लहानपणी बा बा मा पा पासून सुरु होते आपली सर्वांचीच या जगातल्या सर्वात सुंदर अशा 'शब्द' या देणगीशी ओळख.अगदी प्रथम हे एकाक्षरी बोलच आपले संवादाचे साधन. आणि या बोबड्या बोलांचा आपल्या वडिलधाऱ्याना वाटणारा केवढा तो आनंद .
थोडे मोठे झालो कि, अ आ इ … क ख ग या मुळाक्षरांपासून सुरु होत पुढे या अक्षरांना योग्य काना ,मात्रा , वेलांटीने सजवत शब्दांची सुंदर रचना शिकत जातो . तेव्हा नवीन शब्द शिकणे , त्याचा अर्थ समजून घेणे , योग्य ठिकाणी वापरून सर्वांना अचंबित करणे हा जणू छंदच. रोजच्या व्यवहारातील असे खूप शब्द बालपणीच्या मित्रांप्रमाणे आपल्या मेंदूत जमू लागतात. मग शाळा ,कॉलेज जसजसे पुढे शिकत राहू रोज नवनवीन शब्दमित्र भेटत राहतात. आणि अशाप्रकारे हा मित्रपरिवार वर्षानुवर्षे पुढे वाढत राहतो. जितक्या भाषा जास्त तितका विविध शब्दसंचय आपल्या ठायी. एखादया खऱ्याखुऱ्या मित्राप्रमाणे जेव्हाही गरज पडेल हे शब्द लगेच सहाय्य करण्या धावून येतील. कधी समजवण्यासाठी ,कधी सल्ला देण्यासाठी तर कधी कोणतीही भावना व्यक्त करण्यासाठी नेहमीच हे शब्द आपली साथ देतात.आपण जितके नवीन वाचू ,ऐकू तितका हा अमुल्य मित्रपरिवार वाढत जातो.
विचार करून पहा , रोज ५ शब्द म्हणजे आठवडयाला ३५ , एक महिन्यात १५० आणि एका वर्षात १८२५ नवीन शब्द. डिक्शनरी घेवून बसलो तर एवढे शब्द शिकायचे म्हणजे अंगावर काटाच उभा राहील आणि हे अशक्यच असे मानून आपण ते झटकून टाकू . पण "थेंबे थेंबे तळे साचे " या उक्तीप्रमाणे रोज ५-५ असे शब्दज्ञान मिळवले तर आयुष्यात आपण भाषेत बरेच प्रवीण होवू . मग ती भाषा कोणतीही असो . शब्दसंचय मुबलक असेल तर कोणत्याही भाषेवर व्याकरणाची योग्य साथ घेवून प्राविण्य मिळवू शकतो.आपले मत योग्य प्रकारे मांडणे ही माणसाची नेहमीच एक खूप मोठी गरज आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात देखील. आणि हे या शब्दरुपी मित्रांच्या साथीनेच शक्य आहे .
मग चला तर आजपासूनच दिवसातून ५ मिनिटे काढू ५ नव्या मित्रांना शोधण्यासाठी…
म्हणतात ना जगाला ज्ञान देण्यापूर्वी आधी स्वतःपासून सुरुवात करावी . मी ही तेच केले आहे . माझ्या "umatlemani .blogspot.in " या ब्लोगमध्ये माझे शब्दकोश हे पान म्हणजे माझ्या अशाच नव्या शब्दमित्रांचा परिवार जो असाच वर्धावा दिवसेंदिवस हाच एक ध्यास .
- रुपाली ठोंबरे

रोज रात्री आकाशात असंख्य दिवे लागतात आणि त्यासोबतच पृथ्वीवरचे दिवे मालवतात . आणि शांतपणे निजणाऱ्या या जगासोबत आपणही झोपेची वाट पहात पडून राहतो क्षणभर . पण अशा वेळी कधी असा विचार मनात आला का कि आजच्या दिवसात आपण नक्की काय शिकलो?
बहुतेकवेळा आपल्या या प्रश्नाला खूप उत्तरे असतीलही पण कधी कधी आपण निरुत्तर असतो कारण तो दिवस काहीही न शिकवताच गेलेला असतो. खरे तर शिक्षण सुरु असताना रोज नवनवीन गोष्टी आपण शिकत असतो .पण एकदा का नोकरीच्या रहाटगाड्याला आपले जीवन बांधले गेले कि मग मात्र कित्येक दिवस तेच तेच काम करत असताना नवे काही शिकण्याचेच विसरून जातो. आणि मग बुद्धीला गंज चढावा असे आपले होऊन जाते.

माझ्या मते जीवन म्हणजे एक अखंड शाळा जिथे कायम काहीतरी शिकत राहिले पाहिजे. पण रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण हे वाचन ,नवे शिकणे विसरून जातो आणि या संचयाची वाढ जणू खुंटून जाते. काही वर्षांपूर्वी मला एकाने एक छान गुरुकिल्ली दिली होती ती आज तुम्हाला सांगावीशी वाटते. रोज जास्त नाही फक्त ५ नवे शब्द अर्थासहित शिकावे . प्रत्येकाने हे करून पाहायला काहीच हरकत नाही . झाला तर कधीतरी फायदाच होईल यात तिळमात्रही शंका नाही. आपण रोज वर्तमानपत्र वाचतो ,नवीन पुस्तके वाचतो,बरेच काही ऐकतो तेव्हा असे अपरिचित सापडलेले शब्द दुर्लक्षित करून पुढे जाण्याऐवजी त्यांना थोडे गोंजारावे ,त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा ,मागे कधी काही ओळख होती का हे पडताळून पहावे आणि नाहीच आपल्या सान्निध्यातला वाटला तर इतर कुणाला सांगून पाहावा ,कुठेतरी शोधून पाहावा मला खात्री आहे या नवीन मित्राचे नाव,गाव अर्थ नाते सर्व नक्कीच कधीतरी गवसेल.