कोवळी उमलणारी नवी सकाळ आणि एका काळानंतर मालवणारी तीच संध्याकाळ….दिवसाच्या या दोन्ही प्रहरी सारखाच देखावा …. सूर्याचे अस्तित्व शीतल मोहक…. अगदी हवेहवेसे वाटणारे…. कापसाच्या शुभ्र मेघमयी पुंजक्यांतून डोकावणाऱ्या निळ्याभोर आकाशी…. लाल-गुलाबी-केशरी रंग उधळीत रंगलेली होळीच जणू…एखाद्या चित्रकाराने फिरवलेल्या अदृश्य कुंचल्याचीच ही कमाल…. दूर सौम्य धुक्यातून डोकावणारी धूसर वनराई…. झाडांची ती सुंदर नक्षी…. जिथे विसावती हजार पक्षी…. खाली हिरव्यागार गवताच्या गालिच्यावर सांडलेले सोनेरी ऊन…. जलाशयाच्या दर्पणात आभाळ निळे उतरून …. रंगछटांचा हा खेळ निसर्गात रंगतो ….या रंगसोहळ्यात पाऊलवाटही होऊन सोनेरी….नवदिशा दाखवी आयुष्याला…. दृश्य जरी सारखे…. तरी अंतर तासांचे तयांत….आयुष्य म्हणजे काय?…. या तासांत रोज नवा खेळ खेळून…थकून क्षितिजाशी या देखाव्यात… जरा विसावा घेणे….
- रुपाली ठोंबरे
छान painting आणि तेवढंच छान वर्णन पाऊलवाटच .....
ReplyDeleteपाउलवाट सुंदर असतेच, पण त्याच पाउलवाटेवर वर्दळ वाढली की वाट सांभाळून संक्रमित करावी लागते. मतितार्थ लक्षात घे. आता वर्दळ वाढलीय.
ReplyDelete