छोटया छोटया प्रयत्नांतून ,संधींतून उलगडत गेलेले आयुष्य जेव्हा
मनोहर रूप घेते तेव्हा इतरही सुंदर गोष्टी आपोआप घडून येतात आणि जीवन अधिक उत्साहाने
आणि सौंदर्याने बहरू लागते . पण हे मिळवण्यासाठी धीर , कष्ट आणि उद्दिष्ट अंगी बाळगणे
महत्त्वाचे.
आज सुंदर झाले तळे
थेंबे थेंबे जे गोळा केले
भोवताली हिरवे वाळे
सुगंधी फूलांसवे फुले
थांबले इथेही शुभ्र बगळे
तृप्त झाले पशू तहानलेले
उमलली नाना कमळे
दृष्य मनोहर तरंगलेले
कधी आकाशापरी निळे
कधी चांदण्यांत न्हालेले
असे सुरेख एक आहे तळे
संथ लय-तालात उलगडलेले
- रुपाली ठोंबरे
Chhan
ReplyDeletechhan ahe hi poem. liked it. lihit jaa na tu. 11th sept pasun kahich update nahi.
ReplyDeleteSurekh kavita ahe Rupali. ..
ReplyDelete