Thursday, February 12, 2015

मीही बाबा आहे माझे राणी ….



मीही बाबा आहे माझे राणी ….

 ( वडिल आणि मुलगी हे एक सुंदर नातं आहे . आईची माया तर जगप्रसिध्द आहेच पण वडिलांचे चे प्रेम दिसत नसले तरी ते अजोड आहे .
त्याची तुलना जगात कशाचीच करता येणार नाही .
आणि मुलीना तर बाबाच अधिक प्रिय असता
आणि तिच्या बाबांना तीच … )


आमची संसाराची वेल
तीवर उमललं एक फूल
मुलगी आहे ते मूल
कळता हे आनंदलं मन ।।

हाती घे
ता करांगुली
कंठ आला गं दाटुनी
रूप पहाता हे गोजिरे
आले डोळियांत पाणी ।।

इवल्या पावली पैंजण
आज भरलं अंगण
वाटे पाहून हा क्षण
सौख्य आलं घर रांगत ।।

केला हातांचा पाळणा
आणतो हवा तो खेळणा
तुझ्या संगे राहण्या
करतो किती मी बहाणा ।।

माझी खरीखुरी बाहुली
खेळेल मग भातुकली
त्या दिवसाच्या चाहुलीतही
येते मन माझे भरुनी ।।

तू आली अन नीज तिथेच थांबली
हाक तुझी अन जाग मला आली
कधी नको घाबरू वेळ कशी जरी आली 
ऊन-पावसातही आहे मी तुझी सावली ।।

तुझ्यासाठी करेन मी रक्ताचेही पाणी
तू आलीस अन अर्थ आला या जीवनी
तुझ्याविना माझी अवस्था केविलवाणी
माहित आहे आई प्रिय तुला ,पण जाण
                  …मीही बाबा आहे माझे राणी ।।


- रुपाली ठोंबरे





8 comments:

  1. कौतुक करायला शब्दच सापडत नाहीत मला. कुणाच्याही मनाचा ठाव घेणारी कविता आहे. कविता वाचताना ती जगल्याचा अनुभव करून देते.फारच छान वाचून डोळ्यात आल पाणी !!!!

    ReplyDelete
  2. ..............................................

    ReplyDelete
  3. खूप छान, अगदी मनापासून लिहिलीस
    अजून शेवटचे अक्षर match करण्यात गोडवा जातो
    मुलगी आहे कळता आनंदले गं माझे मन
    -----
    कंठ आला गे दाटुनि

    आनंदले डोळां पाणी

    इवल्या पावली पैंजण => इवल्या इवल्या पायी पैंजण (उमटतात ती पावलं - म्हणजे तळपाय)
    घर रांगत => घरी रांगत => घरी रंगत रांगत
    नको घाबरू => नकोस घाबरू
    सुरवातीला एक अक्षर लहान झाले ते बरोबर कर. आणि रुपाली ठोंबरे पण मोठ्ठे नाही तर सारखे तरी लिहिणे

    ReplyDelete
  4. khoopach chhan.. love your poems :):)

    ReplyDelete
  5. बाबाविषयी लीहणारे खुप कमी आहेत.तुम्ही छान लिहलय..बाबाबद्दल..खरा बाबा कुणाला कळत असेल तर तो त्याच्या मुलीला..एरवी सर्वासाठी तापट असणारा बाप मुलीसाठी मात्र
    हळवा असतो..आणि ते हळवेपण तुम्ही शब्दातून सुंदरपने मांडलय..Great Rupaliji

    ReplyDelete

Blogs I follow :