Friday, September 11, 2015

आज सुंदर झाले तळेछोटया छोटया प्रयत्नांतून ,संधींतून उलगडत गेलेले आयुष्य जेव्हा मनोहर रूप घेते तेव्हा इतरही सुंदर गोष्टी आपोआप घडून येतात आणि जीवन अधिक उत्साहाने आणि सौंदर्याने बहरू लागते . पण हे मिळवण्यासाठी धीर , कष्ट आणि उद्दिष्ट अंगी बाळगणे महत्त्वाचे.
आज सुंदर झाले तळे

थेंबे थेंबे जे गोळा केलेभोवताली हिरवे वाळे

सुगंधी फूलांसवे फुलेथांबले इथेही शुभ्र बगळे 

तृप्त झाले पशू तहानलेलेउमलली नाना कमळे

दृष्य मनोहर तरंगलेलेकधी आकाशापरी निळे

कधी चांदण्यांत न्हालेलेअसे सुरेख एक आहे तळे

संथ लय-तालात उलगडलेले

- रुपाली ठोंबरे3 comments:

Blogs I follow :