Sunday, February 8, 2015

एक स्वप्नमयी सुखद प्रवास

एक स्वप्नमयी सुखद प्रवास

(बाळाच्या जन्मापूर्वीपासूनच त्याच्या आई-वडिलांचे खुप स्वप्ने,आशा असतात. त्यासोबतच ते बाळाला त्याच्या सुंदर आयुष्याचे वचन देतात.
 अशाच एका आईचा तिच्या बाळासोबत झालेला संवाद. कदाचित हा अनुभव प्रत्येक आईनेच घेतला असेल…. )

 
आम्ही दोघांनी मिळून पाहिलं होत एक स्वप्न
असावं असं काहीतरी जे असेल फक्त आपलं ।
क्षणाक्षणाला होणारा तुझा असा स्पर्श
हे स्वप्न हकीकतेत उतरल्याची साक्ष ।।

जेव्हा प्रथम मी पाहिलं तुझं लुकलुकणारे हृदय
तू पाहायला हवं होतंस माझ्या ओठाव्रर उमललेलं स्मितहास्य ।
त्यादिवशी तुझे इवलेसे हातपाय ,नाककान डोळे पाहून
आम्ही दोघे पाहतच राहिलो अगदी देहभान हरपून ।।

तुझी ती पहिली छबी पाहिली
आणि डोळ्यांसमोर एक गोंडस मूर्ती उभी राहिली ।
घरातल्या बाळचित्रांमध्ये आता ,तीच भासते सारखी
तुझ्या सहवासामुळे वाटे,मीच आता जगी सर्वसुखी ।।

काही महिन्यांतच तू या जगाच्या पसाऱ्यात येशील
तुझ्या स्वागताला बघ ,भरपूर सारे जण सज्ज असतील ।
या सर्वांमध्ये मला खात्री आहे तू आम्हाला सहज ओळखशील
जगाचा आस्वाद घेणारे तुझे किलकिले डोळे पाहून सर्वच सुखावतील ।।

हातात घेता तुला, आम्ही हे वचन देऊ स्वतःला
आनंदी,धैर्यवादी,संस्कारमयी आयुष्य देऊ तुला ।
देऊ उत्तम आरोग्य अन तुझ्या जीध्न्यासू मनाला पूरक शिक्षण तुला
आपलेसे करून घेईन मी तुझ्या सर्व स्वप्नांना ।।

गर्भाशयातील तुझे आयुष्य आता आनंदात जगून घे बाळा
शुरवीरापरी अडथळे पार करत सुखरूप या जगी ये जन्माला ।
तुझ्या आगमनाने सुखदायी नवदिशा लाभो अमुच्याही आयुष्याला
हीच ईश्वरचरणी तव कल्याणरूपी मागणी अन प्रार्थना ।।

 -  रुपाली ठोंबरे

8 comments:

  1. स्वप्न जिथे साकार होते जीवन तिथेच आकार घेते,
    जेव्हा स्वप्नातली कल्पना आणि कल्पनेतील स्वप्ने सत्यात उतरतात,
    तेव्हाच जीवन खऱ्या अर्थाने परिपूर्ण होत....

    ReplyDelete
  2. Khoop sundar kavita ahe Rupali.

    ReplyDelete
  3. लुकलुकणारं हृदय ? => लुकलुकणारं अस्तित्व

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. Khup chaan Rupali pregnancy che sagale days athavle mala hi kavita vachun 😃

    ReplyDelete
  6. Khupach sundar.vachtana khup sundar image dolyasamor yeta...

    ReplyDelete

Blogs I follow :