दोन जणांचे भेटीसाठी आसुसलेले मन ,भेटीतला निरोपाचा क्षण , त्यानंतर होणारा विरह यांचे सुंदर चित्रण
मन स्वप्नी विचारांच्या रथात स्वार
बैचेन होऊनी व्याकुळते
होताच चाहुल तव स्पर्शाची
फुलवुनी शहारे मोहविते
सुटताच साथ त्या घटकाला
पुनः भेटीची आस ते धरते
चांदण्या सम मन माझे
निशी आसमंती दाटीत बावरते
मिळताच दिशा चंद्र तेजाची
प्रफुल्लित होऊन सावरते
तुज संगतीत स्वैर भिरभिरते
सत्यात जाणुनी विरह तुझाबैचेन होऊनी व्याकुळते
होताच चाहुल तव स्पर्शाची
फुलवुनी शहारे मोहविते
सुटताच साथ त्या घटकाला
पुनः भेटीची आस ते धरते
चांदण्या सम मन माझे
निशी आसमंती दाटीत बावरते
मिळताच दिशा चंद्र तेजाची
प्रफुल्लित होऊन सावरते
Sundar kavya!!!!
ReplyDelete