" निर्वी , ऊठ आता . घड्याळात पाहिलेस का ? १०.३० वाजायला आलेत."वहिनी खिडकीवरचे लाल-गुलाबी पडदे दूर सारत खिडकी उघडत निर्वीला उठवत होती .आणि निर्वी अजूनही गाढ झोपेतच. प्रखर सूर्यप्रकाशाची किरणे डोळ्यांवर पडताच काहीसे वैतागून आणि चादर चेहऱ्यावर ओढून घेत निर्वीने कूस बदलून पुन्हा झोपी जाण्याचा प्रयत्न केला.
"वहिनी , झोपू दे ना गं. खूप उशिरा झोपले आहे मी काल रात्री."वहिनी निर्वीशेजारी येऊन बसली.तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली ,
"ते माहित आहे मला. काल जे झाले त्यानंतर घरात कुणाच्याच डोळ्याला डोळा लागला नाही. पण बाळा, आता ऊठ. खरंच खूप उशीर झाला आहे. आई अशाच खूप रागात आहेत. पुन्हा त्यांचा राग ओढवून घ्यायचा आहे का?"ह्म्म्म.... निर्वीने चादरीतून डोके बाहेर काढत सरिता वहिनीकडे पाहिले. तिचा हसरा चेहरा पाहिला आणि निर्वीला पुन्हा रडू आले. तिने मिठीच मारली. आणि हुंदके देत वहिनीची माफी मागू लागली.
"सॉरी ... आय एम सो सॉरी वहिनी. माझ्यामुळेच झाले ना सर्व ? मी तुला आधीच सर्व सांगायला हवे होते. आई खूप ओरडली ना तुला? माझ्यामुळेच ... सॉरी. "रडणाऱ्या आपल्या नणंदेला भानावर आणत सरिताने पुन्हा तिला उठण्याची विनंती केली.
"अगं वेडाबाई , चूक काय फक्त तुझीच होती काय? सर्वांचीच झाली थोडीफार. आणि माझ्या हातून थोडी जास्तच. चल आता. जेवणाची तयारी सुरु करायला हवी. नाहीतर बाबांच्या रागाचाही सामना करावा लागेल."निर्वी आता चांगलीच उठली हे पाहून वहिनी खोलीतून निघून तिच्या कामाला लागली.
इकडे निर्वी ला अचानक काही आठवले आणि अस्ताव्यस्त झालेल्या बिछान्यामध्ये ती अधाश्यासारखे काही शोधू लागली . फोन मिळाला आणि तिला हायसे वाटले. तिने आलेले मेसेजेस पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावरचे हसू कुठल्या कुठे गायब झाले. गेल्या काही दिवसांमध्ये असे प्रथमच झाले होते कि सार्थकचा 'Good morning ' मेसेज तिला आला नाही. तिला वाईट वाटले. पण मनाशी काही ठरवून तिनेच त्याला मेसेज केला आणि रूमबाहेर पडली. दुपारच्या जेवणाची वेळ होत आली. निर्वी अजूनही त्या फोनला चिटकून होती. जरा कुठे काही वाजले कि तिची नजर लगेच त्याचे शब्द शोधू लागे. पण सारे व्यर्थ. तिने पुन्हा स्वतःच त्या एकतर्फी संवादात आणखी मेसेजेस ची भर घातली. आणि पुढच्याच क्षणी १-२-३-४.... कितीतरी मोठी किलबिल तिच्या फोनवर झाली. तिने त्वरेने त्यावर आलेले नवीन मेसेजेस वाचले,
"Hi निर्वीतिची जुनी मैत्रीण, प्रियाचा मेसेज पाहून निर्वीचा हिरमोडच झाला. ती तशीच तिच्या खोलीत गेली. जेवायलाही आली नाही. स्वतःशीच रडली ... रुसली... काय करावे हे तिला सुचेचना. घरी सुद्धा आता तिला कोणाशीच काही बोलावेसे वाटेना.तो इतका का रागावला असेल हे ही तिला समजेना ...बोलून गोष्टी सुकर होतात ना ? मग ? एकदा फोन लावून देखील पाहिला . पण त्याने तो उचलला नाही. सावरलेली ती पुन्हा रडू लागली. आणि तशीच झोपी गेली.
कशी आहेस तू?
अगं आपले सुहासच्या बर्थडे पार्टीचे फोटो तुझ्याकडे आहेत ना ?
प्लिज पाठवशील का मला ?
मला ना त्याला एक सरप्राईझ द्यायचे आहे.त्यासाठी हवेत. माझ्याकडे होते गं . पण नेमका तो फोन हरवला गेल्या महिन्यात. सो प्लीज पुन्हा दे मला ई-मेल वर .
चल बाय . बोलू लवकरच.
नक्की पाठव बरे...आणि लवकर :-)"
कर्णकर्कश आवाजात तिचे आवडते गीत फोनवर वाजू लागले आणि ती झोपेतून उठली. रिंग ट्यून होती तिची ती. 'Priya Office' नाव पाहिले आणि वैतागून फोन कट केला तिने. तिला आता कोणाशीच बोलण्याचे मन नव्हते. खिडकीबाहेर नजर गेली तर जाणवले... अरेच्चा !संध्याकाळ झाली ? इतका वेळ झोपून होते मी. पुन्हा एकदा फोन तपासून पाहीला. हवा असलेला कॉल किंवा मेसेज आला नाही हे पाहून हिरमुसून गेली. पण ती तशीच उठून'हॉल मध्ये आली. सर्व आपापल्या कामात व्यस्त. किचनमध्ये डोकावून पाहिले तर स्वयंपाकाची तयारी सुरु होती . आईने तिच्यावर एक कटाक्ष टाकला आणि न बोलताच बरेच काही बोलून गेली ती. निर्वी रागानेच हॉलमध्ये येऊन रिमोट घेऊन TV समोर बसली. आज कोणीच कोणाशी फारसे बोलत नव्हते. बाबा आणि वहिनी थोडे फार सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत असले तरी एक प्रकारची शांतता पसरली होती त्या घरामध्ये. प्रियाचा वारंवार येणारा फोन ती शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत होता. पण निर्वीचे त्याकडे दुर्लक्ष होते. तिने पुन्हा एकदा सार्थकला कॉल करून पाहिला . पण छे ! यावेळी पण फक्त रिंग वाजत राहिली.
स्वयंपाक झाल्यावर लगबगीने वहिनी बाहेर आली,
" बाबा स्वयंपाक झाला आहे. चला जेवायला.निर्वी, चल ऊठ बेटा . सकाळपासून काहीच खाल्ले नाहीस तू पण. जेवून घे. तुझ्या आवडीचे पराठे केलेत मी."निर्वी मुकाटपणे डायनिंग टेबलवर येऊन बसली. सारे जेवत असतानाही प्रियाचा येणारा फोन आता सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. शेवटी आईच म्हणाली ,
" अगं घे तो फोन . कधीपासून नुसता वाजतोय. आणि नाही बोलायचे असेल तर फोन सायलेंट वर तरी ठेव. डोके भणाणून गेलेय नुसते. "आईचा वैतागवाणा सूर ऐकून निर्वीने शांतपणे एक मेसेज पाठवून त्या कॉल मालिकेला तात्पुरता स्वल्पविराम लावला. जेवल्यानंतर तिने प्रियाला फोन केला तर तो वैतागूनच ,
"अगं , काय प्रिया , मी बोलले होते ना पाठवते म्हणून . तरी इतके कॉल्स ? यू आर इम्पॉसिबल. "
"निर्वी , तुला काय वाटते तुला मी ओळखत नाही ? एरव्ही तू लगेच पाठवले असते. पण आज सकाळची संध्याकाळ होऊन गेली तरी तुझा रिप्लाय नाही आणि तुझा तो उत्साह पण आज दिसत नाही. काहीतरी नक्की बिनसलेले दिसतेय. म्हणून मी फोन करत होते पुन्हा पुन्हा ."- प्रिया
"बरे पण तरी असे नॉन-स्टॉप कॉल्स ?"प्रियाच्या बोलण्यावर निर्वी चिडून म्हणाली.
आणि त्यावर तितकेच हसून प्रिया उत्तरली ,
" अगं तीच तर ट्रिक आहे जी मी सुहासबरोबर नेहमी वापरते . म्हणजे इतके फोन येत असतील तर ज्याला अजिबात बोलायचे नाही तोही माणूस वैतागून ओरडण्यासाठी का होईना पण एकदा तरी फोन उचलतोच . तेच मी केले.आणि तू रिटर्न कॉल केलास. हा हा हा ! आता प्लीज पाठव ते फोटोज . प्लीज प्लीज प्लीज... "
"हां हां ठीक आहे. आत्ताच पाठवते. थांब. तू ना ग्रेट आहेस."असे म्हणत निर्वीने तिचा फोन कट केला. आणि पुढच्याच क्षणाला सार्थकला फोन लावला. एकदाच नव्हे तर अंदाजे ८ वेळा.... आणि एक वेळ अशी आली कि समोरून आवाज आला ,
" काय आहे निर्वी? काय झाले आहे? किती फोन ?"सार्थकचा वैतागून असला तरी तो आवाज ऐकून निर्वीला हायसे वाटले . आणि अगदी नकळत तिने तिच्या मैत्रिणीला शाबासकी दिली.
" अरे त्याशिवाय तू माझा फोन घेतच नव्हतास . पण प्रिया इज रिअली ग्रेट...."
"प्रिया ? आता ही कोण ?"
"अरे माझी एक मैत्रीण आहे . तिचीच ही आयडिया... बरे ते सोड. तू सांग. तुला काय झाले आहे ? इतका राग ?"
"हो मग. काल जो काही प्रकार तुझ्या घरी झाला तेव्हापासून माझे आई बाबा फार चिडलेत. आणि हे सर्व तुझ्यामुळे ?
" काय ? माझ्यामुळे ? काहीही. अरे तुला माहित आहे खूप मोठा गैरसमज झाला होता काल? त्यातूनच हे सर्व घडले. म्हणजे नक्की काय झाले सांगू का ?"सार्थक शांत होऊन आपली बाजू समजून घेऊ इच्छितो आहे हे कळताच निर्वी घडलेली कहाणी कथन करू लागली.
"....म्हणून आई-बाबांना वाटले होते कि निहालच येईल पण आलास तू ? आणि मग गोंधळले ना ते पण... खरेतर वहिनीने थोडा घोळ घातलेला आधी.... पण ...आणि निहाल... "इतका वेळ शांतपणे ऐकून घेणारा सार्थक पुन्हा पुन्हा येणारे निहालचे नाव ऐकून वैतागून म्हणाला ,
" आता हा निहाल कोण ?"निर्वी जणू या प्रश्नाची वाटच पाहत होती. ती त्याच्याबद्दल सांगत असताना सारे काही विसरून तिच्या दुबईच्या दिवसांत हरवून गेली. निहालबद्दल निर्वीच्या मनातील अशा भावनांनी सार्थक अस्वस्थ झाला... चिडला....
"काय ? तू आपल्याबद्दल पण त्याला सांगितले होतेस ?"
"अरे हो . तुला माहित आहे तुला विमानतळावर भेटल्यानंतर मी फार गोंधळले होते. तो सारा गोंधळ निहालनेच दुर केला होता . त्याच्या सांगण्यामुळेच मला हिम्मत आली होती तुला खरे सांगण्याची . Actually , you should thank Nihal... "
"व्वा ! निर्वी , खरंच कमाल आहेस तू ? आता हे सर्व ऐकून माझे डोके सुन्न झाले आहे.काही सुचत नाही. "
"अरे पण ..."
"निर्वी , प्लीज मला आता पुढे काही ऐकून घ्यायचे नाही. आणि खरेतर आता समजते आहे तुझ्या आई बाबांनाही काल का निहाल येईल असे वाटत होते ते .... "
"म्हणजे ?" - निर्वी .
"तू माझ्यासमोरच त्याच्या बद्दल किती काही आणि कशा प्रकारे बोलते आहेस . नक्कीच काहीतरी असेल आणि म्हणूनच तुझ्या आईला ..." -सार्थक .
"सार्थक... एक मिनिट. तू माझ्यावर संशय घेतो आहेस. माझ्या मनात असे काही नव्हते... "
"मग त्याच्या मनात असेल . त्याने सांगितले असेल. मला माहित नाही.सध्या नको हा विषय. नंतर बोलू ." - सार्थक.
"अरे पण खरंच... " -निर्वी .
"प्लीज निर्वी . गुड नाईट ." - सार्थक .निर्वी तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत राहिली पण सार्थक तिचे काहीही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हता. फोन कट झाला पण त्याचे काही शब्द मात्र तिच्या डोक्यात फिरू लागली .
'अरे हो , खरंच . आई बाबांना निहाल येईल असे का वाटले असेल . हा विचार तर केलाच नाही . ते त्याला भेटले नाहीत आणि मीही फारसे खूप काही असे सांगितले नाही कि ज्यामुळे आई असा निर्णय घेईल'निर्वीला जुने दिवस आठवू लागले. ती पावसातली भेट, तो तिला भेटण्यासाठी आला होता.
' अरे हो , तेव्हा तो म्हणाला होता कि तो घरी गेला होता . तेव्हा भेटला होता . पण त्याने असे काही सांगितले असेल ?'न राहवून निर्वीला आता निहालवर राग येऊ लागला होता. इतक्यात फोनवर मेसेज आला त्यावर नजर गेली तर पुन्हा प्रियाचा मेसेज. तसे तिला काही आठवले आणि निर्वी लॅपटॉप घेऊन बसली. प्रियाला हवे असलेले सारे फोटोज एकत्र करून ती पाठवत होती. तिची नजर चॅट लीस्ट वर गेली. तिथे निहाल ऑनलाईन दिसत होता. याच्याशी आता बोलू का नको अशा दुविधेमध्ये ती प्रथमच स्वतःला पाहत होती.
तिकडे खूप दूर निहालसुद्धा बऱ्याच दिवसांनंतर ऑनलाईन आला होता. नेहमीप्रमाणे निर्वीला पाहिले... त्याला काही आठवले ... स्वतःशीच हसला तो... क्षणापुर्वी टाईप केलेला "How r u ? चा मेसेज " ती तर खूषच असेल तिच्या सार्थकसोबत असे मनातच म्हणत डिलीट केला. आणि लॉग आऊट करण्यास बोटे फिरू लागली तोच समोरून मेसेज आला ...
निर्वी : Hi !निहाल चकित झाला आणि तेवढाच आनंद सुद्धा झाला त्याला. त्याने त्वरित रिप्लाय केला.
निहाल : Oh Hi ? How r u ?निहालच्या या प्रश्नावर निर्वीची जी एक उत्तरमालिका समोर आली ती पाहून त्याला कितीतरी वेळ विश्वासच बसेना या सर्वावर .
निर्वी : Not fine .निर्वीला आता यावर काय बोलावे ते सुचत नव्हते . निहालवरचा रागही आता शांत झाला होता. दोघांमध्ये याच विषयाला घेऊन थोड्या गप्पा झाल्या. आता घडलेल्या प्रकारातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करायला हवा हे दोघांनाही पटत होते . निहालने तिला आश्वासन दिले कि अजाणतेपणे त्याच्यामुळे हे घडले आहे म्हणून तोच यातून मार्ग काढण्यास तिला मदत करेल. तो मुंबईतच असल्याने त्यांची पुढची भेट ठरली आणि चॅट मधून दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला.
निहाल : hmm ...का ?
निर्वी : तुझ्यामुळे ?
निहाल : माझ्यामुळे ? मी काय केले ?
निर्वी : तू खरे खरे सांग. तू आई बाबांना काय सांगितले ?
निहाल : कशाबद्दल ?
निर्वी : अरे आपल्याबद्दल . तू का असे काही सांगितलेस.
निहाल : म्हणजे ? निर्वी मला खरंच काही कळत नाहीय . नीट सांगशील का काय झाले आहे ते ?
निर्वी : OK. काल सार्थक त्याच्या आईबाबांसोबत घरी आला होता.
निहाल : अरे वाह ! That's good. तू आनंदी असायला हवीस मग तर.
निर्वी : तू मी काय सांगते आहे ते आधी ऐकून घेशील ? तर ते घरी आले तेव्हा त्याला पाहून आईबाबांना धक्का बसला कारण त्यांना माझ्यासाठी कोणी दुसरा अपेक्षित होता.
निहाल : दुसरा ? तू घरी आधी सांगितले नव्हतेस का ?
निर्वी : हम्म्म . ते थोडे कॉन्फयुजन झाले होते. पण हा दुसरा म्हणजे कोण माहित आहे ?
निहाल : मला या सार्थकशिवाय आणखी कुणाबद्दल तू सहसा सांगितल्याचे आठवत नाही. असा आणखी पण होता कोणी ?
निर्वी : निहाल, मला या क्षणाला मजाक नकोय.तर तो दुसरा अजून कोणी नाही तर तू होतास .
निहाल : (आश्चर्याने ) काSSS य ? मी ? असे कसे शक्य आहे ?
निर्वी : तेच तर मला तुला विचारायचे आहे. तू त्या दिवशी माझ्या घरी येऊन काय सांगितलेस ?
निहाल : अगं, असं काही विशेष बोलणे झाले नव्हते. हा तर माझ्यासाठी पण मोठा धक्का आहे कि त्यांना तुझ्यासाठी मी योग्य वाटला.
निर्वी : हे बघ , त्यांना काहीही वाटो. पण माझ्या मनात सार्थक आहे आणि तोच राहील. हे तुलासुद्धा चांगले माहित आहे .
निहाल : हो हो. मग काय ... तुम्ही आणि सार्थक म्हणजे स्वर्गात बनलेली जोडी.. मी तर आधीच म्हणालो होतो. तुम्हालाच पटत नव्हते .
निर्वी आता फार शांत झाली होती . तिच्या मनातले वादळ शांत झाले होते . निहालसोबत बोलण्याने तिच्यावर होणारा हा परिणाम अनेकदा तिलाही चकित करून जायचा. तिथे निहाल मात्र एका वेगळ्याच विचारचक्रात होता. निर्वीच्या आईबाबांनी निर्विसाठी निहालचा विचार केला हे त्याच्या मनाला खरेच सुखावून गेले होते . पण तसे असले तरी त्याला निर्वीचे मन आता खूप चांगल्या प्रकारे समजले होते . तिच्या मनात सार्थकशिवाय कोणी नाही हे एक सत्य होते. तो आता यातून बाहेर पडण्याच्या मार्गावर विचार करू लागला . असा विचार करता करताच त्याचा डोळा लागला.
- रुपाली ठोंबरे.