Monday, February 1, 2016

स्वप्न समोर उभे...

कालचा दिवस माझ्यासारख्या नवख्या लेखिकेसाठी एक अविस्मरणीय दिवस … काहीतरी खूप मोठे प्राप्त केल्याचा आनंद घेऊन आला… चार दिवसांपूर्वीच "मी मराठी " या वर्तमानपत्राच्या उपसंपादकाच्या आलेल्या एका ईमेलमुळे आयुष्यातील एका स्वप्नाला योग्य दिशा मिळाल्यासारखे वाटले…. स्वप्न होते कधीतरी आपणही वर्तमानपत्रात झळकू… कधीतरी आपले विचारही घराघरांत जाऊन पोहोचतील…आपलेही नवे अस्तित्व शोधण्याचे. आणि काल " मी मराठी" या वृत्तपत्राच्या रविवारच्या 'सप्तमी ' या पुरवणीत मी आणि माझा याच ब्लॉगवरील ' शेवटी आपले नशीब ' हा लेख दोन्ही उपस्थित होतो.…वाचकांना काहीतरी नवे सांगण्यासाठी. काल पेपर हाती घेतला तेव्हा प्रत्यक्षात स्वप्न समोर उभे असल्याची जाणीव झाली. या सफलतेला सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रोत्साहनाचा सुंदर प्रेरणादायी लेप लागला आणि नकळत मनात नवे स्वप्न जन्मले आणि ओठांतून शब्द बाहेर पडले… ही तर आता सुरुवात आहे….


मी मराठीचे अगदी मनापासून आभार.…एक नवी वाट दाखवण्यासाठी…


- रुपाली ठोंबरे. 
वाचण्यासाठी लिंक :


1 comment:

Blogs I follow :