धुंद ती मधुमालती
रात अनोखी अशी
बहरली काल ती
विना तुझ्या सर्व रिते
तुज संगतीत उपभोगते
स्वर्ग जीवनी जिथे तिथे
मंद सुगंध बेधुंद-दंग करी
अनुराग-रंग तो दाट करी
नकळत बंध गुंफले करी
जन्मांचे सुख घेऊन सारे
वाहू लागले प्रीतीचे वारे
स्वप्नांच्या दुनियेत नेणारे
नभी उजळल्या अनंत वाती
प्रीतसाक्ष देत उभी चंद्रकोर ती
प्रेमज्योत तेवते तशी तीरावरती
- रुपाली ठोंबरे
Khup sundar ...specially last 3 lines .. Like it
ReplyDeleteछान ! धुंद धुंद, बेधुंद धुंद, मंद मंद तोच सुगंध. धुंदीत गंधित प्रीतीत रंगून जा
ReplyDelete