नको आपल्या पृथ्वीला.

आणि खरेच हेच भविष्य आज जगातील प्रत्येक देश, प्रत्येक माणसाला लवकरात लवकर हवे असेल. हेच त्याचे स्वप्न असेल ... "Today's World's Dream "... म्हणजे "आजच्या जगाचे स्वप्न" जे लवकरात लवकर हकिकतेत उतरावे हीच यावेळी एकमेव प्रार्थना.जरी काही कारणांमुळे यावर पूर्ण मात करता आली नाही तरी त्यातून बरेच काही शिकून पुढे सावधानता बाळगणे केव्हाही उत्तम.हे एक जगमान्य सत्य  आहे कि जगात अशी कोणतीच परिस्थिती नाही जी कायम टिकून राहील ... वेळ ही सतत बदलत असते . आज दुःख आहे तर उद्या सुख नक्कीच वाट्याला येईल. परंतु अशा बिकट प्रसंगी गरज आहे ती संयमाची आणि धीराची . विचार सकारात्मक ठेवा ... घरीच राहा ... शक्यतो घराबाहेर अधिक पडू नका... नियमांत राहून आजही आणि सर्व ठीक झाल्यावरही जमेल तेव्हढी मदत करण्याचा प्रयत्न करा ... म्हणजे नक्कीच हे  जग अंधःकारातून प्रकाशाकडे जाण्यास सक्षम ठरेल यात कणभरही शंका नाही.आणि आपणा सर्वाना हेच हवे आहे. हो ना ?
या कोरोना नामक सूक्ष्म परंतू अतिभयानक राक्षसांपासून या मानवजातीला वाचवायचे आहे.
त्याला हरवायचे आहे आणि आपल्याला जिंकायचे आहे .
पण हे एकट्या मनुष्याच्या हातात अजिबात नाही. म्हणून शरीराने दूर राहूनही मानाने मात्र एकत्र येऊ.
एकत्र लढूया म्हणजे विजय आपल्याच हातात आहे.


- रुपाली ठोंबरे