पुष्प आभूषणांची शृंखला
सजली दिव्यांची उजळ मेखला
रूप साजिरे घटी देखणे
जशी आकाशी उजळ चंद्रकला
निरांजनांच्या दो वाती तेजस्वी
प्रसन्न चेहऱ्यावर सूर्य दो मनस्वी
शीत-उष्ण भाव किती बोलके
त्रैलोक्य सामावून उजळल्या ज्योती
डोळ्यांत तुझिया वाहे प्रेमकरुणेच्या सिंधू-गंगा
या नयनांच्या प्रकाशप्रवाहें उजळ मम् अंतरंगा
डोळ्यांत माझिया भक्तिसंगे साठले रूप तुझे माते
डोळ्यांत तुझिया मंत्रमुग्ध मी रंगले सर्वांगा
- रुपाली ठोंबरे.
Sundar kavita...
ReplyDeleteKhupch sundar kavita aahe.nice......
ReplyDeleteWaahhhhh.. sundarr
ReplyDelete