आली संध्या ….
( केशरी-सोनेरी रंगछटात रंगलेल्या आकाशात लालबुंद झालेला सुर्य आणि केशरी-लाल पाकळ्यांचा सडा पडल्यागत समुद्रलहरींवर थरथरणारे त्याचे प्रतिबिंब, आपल्या पिल्लांपाशी परतणारे पक्षी,अंधाराची चाहूल लागताच मिटणारी फुलेपाने…. संध्याकळचा हा देखावा खूपच नयनरम्य असतो. हळूहळू सूर्य दूर डोंगरापलिकडे नजरेआड होतो आणि हा देखवाही जणू काळोखात लूप्त होतो. पण त्यानंतरचा देखावा वेगळाच अनुभव देणारा असतो . काळोख, त्यात चमचमणाऱ्या अनंत चांदण्या, सोबत चंद्राचे मनोहर रूप…. हे सर्व निसर्गाचे गेलेले रूप विसरायला निश्चितच मदत करेल. )

आली संध्या घेऊन जाया ।
सूर्य नभीचा अपुल्या गावा ।।
जाणताच हे आम्ही सारे
घरी परतलो घेण्या विसावा ।
दशदिशा रंगल्या तिच्या आगमनाने
मी तर मोहित झाले तिच्या सौंदर्याने ।।
पुष्पपर्णेही तिला पाहून लाजून मिटली
तिला पाहण्या जमली पक्ष्यांची गर्दी ।
एक हवेचा झोका आला घेवून थंडी
स्वस्वागत हे पाहता संध्या खुलली ।।
लपवूनिया सूर्या अपुल्या हृदयी
सागर खेळू लागला खेळ लपाछुपी ।
संध्याला मग युक्ती सुचली
सूर्यासह प्रतिबिंबही घेऊन गेली ।।
तिची ही मस्ती आवडली नाही कोणाला
म्हणून समजावण्या रुसलेल्या मना ।
तिने पाठवला ताऱ्यांचा नजराणा
काळोख्या राती साथ देण्या तो घेऊन आला चंद्र देखणा ।।
नभ चमकून उठले या देखाव्याने
स्वप्ननगरी घेऊन गेले हे सारे ।
या स्वप्नांतून परतणे आवश्यक का ?
हे एकच उत्तर गड्या , मला दे बरे ।।
- रुपाली ठोंबरे
No comments:
Post a Comment