Monday, November 2, 2015

तुझं हसणं....आनंदाचं देणं


जे कधीकधी अथक प्रयत्नांनी साध्य होत नाही ते एका हसण्यानेही सहज शक्य होते. रूप, रंग सर्वांपलीकडेही जाऊन भावनांचा अनोखा संवाद मुग्धपणाने सांगणारी, स्वतः सोबतच इतरांच्याही जीवनात सुख-हास्य-आनंदाचा मुक्तपणे सडा शिंपणारी प्रत्येकाला लाभलेली एक देणगी….आपलं हसणं. 

या वर्षावात आनंदरंग उधळत न्हाऊ दया सबंध सृष्टीला….आणि अशाच तृप्तीत या मनाला.


 जरी नसेल मोत्यांचं लेणं
 तरी असावं आनंदाचं देणं
 दुःखाच्या गडद मेघातून जणू
 पसरणारं सौख्याचं चांदणं

  भावनांचं असं खोल जाऊन मनात लपणं
  ओठांच्या कोरीतून तेच हळुवार सांगणारं
  तुझ्या-माझ्या मनाला जोडणारा दूवा जणू
  असंच असावं नकळत उमलणारं तुझं हसणं

 आसवांनाही माझ्या असं मुग्ध तुझं जाणणं
 त्या आसवांतही हळूच नवी चमक आणणारं
 तुझ्या-माझ्यातला अनोखा मुग्ध संवाद जणू
 असंच नित राहावं चेहऱ्यावर मंद तुझं हसणं 

- रुपाली ठोंबरे.

2 comments:

 1. घेई छंद मकरंद,
  मिलिंद तो शर्विलाक
  प्रिय तो मिलिंद
  मधुमीलना.
  हा छंद तयासी लावितसे
  मुग्ध करी ते उमलते हसणं
  संवाद अनोखा तो
  नाही शब्द
  मूकसंवाद
  तो पूर्णतया मुग्ध
  अनोखा मुग्ध संवाद
  तिचं हसणं की चांदणं पसरणं
  मनाला मन जोडणारं
  आसवांतून ते मुग्ध हसणं
  अनोखात अनोखं मिसळणारं
  ते द्वैताचं अद्वैत होणं

  ReplyDelete

Blogs I follow :