Wednesday, September 2, 2015

एक रस्ता...

माणसाच्या जीवनात असे प्रसंग येतात जेव्हा तो एका अशा ठिकाणी असतो जिथून २ रस्ते फुटतात. अशा वेळी योग्य मार्ग निवडण्याचे कौशल्य महत्त्वाचे. शिवाय मार्ग किचकट असूनही जर तो निरंतर आत्म समाधानाचे स्त्रोत असेल तर तो निवडणे कधीही यशस्वी माणसाची निशाणी

एक रस्ता
साधा ,सरळ ,सोपा
बोलावतो
देतो तयार एक खोपा

वाटेमध्ये त्याच्या
जरी नाहीत असंख्य काटे
तरी तयार मिळणारे सारे
अगदी हवेहवेसे वाटे

त्याच्या मार्गी जाता
लाभे हवे ते ते  सारे
लाभे सामान्याचे जिणे
घेऊन नशिबाचे वारे

दुसरा आहे जरा
कठीण, खडतर फार
चढावा उंच पर्वत
झेलून ऊन-पावसाचे वार

एकेका पावलासंगे
चाले प्रवास यशाचा
शिखर दूर जरी
 ठेवून ध्यास मनी लक्ष्याचा 

आज मध्येच थांबले मी
घेऊ मी कोणती दिशा
द्विमार्गांच्या द्विगुणांनी
भांबावले मी शोधू नवी आशा 

बेहतर असामान्य होणे
गाठून उच्च शिखर 
आणि समाधानात न्हाणे 
कष्टाचे फळ होई रुचकर
       

- रुपाली ठोंबरे .

3 comments:

Blogs I follow :