पांढरे पुंजके पिंजून पार पालटले
पहा, पावसाचे प्रेम पुन्हा परतले
पंख पिवळ्याधम्म प्रकाशाचे
पहाटेच पुसले पाण्याने परतुनी
परवापासूनची पिर पिर पावसाची
पावलोपावली पहा पाणीच पाणी
पाण्याने पूर्ण पुसल्या पाऊलवाटाही
परि पावसाला पाहून परिसर प्रसन्न
पहा, पवन पळतो पिसाळल्यागत
पागोळ्यांतले पाणी पिसे पाठोपाठ
पलीकडच्या पहाडांतले पांढरेशुभ्र पाझर
पळती पावले पहा, पळणाऱ्या पाण्यापाशी
पानोपानी पिवळी-पोपटी प्राण-पल्लवी
पुष्पांच्याही परड्या पहुडल्या पैठणीवरती
प्रयाण पहा पशु -पक्ष्यांचे पाणवठ्यांवरती
पसरला पिसारा प्रफुल्लतेचा पृथ्वीवरती
पुस्तकातल्या प्रीतलतेच्या पंक्ती पांघरलेल्या
पुन्हा पापण्यांतल्या पाण्यात पळभर पसरल्या
पलीकडची पैंजणे पुढच्याच पावली पोहोचली
परि, परिकथेतील पावले पूर्वीच पाण्याखाली पुसली
-रुपाली ठोंबरे.
२६ जुलै
No comments:
Post a Comment