Wednesday, March 25, 2015

"आठवण".....हरवते मी तुझ्या सहवासात ।।

( "आठवण " ही प्रत्येकाच्या जीवनात असलेला अमुल्य भाग. जे भूतकाळात घडले किंवा जे दूर काही घडत असेल त्या सर्व चांगल्या-वाईट क्षणांची मालिकाच हृदयाच्या कप्प्यात उभी राहते  मग आपले वर्तमान त्या आठवणींच्या सानिध्यात तासान तास हरवून जाते. )


हळूच येते ती मनात
दूर घेवून जाई जुन्या बनात
कधी हसू , कधी रडू , भाव पालटते क्षणात ।।

काळ जुना आज नवा , भासतो तिच्या स्पर्शात
कधी नको तो कधी हवाहवा , गुंतते मन तिच्यात
दूर कुठेतरी, मागे कधीतरी, सांडलेले क्षण थांबते मी आज वेचत ।।

डोळ्यांत पाणी कधी ओठी वाऱ्याची गाणी , जीव झोके घेतो हृदय-कप्प्यात
भोवताली जग सारे, नाही माझे, वाटे मी अनोख्या दुनियेत
सखी तू माझी, "आठवण" राणी, हरवते मी तुझ्या सहवासात ।।

-  रुपाली ठोंबरे.

4 comments:

  1. आठवणी म्हणजे म्हातारपणी दिवसभर दिसणारा फ्री चलचित्रपट. म्हणून सगळ्यांना सांगतो आठवण्या योग्य आठवणी बनवा रे, योग्य आठवणी बनवा.

    ReplyDelete
  2. थांबते की थांबतो? हरवते की हरवतो?
    ओळी तोडून वेगळ्या करणे

    ReplyDelete

Blogs I follow :