फार फार पसारा झालेलाआज म्हटलेसाराच आवरून ठेवूया जरामनातला प्रत्येक कोपराआठवणींनी भरलेलात्यातून नकोसे स्मृतीकणविलग करते आज जराजुनी- तुटलेली खेळणीअर्धवटलेल्या कवितात्यांत गुंतलेल्या ताराकुठेच कशाचा थांग लागेनासाराच हा अस्ताव्यस्त पसाराकितीदा तरी म्हटले मीजोडून नव्याने घडवूया पुन्हाचांगल्या मनाने प्रयत्न केलापण हाती आला नुसता चुराजणू केरसुणीही म्हणावीकालचा पसाराच होता बराहवासा असो वा नकोसाबरोबर असो वा चुकीचाआपणच जोपासून ठेवतोभावनेत भरात वाहत जाऊनआयुष्यातला असा काही कचराफेकून द्यावा वेळीच सांभाळूनहाच तर मनाचा खरा निचराफार फार झालेला पसाराआज म्हटलेसाराच आवरून ठेवूया जरायेऊ द्यावा मनातल्या घरातसमाधानाचा मोकळा वारा,मोकळा श्वास,आणि सौख्याचा झरा
- रुपाली ठोंबरे

