दुर्गेचे पाचवे रूप 'स्कंदमाता' या नावाने ओळखले जाते. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'विशुद्ध' चक्रात स्थिर झालेले असते. आपण एकाग्र मनाने
पवित्र होवून मातेला शरण येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या भवसागरात
दु:खापासून मुक्ती मिळवून मोक्षाचा मार्ग सुलभ करण्यासाठी यापेक्षा चांगला
पर्याय दुसरा नाही.
सूरासूर संग्रामे सेनापती देवतांचे
कुमार कार्तिकेय बाळ हे स्कंदमातेचे
श्वेतकांती पद्मासना रूप पाचवे दुर्गेचे
चतुर्भूजा सिंहासनी मार्ग सुकर मोक्षाचे
द्विहाती घेऊन कमळे रूप हे वरमूद्रेचे
सुर्यमंडले अधिष्ठार्ती तू , तेज अलौकिक भक्तांचे
तव उपासनेत दडले गूढ इच्छापूर्ततेचे
मृत्युलोके परमशांती-सौख्य प्राप्ततेचे
रुपाली ठोंबरे.
कुमार कार्तिकेय बाळ हे स्कंदमातेचे
श्वेतकांती पद्मासना रूप पाचवे दुर्गेचे
चतुर्भूजा सिंहासनी मार्ग सुकर मोक्षाचे
द्विहाती घेऊन कमळे रूप हे वरमूद्रेचे
सुर्यमंडले अधिष्ठार्ती तू , तेज अलौकिक भक्तांचे
तव उपासनेत दडले गूढ इच्छापूर्ततेचे
मृत्युलोके परमशांती-सौख्य प्राप्ततेचे
रुपाली ठोंबरे.
प्रस्तावनेसाठी आभार : http://mannmajhe.blogspot.in/