Monday, February 9, 2015

बाळे , गोड गोड हास ।।



( एक आई आपल्या चिमुकलीला मनावण्यासाठी काय काय युक्ती करते त्याचे सुंदर चित्रण )

बाळे , गोड गोड हास ,बाळे , गोड गोड हास ।
आता रोद नको करूस ,बाळे , गोड गोड हास ।।

आले सखेसोबती , आला चंद्रही वरती ।
आले तारेही सारे, खेळण्या तुझ्या भोवती ।।
आली निशिगंधाही , देते इशारा सुवासी ।
जा त्यांच्यासंगे खेळ आता गोड गोड हास ।।

बघ ,चंद्र किती देखणा ,बोलावतो तुज खेळण्या ।
लपाछुपीच्या खेळात , तू सजणी तो सजणा ।।
काळोख्या रात्रीच्या या चमचम चांदण्या ।
असा तुज लाभे सहवास ,आता गोड गोड हास ।।

हसता गाली पडे खळी ,जणू उमलते एक कळी ।
स्वातीच्या नक्षत्रातुनि मोती पडले या शिंपली ।।
गाल भिजले अश्रूंनी ,का ग रडतेस तू राणी ?
हसता खुले ग सौंदर्य ,बाळे , आता तरी हास ।।

दहीभात हा तुझ्याचसाठी ,घास भरवते ये जवळी ।
नको हट्ट करू श्रीरामापरी ।।
कशी करेन मी उतराई ,तुझ्यामुळेच मी झाले आई ।
स्विकार कर प्रेमाचा एक घास , आता एकदातरी हास ।।

चंद्र अन तारे साक्षीला ,हा देखावा असे प्रत्येक रात्रीला ।
तुझ्या अन माझ्यातल्या आठवणींच्या पैठणीला पदर असे या रात्रीचा ।।
आठवणींना परत उलगडण्या, जपून ठेव घडीत या प्रीतीला ।
भविष्यात जेव्हा हवासा वाटेल माझा सहवास, तेव्हा तरी तू हास ।।

           

रुपाली ठोंबरे



 

3 comments:

  1. खरच सुन्दर, बाळे गोड गोड हास

    ReplyDelete
  2. Your try towards 1st writing is adorable, keep writing, experience makes good writers and poets too. It is not a language, but feelings matter, and soon you can master any language you know and revise words written with better and better but easy words. Because we write for masses to understand, not for teacher correcting grammar. I always encourage self writing own thoughts as that bring out our real image. I propose / propagate self writing. Many times our hidden wish to become a writer which was forgotten in this fast life and other duties can now become true by writing / rewriting and publishing on Whatsup as well as Facebook and next step is Twitter, website, e-essay, e-poetry, e-book. Thank You. Keep writing own thoughts who knows you may become big good poet as well as good writer

    ReplyDelete
  3. Thank you very much for your valuable comments.Its really good inspiration.Thanks.

    ReplyDelete

Blogs I follow :