Monday, April 27, 2015

तुझ्यातच गवसले मज सौख्य जीवनाचे ।।

 

रक्तवर्णित फुले गंधित
वाहते मी तुज गणराया ।
आळविते मी तुझेच गीत
वर्णू किती तुझ्यावरी माझी माया ।।

पितांबर पिवळा कासूनि
बैसला तू या सिंहासनी ।
शोभते सामोरी माझ्या
सुक्ष्म रूप विशाल काया ।।

वाटी मोदकांची हाती
शोभे वक्र शुंडा त्यापाशी ।
एक हात सदा उभा असा
देत आशिर्वाद प्रिय भक्तां ।।

लंबोदर तू एकदंत तू
तूच आराध्य प्रथमही तूच ।
सुखदायक तू विघ्ननाशक
येई सकळ कार्य सिद्ध कराया ।।

भक्तीत तुझ्या मी
विसरले जग-मोहमाया ।
तुझ्यातच गवसले मज
सौख्य जीवनाचे, गणराया ।।

- रुपाली ठोंबरे .

Blogs I follow :