( कोणत्याही कवितेची निर्मिती ही सभोवताल आणि त्यातून उत्पन्न होणाऱ्या भावना यांचा मेळच. )
पाहुनि या लोचनी ऐकुनि नाना ध्वनी,
तरंग उठले अंगावरी त्या मुग्ध स्पर्शातुनी,
गंधित होते सारे फुलता ती रातराणी,
चांदण्या राती भेटता दो मधूर एका क्षणी,
कधी ओठांवरी हासू कधी नयनी पाणी,
स्मरता अताशा पुनर्जन्मल्या आठवणी,
कधी रेखाटल्या रेषा कधी शब्दरुपातुनी,
साकारले चित्र जे अनुभवले या काविमनी,
जे न देखिले कधी स्वप्नी,
ते भाव सारे आज उमटले मनी.
- रुपाली ठोंबरे
khupach sundar...!!:)
ReplyDeletesimply beautiful....
ReplyDeleteSurekh kavita!!
ReplyDelete