Monday, September 21, 2015

प्रसन्न गजानन...


 
                                             कधी गोंडस बाळसेदार, तर कधी राजासारखा दिमाखात
 गणपती येतो घरा-घरात, सूरेख मूर्तीच्या स्वरुपात

 कधी शोभे रेखीव मखरी, कधी नयनरम्य देखाव्यात
 मूर्तीचे रेखीवपण झळके रोषणाईच्या प्रकाशात

 कधी शिरी मुकुट हिरेजडीत, कधी काळ्याभोर केशांत

 जास्वंद दुर्वांची जुडी शोभते माथ्यावरी त्यासोबत

 इवलेसे डोळे अन कुंकूअक्षता मिश्रित गंध मध्यात
 प्रसन्न गजानन, शोभे भिकबाळी विशाल कानात

 कधी वक्र शुंडा कधी सरळ, सोंडपट्टी शोभे त्यावर
 तुटलेला एक दातही भर घालतो अमर्याद सौंदर्यात

कधी फुलांचा हार कधी कंठी मोत्यांची साजिरी गळ्यात
सुवर्ण पाचुजडीत बाजुबंदांसंगे कडे सोनेरी शोभे करांत

लाडवांचा ठेवा कधी मोदकांची चळ घेवून हातात
वरदहस्त देत आशीर्वाद, दंड,पाशांकुश द्वीहातांत

रेशमी उपरणे खांद्यावरी ऐसे, जान्हवे रुळे लंबोदरावर
नेसून पितांबर पिवळा आरूढ होई गजराज चौरंगावर 

वाळे पायांत रुपेरी मूषक शेजारी,नाचे मृदुंगाच्या तालावर
रूप देखणे मनोहर ऐसे, आले जयघोषात आमच्या घरात

दहा दिवस राहा घरी हर्ष देत, उत्साह आनंदाच्या सहवासात
अगरबत्तीचा सुवास अन समईची ज्योत साथ देई दिन रात

प्रेम तुला देऊ आम्ही फळ-लाडू- मोदकांच्या गोड नैवद्यात
तुझा कल्याणदायक आशीर्वाद मिळू दे आम्हां तीर्थप्रसादात

- रुपाली ठोंबरे .

2 comments:

  1. Aprateeeeeem!!! Surekhach....!!! What a elaboration!!! Superb!!! Ganapati Bappa Moryaaaaa....... Mangalmurti Moryaaaaa!!!

    ReplyDelete
  2. Om Gan ganapataye namah. ..
    atishay uttam. ..

    ReplyDelete

Blogs I follow :