Friday, July 15, 2016

दर्शनात तुझिया...




दर्शनात तुझिया मी भेटे श्रीरंगा
धन्य तयातच जाहले, मी पांडुरंगा

विटेवरी राहून उभा, हात कटेवरी
कासूनि पितांबर उभा रखुमाईशेजारी
तुळशीहारांत शोभे पंढरीचा तू मुरारी
ऐसे रूप तुझे सावळे उभे नित मनमंदिरी

भीमेच्या यमुनेतिरी सूर अभंग-नाम-गजरांचे
टाळ वाजती फेर धरुनी अनंत पावलांचे
उधळीत अबीर गुलाल रंगले देह वैष्णवांचे 
किर्तनांत गुंतले भान आज भक्तीभावनांचे

चंद्रभागेला आज आला भक्तीचा महापूर
आनंदाने भरून आला वारकऱ्यांचा बघ ऊर
नको या मनात देवा आता नवे दुष्ट काहूर
विठू नामाच्या नादात स्फुरु दे नवे कोंब अंगभर ... 
                      अन जीवनात स्फुरत राहावे गीत नवे ... नवे सूर  



आषाढी एकादशीच्या शुभेच्छा !!!
-रुपाली ठोंबरे .

6 comments:

  1. Kharach...Anandane bharun ala varkaryancha bagh ur... surekh

    ReplyDelete
  2. अन जीवनात स्फुरत राहावे गीत नवे ... नवे सूर
    खूप छान!

    ReplyDelete
  3. विठ्ठल रखुमाई तर सुंदरच...

    ReplyDelete

Blogs I follow :