( एका मोठ्या चित्रकाराचे चित्र पाहता मनात उमटलेल्या भावनांचे सुरेख चित्रण … This poem is dedicated to world famous marathi
artist- Shashikant Dhotre).
काळ्या कागदावर पेन्सिल रंगीत
चित्रकाराच्या हातून रंगते स्त्री-जीवनगीत
बोलक्या रंगछटांच्या ऊन-सावलीत
घडते त्याच्या चित्रांची चित्रफीत
अगदी खरे भासते त्यातील प्रत्येक पात्र
सांगणे कठीण व्हावे पाहून त्याचे चित्र
खरेच अवतरले हातांतून
कि आहे हे छायाचित्र
परिसापरी होता स्पर्श त्याच्या बोटांचा
कोरा कागदही म्हणे दिन आला भाग्याचा
रंगाच्या वर्षावात न्हाऊन तोही होतो आज लाखांचा
लक्ष वेधुन घेत ,होतो क्षणात आवडता सर्वांचा
कधी नटलेली लाजरी नवरी ती
कधी उत्सुकतेने वाट पाहणारी ती
कधी जात्यावर ओवी गाणारी ती
कधी स्वप्नात हरवलेली ती
कधी गोट्यांच्या खेळात रमलेली पाखरे ती
कधी तुकड्यांतून जीवन साकारणारी ती
पाहता क्षणी मनात भरते तीच ती
जगाच्या पसाऱ्यातून कॅनव्हासवर आज अवतरली ती
लहान खेड्यात देता देता दगडांना आकार
हाती येता पेन्सिल जन्मलेला तू चित्रकार
जगभरारी घेत असतानाही नाही अहंकार
जगही थांबेल,पाहण्यास तुझा जागर …The Travelling Show
- रुपाली ठोंबरे
artist- Shashikant Dhotre).
काळ्या कागदावर पेन्सिल रंगीत
चित्रकाराच्या हातून रंगते स्त्री-जीवनगीत
बोलक्या रंगछटांच्या ऊन-सावलीत
घडते त्याच्या चित्रांची चित्रफीत
अगदी खरे भासते त्यातील प्रत्येक पात्र
सांगणे कठीण व्हावे पाहून त्याचे चित्र
खरेच अवतरले हातांतून
कि आहे हे छायाचित्र
परिसापरी होता स्पर्श त्याच्या बोटांचा
कोरा कागदही म्हणे दिन आला भाग्याचा
रंगाच्या वर्षावात न्हाऊन तोही होतो आज लाखांचा
लक्ष वेधुन घेत ,होतो क्षणात आवडता सर्वांचा
कधी नटलेली लाजरी नवरी ती
कधी उत्सुकतेने वाट पाहणारी ती
कधी जात्यावर ओवी गाणारी ती
कधी स्वप्नात हरवलेली ती
कधी गोट्यांच्या खेळात रमलेली पाखरे ती
कधी तुकड्यांतून जीवन साकारणारी ती
पाहता क्षणी मनात भरते तीच ती
जगाच्या पसाऱ्यातून कॅनव्हासवर आज अवतरली ती
लहान खेड्यात देता देता दगडांना आकार
हाती येता पेन्सिल जन्मलेला तू चित्रकार
जगभरारी घेत असतानाही नाही अहंकार
जगही थांबेल,पाहण्यास तुझा जागर …The Travelling Show
- रुपाली ठोंबरे
chan
ReplyDelete