इवलेसे स्वप्न माझे ,अशक्यप्राय इतरांसाठी
भासे जणू , इंद्रधनूची वाट पाहतो कोणी वाळवंटी
छोटासा खोपा राजा-राणीचा असावा
थकलेल्या क्षणीही जो देईल विसावा
अनपेक्षित वादळांनी नेले ते घरटेही हिरावुनी
आयुष्यभराची उणीव ठेवून गेले ते मनी
अजूनही हृदयात लपल्या असंख्य आशा
स्वप्न जगण्यासाठी मिळावी एक नवी दिशा
ओठांवरील हसू झाले आज कर्जच माझ्यासाठी
भासे जणू , इंद्रधनूची वाट पाहतो कोणी वाळवंटी
No comments:
Post a Comment