Monday, March 2, 2015

नीज माझ्या पाखरा....स्वप्नी भेटते मी तुला ।।


( एका आईने आपल्या चिमुकल्यासाठी म्हटलेली अंगाई) 



नीज माझ्या पाखरा
बघ, निजली सारी धरा
वाहतो हा गार वारा
बिलगून असा कुशीत ये जरा ||

पाहतो तुला चांद हासरा
बरसतो ताऱ्यांचा झरा
असे आकाश तुज पांघरा
घे अशी झोप शांत लेकरा
 
दिवस कधीचाच गेला सायंकाळी
रात्रही जाईल बघ आता मध्यरात्री
निजल्या पायवाटाही अन गाव सारा
परी का तू मांडतो अजून असा पसारा

तू मला अन मी तुला
एकमेकां असू आसरा
गात अंगाई झोप येई मला
तू ही जा झोपी , स्वप्नी भेटते मी तुला ।।


 - रुपाली ठोंबरे .



3 comments:

Blogs I follow :