Friday, August 12, 2016

कुणीतरी असावीकुणीतरी असावी
उसळणारया हास्याच्या लाटेला साथ देणारी
गजबजलेल्या एकांतात सोबतीचा हात देणारी
मनातल्या भरकटलेल्या विचारांना योग्य वाट देणारी

कुणीतरी असावी
भरलेल्या डोळ्यातील आसवाना हास्याने मात देणारी
हरलेल्या आशेच्या रात्रीला नवी पहाट देणारी
थकलेल्या प्रय्त्नाना लढ़ण्याचा विश्वास देणारी

कुणीतरी असावी
मनाच्या कोपरयात मैत्रीचे भाव बणून साठणारी
अबोल ओठावरचे शब्द नजरेतूनच वाचणारी
कुणीतरी असावी अनोळखी असूनही आपलीसी वाटणारी1 comment:

Blogs I follow :