रक्तवर्णित फुले गंधित
वाहते मी तुज गणराया ।
आळविते मी तुझेच गीत
वर्णू किती तुझ्यावरी माझी माया ।।
पितांबर पिवळा कासूनि
बैसला तू या सिंहासनी ।
शोभते सामोरी माझ्या
सुक्ष्म रूप विशाल काया ।।
वाटी मोदकांची हाती
शोभे वक्र शुंडा त्यापाशी ।
एक हात सदा उभा असा
देत आशिर्वाद प्रिय भक्तां ।।
लंबोदर तू एकदंत तू
तूच आराध्य प्रथमही तूच ।
सुखदायक तू विघ्ननाशक
येई सकळ कार्य सिद्ध कराया ।।
भक्तीत तुझ्या मी
विसरले जग-मोहमाया ।
तुझ्यातच गवसले मज
सौख्य जीवनाचे, गणराया ।।
- रुपाली ठोंबरे .
Kya baat..! Ganapati bappa moryaaaa!!!
ReplyDelete