Wednesday, August 17, 2016

कल्पनेत तुझिया

 
 
 
 
एक प्याला तुझ्या प्रेमाचा नशेत ज्याच्या डुबून जावं 
नवजात जणू कळी प्रमाणे कुशीत तुझ्या फुलून यावं 

कातिल तुझ्या नजरेच्या कटाक्षातुनी घायाळ व्हावं 
सरता सरता ओठांच्या पाकळ्यांवरती विलीन व्हावं 

चंचल तुझ्या आठवणींच्या रथात मन स्वैर व्हावं 
रंगांत तुझ्या प्रीतीच्या आतुर मन चिंब भिजावं 

विसरून अवघ्या सत्याला कल्पनेत तुझिया हरवून जावं 
भुलवून साऱ्या बंधनांना तुझ्यात मजला सामावून घ्यावं 
 
 
 

1 comment:

Blogs I follow :