Saturday, February 7, 2015

चुकाच होत्या ….


चुकाच होत्या ….

( बऱ्याचदा नात्यांमध्ये शुल्लक चुकांवरून दुरावा निर्माण होतो. अशा वेळी वेळीच अशा चुका उमगून, कधी गरज पडली तर माघार घेऊन विसरलेल्या बऱ्या…. )

चुकाच होत्या ज्या न कळाल्या
आता उमगल्या
का रोद करिशी ?

गतकाळच्या नाजूक कळ्या
आता उमलल्या
का दूर जाशी ?

एका फुलाच्या दो पाकळ्या
आता दुरावल्या
का सांगशी ?

मनाने जरी असू वेगळ्या
तरी सुखावल्या
जेव्हा येऊ पाशी.

माझ्या हातूनही चुकुनच घडल्या
मी ज्या विसरल्या
का तू आठवशी ?

विसरूनि जा त्या भूतकाळी डहाळ्या
स्मरुनि आपुल्या मित्रात्वाला
वाट चालू भाविष्याची.

 -  रुपाली ठोंबरे

2 comments:

Blogs I follow :