लहान मुलं खरंच गोड असतात, पण त्यांच्यासोबत पूर्ण वेळ घालवला कि खऱ्या अर्थाने समजते कि मुलाला सांभाळणे तेही त्याला न त्रास देता ,न रडवता, समजुतीने त्याला सांभाळून घेणे किती कठीण असते ते .कित्येक आपल्याच जगात व्यस्त असलेल्या पालकांसाठी तर कधीतरी ते डोक्याला तापही होऊन बसतात. आणि मग ते आईबाबा साथ घेतात टीव्ही ,व्हिडिओ, मोबाईल गेम नामक घातकी शत्रूची. त्यामुळे लहानपणापासूनच हे सर्व त्या बालपणीचे सवंगडी बनतात. हे सर्व नसतील तर काहीजणांच्या मते मूल सांभाळणे कठीणच. कारण थोडे चालते-फिरते मूल घरात असेल तर व्यवस्थित रचलेल्या घराचा पार कायापालट करायला तासभरही लागत नाही. सोफ्यावर चढ , उंच स्टूलावरून उडी मार ,किचनमध्ये रचलेली भांडी फेक, बाथरूममध्ये पाण्यासोबत खेळ असे एक ना अनेक उद्योग सतत घरात चालत असतात. कधीतरी काही नको ते तोंडात घालतील नाहीतर नको ती गोष्ट उचलून फेकून मारतील. बोलक्या मुलांना तर इतके प्रश्न असतात कि त्याची उत्तरे द्यायला साक्षात परमेश्वर खाली अवतरला तरी तोही एका क्षणी निरुत्तरित होऊन गप्प राहील. मग आपल्यासारख्या सामान्यांची काय व्यथा. एक वेगळीच जिद्द आणि चिकाटी असते त्यांच्यात.त्या गोष्टीचे कौतुकही असते पण हीच जिद्द जेव्हा नको त्या गोष्टीसाठी हट्ट बनतो सर्व नकोसेही होते.पण तरी शेवटी मुले असतात खूप निरागस, गोड... आजच्या धकाधकीच्या जीवनातसुद्धा आपल्याच बालविश्वात रमणारी आणि कधीतरी आपल्यालाही त्यांच्या कल्पनाविश्वात ओढून नेणारी.पण आजच्या जगात त्यांच्या त्या स्वर्गात जाण्यासाठी आपल्यालाच मुळी वेळ नसतो. आपणच एका विचित्र तांत्रिक जगात गुरफटून गेलो आहोत आणि सोबत या नव्या पिढीलाही गुंतवू पाहत आहोत असे म्हणणे अजिबात खोटे ठरणार नाही.
आज असेच चित्र अनेक घरांत जरी दिसत असले तरी आमच्या घरी मात्र किती तरी वेळा एक नवेच वेगळेपण असते, कलेच्या सानिध्यातले. त्या दिवशीही असेच झाले. आमच्या घरी देखील अडीच वर्षांचा असाच एक खोडकर कृष्णा आहे. एके दिवशी ऑफिसहून येताना एक खेळणे काय घेऊन गेले त्यानंतर पुढे रोजच मी बाहेरून येताच माझ्या पर्सची चांगली निरखून झडती घेतली जाऊ लागली. आणि नेमके त्या दिवशी आज चित्रकलेत काही वेगळा प्रयोग करून पाहूया या विचाराने मी पेंटींग रोलर घेऊन आले होते. नेहमीप्रमाणे झडती झाली. मुद्दाम ठेवलेला त्याचा आवडता बिस्किटाचा पूडा देखील आज दुर्लक्षित राहिला कारण त्याआधीच साहेबांच्या हाती तो रोलर लागला होता. एका क्षणात तो रोलर त्याची गाडी बनली होती आणि पलंगावरच्या अस्ताव्यस्त चादरीवर निर्माण झालेल्या दरी-डोंगरांवरून उड्या मारत धावत होती आणि त्याच्या प्रत्येक विचित्र हालचालीसोबत माझा जीव वर-खाली होत होता.मग काही वेळाने मलाच एक युक्ती सुचली. कपाटातून पोस्टर कलर घेतले, एक-दोन ब्रश उचलले आणि एक मोठा पांढराशुभ्र कागद घेऊन मी जमिनीवर ठिय्या मांडला. विविध गाडयांमध्ये गुंग असलेला तो आपोआपच जवळ येऊन बसला. मुलांना नवीन काही समोर आले कि त्याचे भारी आकर्षण असते. मग ती गोष्ट त्यांच्या कामाची असो वा नको, त्यांना ती काही केल्या हवी असते आणि आकाशपाताळ एक करून ते ती मिळवतात सुद्धा. तर ओम हा असा शेजारी येऊन बसला.... निश्चितच कशालाही हात न लावता शांतपणे तर नाहीच.आधी सर्व वस्तूंवर हात फिरवून झाला आणि मग जरा समाधानाने त्यातले काहीतरी एक घेऊन बसला. कधी मला पाहत तर कधी त्या वस्तू आणि कागदावर त्याची नजर. मीही हिरवा रंग डिशमध्ये घेतला, सोबत थोडे पाणी मिसळले आणि हे हिरवे मिश्रण त्याच्या समोर ठेवले. एव्हाना आमची रोलर गाडी हातात तयारच होती. तिने लगेच त्या हिरव्या रंगात डुबकी घेतली आणि पुढची उडी थेट कागदावर. अर्थात ड्राइव्हर तो अडीच वर्षाचा चिमुकलाच. मग त्या नव्याकोऱ्या स्वच्छ मैदानात मनसोक्त गाडी चालवली आणि त्या मैदानावर क्षणात हिरवळीचे साम्राज्य पसरले. लहान मुलांचा मूळ स्वभाव... कोणतीही गोष्ट अधिक काळ ते झेलू शकत नाहीत. आता हिरवा रंग नको असा विरोध समोरून आला आणि मी सुद्धा नवा रंग शोधू लागले. पण त्यानेच निळा रंग माझ्या हातात दिला- 'मला हा ब्ल्यू कलर हवा '. बहुतेक मुलांना निळा रंग लहानपणापासूनच आवडतो हे त्या क्षणी प्रकर्षाने जाणवले. 'ठीक आहे. निळा तर निळा...' म्हणत मी तो डिशमध्ये काढू लागले. आता त्याला रोलर पण कंटाळवाणा वाटू लागला. ही गोष्ट अगदी माझ्या मनासारखी झाली. लगेच रोलर बाजूला ठेवला आणि क्लेआर्ट चे साचे त्याच्यासमोर ठेवले... फुलपाखरू , टेडी बिअर,झाड ,मासा अशा कितीतरी आकाराचे साचे रंगात बुडवून त्यांचे निळे ठसे कागदावर उमटले. ते करण्यात मग्न असलेल्या ओमला मी पिवळ्या रंगात न्हाऊन निघालेला ब्रश हाती दिला. ठरल्याप्रमाणे त्याने त्या चित्रावर इथे तिथं स्ट्रोक्स मारण्यास सुरुवात केली. पूर्वीचा हिरवा आणि निळा रंग थोडाफार ओला असल्याने या नवीन पिवळ्या रंगाच्या सुंदर छटा सगळीकडे पसरल्या. कापसाच्या बोळ्याने केशरी रंगाचे सुर्यास्तासमयीचे ढगही त्या देखाव्यावर जमा झाले. पुढे त्या इवल्याशा बोटांना लाल रंग लावून त्या बागेत फुलांचा वर्षाव झाला. मध्येच काळा रंग वापरण्याची हुक्की झाली आणि त्यातूनच काळ्या ठिपक्यांचा पाऊस पडला. चित्रात बॅलेन्स नावाचा एक प्रकार असतो.कदाचित त्या चिमुकल्या मनाच्या कल्पनेतही तो असेल. पण शेवटी त्या चंचल मनाची स्थिरता आता संपू लागली. हाताच्या हालचालींवरचा ताबा आता सुटत होता. तसे मी ते सर्व रंग त्याच्याकडून काढून घेतले.नैसर्गिक नियमानुसार थोडी रडारड झालीच असती जर मी अचूक वेळी त्याला भेट म्हणून मिळालेले नवीन क्रेयॉन रंग त्याला दिले नसते तर. त्यातला आतापर्यंत चित्रात नसलेला चॉकलेटी रंग दिला. २ रेघोट्या मारून त्याने त्याचा मोर्चा पुन्हा काळ्या रंगाकडे वळवला. त्याच्या मनातली अस्थिरता त्या खरडण्यामध्ये पूर्णपणे दिसून येत होती. जितक्या रेघोट्या मला त्या चित्रात हव्या होत्या तितक्या पूर्ण झाल्यानंतर मी तो कागद त्याच्या हातून हळूच काढून घेतला. कधी कधी अनावश्यकतेच्या अतिक्रमणामुळे सुंदर चित्रही मिनिटभरात बटबटीत,कुरूप बनते हे सत्य अजून त्या बालमनाला काय माहित ? पण मोठ्यांना ते कळते. पण तरीही खूपदा मोठ्यांकडूनही अशा काही चुका घडून येतात ज्या खरेच त्यांना लहानांकडून शिकता येण्यासारख्या असतात.
लहान मुलं खूप छान असतात. निर्मळ, निरागस असतात.आणि हीच निरागसता ते खूपदा चित्रकलेच्या माध्यमातून जगासमोर मांडतात. ज्या गोष्टी सांगता येत नाहीत ते चित्रातून सांगतात, फक्त त्या कळून घ्यायची मानसिकता आपल्यापाशी असायला हवी. पसारा मांडतील, रंग सांडतील, कदाचित भिंतीदेखील रंगतील. पण त्यातून त्यांना आणि त्यामुळे आपल्याला मिळणारा तो आनंद, समाधान वेगळेच असेल. योग्य तऱ्हेने आणि समजूतदारीने बरेच काही मिळवता येते.अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी ही निरागस बालके नेहमीच आपल्याला शिकवत असतात.पण आपल्याकडेच त्यांच्याकडून शिकून घेण्यासाठी वेळ नसतो किंवा ती मानसिकताच नसते. "मुले म्हणजे देवघराची फुले" असे म्हणतात ते एका अर्थी खरेच आहे.या प्रत्येक मुलामध्ये एखादी कला उपजतच असते. तिला अचूक ओळखून खतपाणी घालणेही तितकेच महत्त्वाचे आहे जितके त्या फुलाला जपणे. नुसतेच मोठ्या मोठ्या फी भरून शाळा -क्लासेस मध्ये प्रवेश दिला म्हणजे आपले कर्तव्य पूर्ण होत नाही. त्यासोबतच त्यांना आपला वेळ , आपले मार्गदर्शन...सर्वार्थाने आपण हवे असतो. त्यामुळे या सर्वांसोबतच आपल्या पाल्यांना प्रत्येक बाबतींत स्वतःचे विचार मांडण्याची थोडीशी मोकळीक आणि प्रोत्साहन प्रत्येक पालकाने द्यायला हवी असे मला तरी नेहमीच वाटते.एखादा विरंगुळा जोपासता जोपासता त्यातून काही शिकणं आणि शिकवणं म्हणजे प्रगतीच्या दिशेने पुढे टाकलेलं एक पाऊलच, नाही का ? थोडक्यात काय, मुलांचा गुंता सोडून बाहेर न पडता त्या गुंत्यात अडकून जायचं... आपोआप सगळं कसं छान सुटसुटीत होऊ लागतं.

- रुपाली ठोंबरे.