आज सकाळीच इतर बऱ्याच उपयोगी-निरुपयोगी मेसेजेस सोबत आणखी एक मेसेज माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर स्थिरावला आणि तो नजरेखालून जाताच मनात अगदी खोलवर जाऊन बसला , माझ्या विचारांच्या चाकांना नव्या दिशेने गती देण्याचे त्याचे कार्य सुरु झाले आणि मग इतर मेसेजेसप्रमाणे अजिबात माझ्या मोबाइलपासून दुरावला नाही तो. उलट ' जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा' या शीर्षकासह आणखी कितीतरी जणांपर्यंत तो थेट त्यांच्या त्यांच्या मनात जाऊन बसला.
'जागतिक पुस्तक दिन '... आश्चर्य वाटले ना ऐकून ? मलाही वाटले होते. जगात दरदिवशी कोणता ना कोणता दिवस अमूकतमूक जागतिक दिन म्हणून साजरा केला जातो पण पुस्तकांचाही असा दिवस असेल हे मात्र कधी कल्पनेतही नव्हते. पण असो.... असा दिवस अस्तित्वात असणं ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. ही कल्पना माझ्या मनाला खूप भावली आणि त्यातून निर्माण झाली उत्सुकता या दिनाविषयी.आणि मग काय ? जराही वेळ न दवडता कधी ,कोणी ,का,कसा अशा अनेक प्रश्नांची उत्तरे भरभर शोधली गेली.
२३ एप्रिल १९९५ पासून युनेस्कोने दरवर्षी ' जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिवस अशी पुस्तक वाचन तसेच कॉपीराईट व पुस्तक प्रकाशन यासाठी लोकांना प्रवृत्त करणारी ऐतिहासिक घटना घडवून आणली. खरेतर २३ एप्रिल आणि पुस्तकांचा पहिला संबंध झाला तो १९२३ मध्ये. विख्यात स्पॅनिश लेखक Miguel de Cervantes यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ Valencian लेखक Vicente Clavel Andrés यांनी मांडलेली ही कल्पना. शिवाय William Shakespeare आणि Inca Garcilaso de la Vega या दोघा कलाकारांची पुण्यतिथी देखील तीच आणि म्हणून १९९५ साली युनेस्को तर्फे 'जागतिक पुस्तक दिवस' म्हणून २३ एप्रिल या दिवसावर शिक्कामोर्तब झाले. वेगवेगळ्या देशांत हा दिवस वेगवेगळ्या तऱ्हेने साजरा केला जातो.इतर दिवसांप्रमाणे या दिवसाचे महत्त्वाचे स्वरूप एकच - भेटवस्तू देवाणघेवाणीचे पण या प्रसंगी कित्येकदा ती भेटवस्तू म्हणजे पुस्तक. काही ठिकाणी सामूहिक वाचन सुद्धा केले जाते.
आपल्या देशात वॅलेंटाईन्स डे , मदर्स डे, फ़ादर्स डे यांसारखे या दिवसाचे प्रस्थ नाही किंबहुना असा दिवस अस्तित्त्वात आहे हे देखील अनेकांना माहित नसेल. पण मग मला एका मेसेज मधून ही माहिती मिळाली तर विचार केला कि का नाही अशा सुंदर दिवसाबद्दल जगाला सांगायचे आणि मग मी आज हो लेख लिहिण्यास सुरुवात केली.
आपण जन्मास येतो. पहिले २-३ वर्षे पार पडली कि मैत्री होते ती पुस्तकांशी.ही पुस्तके आपल्याला काय नाही देत ?अक्षर-अंक ओळख , जगाची सैर ,कल्पना विकास सारेच काही तर या पुस्तकांच्या सहवासात सामावलेले असते. पण आज कॉम्प्युटरच्या युगात ही पुस्तके दुरावली जाऊ लागली आहेत. आज पुस्तकांपासून दूर जाणाऱ्या पाखरांना पुन्हा त्या अक्षरांत ,कल्पनांत,पुस्तकांत रममाण होण्यासाठी आणणे ही किती सुंदर कल्पना? पण त्यांना वाचणारा वर्ग आज नाहीसा होऊ लागला आहे. म्हणून हीच योग्य वेळ आहे आपणही हा दिवस साजरा करण्याची. पण पुस्तक दिवस साजरा करणे म्हणजे नक्की काय ? फक्त एखादे पुस्तक एकमेकांना भेट देणे ?पुस्तक भेट म्हणून देणे जितके आवश्यक तितकेच त्याच्या वाचनात रुची निर्माण करणे महत्त्वाचे.नाहीतर कपाटात पडून वाळवीच्या स्वाधीन करण्यात अथवा रद्दीच्या भावात तराजूवर ठेवण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे अशा अनमोल भेटीला मातीमोल करून आपण स्वतःलाच न्याय देत नाहीत. म्हणून प्रत्येकाने आज वाचनाचे महत्त्व समजून घेऊन इतरांनाही समजवावे आणि आजपासूनच जितकी जमतील तितके वाचन करण्याचा पण करणे हा खरा पुस्तकोत्सव.
बरेच दिवस मीसुद्धा कामाच्या व्यापात या पुस्तकमित्रांपासून दुरावले होते. पण आता ठरवले आहे कि वेळात वेळ काढून एक परिच्छेद का होईना पण माझी पुस्तके आता वाळवीच्या किंवा रद्दीच्या स्वाधीन होणार नाहीत. आणि हे बघा , अगदी आत्ताच मी एक सुंदर पुस्तक वाचण्यासाठी म्हणून हातात घेतले आहे... दोन-चार पाने वाचूनही झालीत... एक वेगळेच समाधान ,आनंद मिळतो... तर मग चला तर तुम्ही सुद्धा तुमचे कपाट उघडून एकवार पहा ... अडगळीत पडलेले ते पुस्तक हातात घ्या... आणि त्याच्या प्रत्येक पानात , प्रत्येक ओळीत ,प्रत्येक शब्दात ज्ञान मिळवा... आनंद अनुभवा... स्वतःला शोधा... कारण शोधले तर सापडतेच ... फक्त योग्य दिशा मिळायला हवी... आज कदाचित ती मिळते आहे, हो ना ?

- रुपाली ठोंबरे.
वाचण्यासाठी अजून काही
No comments:
Post a Comment