Saturday, February 7, 2015

जपाकुसुमापरि हे जीवन …।( जीवनात प्रत्येकाला अर्धे सुख आणि अर्धे दुःख असते. पण निसर्गाने दिलेला हा सुख-दुःखाचा कोटा माणसाला मान्य नसतो.
सुख इच्छे प्रमाणे हवे असते.सुखाची ढेकर त्याला कधीच येत नाही. पण दुःख आले कि तोच घाबरून जातो.त्यल ते नकोसे असते
अनुकूल संवेदानाला सुख म्हणतात तर प्रतिकूल संवेदना म्हणजेच दुःख.
पण जीवनात आनंदी राहण्यासाठी, सुख मिळालं कि ते माझं आहे हा तर्क दुःख मिळाल्यावरही लागू व्हायला हवा….कुसुमापरि सुंदर हे जीवन ,
देवाने जरी दिले हे वरदान,
सदा करुनिया तया वंदन,
प्रयत्न करावे करण्या हे पावन।।

सुखाच्या त्या नाजूक पाकळ्या,
जणू उमलल्या साऱ्या कळ्या,
दुःखाचेही काटे गड्या,
दिधले त्याने  साथ देण्या।।

काटे चार परि पाकळ्या हजार,
पण सुख भोगुनिया दुःखाचाच सारा  भार,
वेगवेगळ्या पाकळ्यांत खेळता वारंवार,
कधीतरी टोचेलच काटा देऊनिया मार।।

दुःखकंटकातुनि बाहेर पडून,
सुखपाकळ्यांत हळूच शिरून,
सुखात आणखी भर घालून,
प्रयत्न करावे फुलवण्या हे जीवन।।

खरेच जपाकुसुमापरि हे जीवन,
सर्वांचे जणू अंगण ,
सुख-दुःखाचे सडा शिंपण,
देवापुढे हे पुष्प सदा अर्पण।।

 -  रुपाली ठोंबरे

No comments:

Post a Comment

Blogs I follow :