त्या नयनांच्या पाकळीत साठलेले भाव सारे
दव बनुन तयांची चमक आणखी वाढवणारे ।
नाजूक काजळी रेघांत त्या, विश्वच व्यापणारे
स्वच्छंद वावरणाऱ्या बाहुलीत, दिसे बघणाऱ्याचे रूप खरे ।।
- रुपाली ठोंबरे
पाहुनि या लोचनी ऐकुनि नाना ध्वनी, तरंग उठले अंगावरी त्या मुग्ध स्पर्शातुनी, गंधित होते सारे फुलता ती रातराणी, चांदण्या राती भेटता दो मधूर एका क्षणी, कधी ओठांवरी हासू कधी नयनी पाणी, स्मरता अताशा पुनर्जन्मल्या आठवणी, कधी रेखाटल्या रेषा कधी शब्दरुपातुनी, साकारले चित्र जे अनुभवले या कवीमनी, जे न देखिले कधी स्वप्नी, ते भाव सारे आज उमटले मनी …
रुपालीजी आपल्या ब्लॉगला भेट दिली. माफ करा पण आपल्या लेखनात खूप सुधारणा व्हायला हवी. चारोळी सुद्धा पाहिल्या. आपण लिहिल्यात त्याला चारोळी म्हणतच नाहीत. चारोळी हि चार ओळींची एक परिपूर्ण कविता असते. दीर्घ कवितेचा आशयसुद्धा एक चारोळी कवेत घेवू शकते. चंद्रशेखर गोखलेंच्या चारोळी नक्की वाचाव्यात. माझी ' नागव्यांच्या बाजारात ' हि चारोळीसुद्धा नक्की पहावी. http://maymrathi.blogspot.in/2014/02/mrathi-poem.html
ReplyDeleteMay be u r right.Thanks for comment.
Delete