कधी कधी आयुष्यात एका वळणावर अचानक एक विचित्र काळोख दाटलेला आढळतो. भविष्यातले पुढचे सोडाच अगदी जवळचे आसपासचेही काही दिसेनासे होते. आपलेच वाटणारे सर्व फार दूर जात एकाएकी धूसर होत जातात. कित्येक विश्वासांना एकाच क्षणी तडा गेलेला असतो. नशिबाच्या नावेवरती झोके घेत एका विचित्र वादळात हा जीव हेलकावे खात असतो. त्या क्षणी खूप भीती वाटते. जीव घाबराघुबरा होतो कारण अशा क्षणांत आपल्या वाईटाची वाट पाहणाऱ्या घुबडा-गिधाडांचे किती तरी डोळे दूरवर दिसत असतात. नावेतून अचानक तोल गेला तर.... ? या मिट्ट काळोखात जीव गुदमरून गेला तर ...? अशा नाना प्रश्नांनी जीव त्रासून गेलेला असताना मग सुरु होतो परमेश्वराचा नामजप. कारण त्याशिवाय कोणताही उपाय दिसत नाही. देवा तू येऊन सर्व ठीक करावे अशी अपेक्षा त्या वेळी नक्कीच नसते तर अपेक्षा असते आपल्या प्रयत्नांना यश मिळण्याची...संकटात हिम्मत देणाऱ्या एका आशीर्वादाची.
आणि मग अशा भयाण अंधारात चाचपडत असताना एक मिणमिणता तारा दृष्टीस पडतो. अरे हे काय ? हा तर माझ्याच दिशेने येत आहे. प्रखर होत आता तो दिव्य प्रकाश माझ्या अगदी जवळ आला. त्याच्या असंख्य तेजकणांनी हा जीव पुन्हा जिवंत झाला. काही काळापूर्वी वाटणारी भीती आता कुठच्या कुठे नष्ट झाली. वादळातही मन घट्ट झाले आणि आसपास वाहू लागले आनंदाचे गार वारे. अचानक एक वेगळाच विश्वास अंगी संचारला. गुदमरत असलेला जीव आता मुक्त झाला, त्याला स्वप्नांचे अनंत पंख फुटू लागले जे आकाशात झेप घेण्यास उत्सुक होते. आनंदाच्या भरतीच्या उधाणातही मन स्थिर ठेवण्याची बुद्धी निर्माण झाली. प्रयत्नांना यश किंवा अपयश आले तरी त्या विश्वासाचे कवच इतके कठीण होते कि हिम्मत जरा देखील ढळली नाही.उलट त्याच्या सतत मार्गदर्शनाने ती हिम्मत नेहमीच कणाकणाने वाढत राहिली. प्रत्येक पावलावर येणारे संकट आता एक नवे आव्हान वाटू लागले. त्याला स्वीकारण्याची आणि पूर्ण करण्याची एक दिव्य शक्ती त्या तेजस्वी दिव्याकडून मिळाली. या शक्तीच्या साहाय्याने कितीतरी दूर प्रयत्नपूर्वक चालत राहिल्यावर एक जग लागले... सुंदर , प्रकाशित, हवेहवेसे वाटणारे, जे त्या क्षणापर्यंत कुठेतरी खोल लुप्त होते. मी हळूच त्या स्वप्नाच्या जगात शिरले. पण तो प्रकाश सदा माझ्या ह्रदयाच्या एका कप्यात साठून होता. त्याचा निरोप घ्यावासा कधी वाटलेच नाही. तो इवलासा तारा नाही तर माझ्यासाठी तो सूर्यच होता जो फक्त माझ्यासाठीच तेव्हा उगवला होता असेच वाटत होते.माझ्यासारख्या हजारो जीवांना प्रकाशमान करणारा हा सूर्य नियमित माझ्या आठवणींच्या आकाशात स्वैर करत असतो.खरेच कधी कधी या आभासी सुंदर स्वार्थी जगात या कोलाहलातही खूप एकटे वाटते, अनेकदा त्या तेजाची उणीव भासते आणि तेव्हा तेव्हा त्या प्रकाशाने निर्माण केलेली माझ्यातील सकारात्मक ऊर्जा कामी येते. पुन्हा एकदा हेलकावे घेत असलेला जीव तोल सांभाळतो, नव्या पंखांना स्वप्नांचे नवे पर येतात आणि आकाशी झेप घेण्यासाठी मन तयार होते.
माझ्यासारख्याच कितीतरी मुलांवर हा देवदूत गेल्या कित्येक वर्षांपासून माया करत होता. त्या प्रेमाच्या स्पर्शात नेहमीच एक दिव्य शक्ती होती. त्याच्या सहवासात एक विश्वसनीय आधार होता. एका छोट्याशा खाडीकिनारी वसलेल्या गावाला शैक्षणिक महत्त्व प्राप्त झाले ते याच देवदूतामुळे. कितीतरी विद्यार्थ्यांचे भविष्यच फक्त उजळले नाही तर त्यांच्या सहवासात आलेला प्रत्येक विद्यार्थी एक आदर्श मानव बनला. अनेक अनाथांना हक्काचा नाथ वयाच्या योग्य वेळी मिळाला आणि त्यांच्या जीवनास एक अर्थ प्राप्त झाला.फादर ऑर्लॅंडो म्हणजे फक्त शिक्षणाचीच नव्हे तर मायेची,शिस्तीची,वात्सल्यतेची ,धर्मनिरपेक्षतेची, अजोड परिश्रमाची, साकारत्मकतेची प्रतिमा होती. एक अनोखे व्यक्तिमत्त्व ज्यांच्याही सहवासात आले त्यांचे जीवन आज फुलले आहे. पण म्हणतात ना, देव त्याचा एक अंश मानव कल्याणासाठी पृथ्वीवर पाठवतो आणि त्याचे कार्य समाप्त झाले कि तो अंश पुन्हा त्या दैवी अनंतात विलीन होतो. २९ ऑक्टोबर २०१७ रोजी एका अशाच दैवी अंशाचा, अनेक जीवांना प्रकाशित करणाऱ्या दिव्य ज्योतीचा अखेर त्या अनंत सूर्याच्या स्वर्गतेजात प्रवेश झाला.
त्या तेजस्वी ताऱ्यास भावपूर्ण श्रद्धांजली !!!
फादर ऑर्लॅंडो, तुमच्या मुळेच आज माझ्या जीवनाला एक नवा आकार आणि अर्थ मिळाला. माझ्या या सुंदर जीवनाचे जर कोणी शिल्पकार असेल तर ते तुम्हीच.माझ्यावर तुम्ही ठेवलेल्या अतूट विश्वासामुळेच आज मी इथवर पोहोचली आहे असे वाटते. खरेच तुमच्यासारख्या निःस्वार्थी लोकांची या जगात खूप कमी आहे आणि मी खरोखर खूप धन्य आहे जिला हा सहवास अगदी जवळून लाभला. आयुष्याची १९ वर्षे मी तुमच्या छत्रछायेत वाढत गेले... शिक्षणाने , विचारांनी आणि जगायला शिकवणाऱ्या प्रत्येक गोष्टीने.लहानपणी वाढदिवसादिवशी तुम्हाला पाहणे म्हणजे एक कुतूहल वाटे ,कॉलेजमध्ये असताना तुमच्या सोबत केलेले विचारविनिमय, कॉलेजमध्ये टेलिफोन ऑपरेटर म्हणून वावरत असताना टेलीफोनवरही बोलताना वाटणारी भीती आणि हॉस्टेलमध्ये असताना घडलेल्या गमती जमती, एकदा तुमचे पोर्ट्रेट काढण्याचा माझा प्रयत्न आणि त्यानंतरची तुमची कौतुकाची थाप ,माझ्या जीवनाला कलाटणी देणाऱ्या दहावीच्या निकालाचे तुमच्या हातून मिळालेले पारितोषिक , जेव्हाही मी अडचणीत सापडेल तेव्हा तुमचे देवदूतासारखे समोर उभे असणे , गेल्या ५-६ वर्षांतल्या भेटी ... आजही त्या सर्व आठवणी या मनाच्या तारांगणात तेजोमय आहेत. माझ्यासाठी पितृतुल्य असलेल्या तुमच्याकडून मला फक्त मदतच नाही तर जगावे कसे हा अमूल्य धडा मिळाला. तुमच्या कडून मिळालेल्या मार्गदर्शनाच्या, शिक्षणाच्या , मायेच्या,विश्वासाच्या,ज्ञानप्रकाशाच्या आणि तुमच्या सोबत असलेल्या सर्वच आठवणींच्या स्वरूपात तुम्ही नेहमीच आमच्या सोबत राहाल.
Rest In Peace ... Miss you !!!

- रुपाली ठोंबरे.