Wednesday, February 21, 2018

आभाळभर शुभेच्छाफुले !!!



मी सांगते, आज काहितरी गजबच घडले... पहाटे उठले आणि पहाते तर काय ?... अवतीभवती अगदी खच पडला होता..... रंगीबेरंगी शुभेच्छा-फुलांचा.... प्रेमाच्या रंगाने डवरलेली लाल-केशरी सुंदर मोहक फुले.... मैत्रीच्या रंगात बहरलेली नाजूक पिवळी सोनफुले....शुभ्र ताटव्यात शोभून दिसणारी सुवासिक आशीर्वचनांची पवित्र फुले.... मी तर बाई, आज या फुलांच्या सहवासात स्वतःला एकदम स्पेशल फील करू लागले आहे ...मोबाईलवर आलेला यम्मी केक खाता येत नसला तरी त्याची गोड चव पोहोचली बरे का इथवर...फुलांचे सकाळपासून इतके गुच्छ मोबाईलमध्ये आले आहेत कि आता ३२ GB चे स्टोरेज कमी पडू लागलंय...पण खूप खूप भारी वाटतंय आज... वर्षातून एकदा तरी अशा बागेत रमायला खूप आवडते ना, प्रत्येकालाच ... आणि हो, प्रत्यक्षपणे मिळालेली फुले, केक आणि त्या गोड भेटी तर अनमोलच आहेत माझ्यासाठी... आणि या सर्वांसाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार ...आजच नव्हे तर नेहमीच दरवर्षी अशा आप्तस्वकीयांकडून येणाऱ्या आभाळभर शुभेच्छांच्या पावसात भिजायला खूप खूप आवडेल मला...अशा पावसात चिंब भिजूनच तर उद्याच्या स्वप्नांना जगायला मज्जा येईल , नाही का?


- रुपाली ठोंबरे.


No comments:

Post a Comment

Blogs I follow :