खरंच आहे , कोणाला आपला आनंद कुठे, कसा आणि कधी गवसेल हे सांगता येत नाही.... पण एक सकारात्मक दृष्टिकोन आणि सोबत मेहनत,जिद्द असेल तर त्या सुखाची चाहूल नक्कीच फार पूर्वीपासून मनाला लागते....जसे आज मी फार आनंदी आहे... या आनंदाचे कारण फार फार मोठेही नाही आणि अगदीच शुल्लक देखील नाही...जवळजवळ ३ वर्षांपूर्वी एक टाईमपास म्हणून सुरु केलेल्या माझ्या ब्लॉगच्या रोपट्याचे झाड आज इतके मोठे होईल असे कधी स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. आज हा 'उमटले मनी ' १ लाख वेळा देश-परदेशांतून वाचला गेला आहे ... आणि म्हणूनच मला ते पाहून खूप खूप आनंद झाला. इतका जितका एखादी हाताला न लागणारी गोष्ट अचानक सापडावी तितका. ज्या गोष्टीसाठी कधी हजारांची देखील अपेक्षा केली नव्हती ती गोष्ट आज लाखाची पहिली पायरी चढली... आणि अशाच पायऱ्या चढत राहो असे मनोमन वाटते आहे आज... पण हे सर्व शक्य झाले आणि शक्य होईल ते फक्त आणि फक्त माझ्या लेख आणि कवितांवर भरभरून प्रेम करणाऱ्या वाचकांमुळे. आजही आठवते जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा कित्येकजण म्हणाले होते कि मराठीत लिहितेस ? मराठी वाचत नाहीत कोणी जास्त. ... पण आज मराठी कोणी जास्त वाचत नाहीत ही माझ्यासाठी अफवा ठरली आणि कित्येकांच्या बऱ्याच प्रश्नांना उत्तरही मिळाले...खरेच ,माझ्यासारख्या नवोदितेच्या लेखणीला इतका भरभरून प्रतिसाद इतक्या कमी वेळात मिळू शकतो तर नक्कीच आपल्या मातृभाषेला आनंदाने बिलगणारी मने आजही जगभर विखुरलेली आहेत हे सिद्ध झाले , नाही का ?
३ वर्षांपूर्वी ऑफिसमध्ये कामाचा अचानक फार कंटाळा आला आणि सहज बसल्याबसल्या काहीतरी नवीन करण्याची कल्पना मनाला शिवून गेली. आणि मी मोठ्या कष्टाने मला न आवडणारे कोडिंगचे धागेदोरे उसवून गुंतवू पाहू लागले. त्यातूनच आणखी ओळखी वाढल्या. त्या ओळखीतून एकाच्या काही वर्षांपूर्वी सुरु केलेल्या कोडिंग संबंधित असलेल्या ब्लॉगचा पत्ता लागला. तो माझ्या आयुष्यातील पहिला क्षण जेव्हा मी या ब्लॉग नामक फुलपाखराकडे झेपावले.नेटवर असे कोणीही पोहोचू शकतो हे जाणून मला त्याचे खूप आकर्षण वाटले. पण मुळात मला कोडिंग मध्ये आवड नसल्याने सुरुवातीला तो ब्लॉग फार निरस वाटला.त्यातून बाहेर पडून माझे विशेष आकर्षण ठरलेल्या ब्लॉग या विषयावर इंटरनेटवर खूप काही जुने-नवे अवशेष, कलाकृती, संकल्पना उलगडून काढल्या. आणि मग एक कल्पनेचा कुंचला हळूच मनात नवे रंग भरून गेला..."रुपाली ,तुझाही असा ब्लॉग बनू शकतो.... कवितांचा... ज्या गेली कित्येक वर्षे एका जुन्या वहीत बंदिस्त झाल्या आहेत... त्यांना पुन्हा नव्याने बाहेर काढायला हवे... नवे रंग भरून नवे पंख मिळाले तर तेही अनेकांना आनंद देऊ शकतील आणि सोबत या उदास चेहऱ्यावर नवे हसू फुलून येईल "... माझ्या मनाला हा रंग खूप भावला... इतरांना ही कल्पना बोलूनही दाखवली... 'छान कल्पना आहे ' म्हणत पुढच्याच क्षणी या ब्लॉगचा जन्म आणि बारसे देखील लगेच झाले... 'उमटले मनी '... अचानक मनाच्या झरोक्यातून कागदावर उमटलेले सुंदर नाव...ज्यात माझ्या मनात जे जे काही येत गेले सारे सारे टिकटिक शाईने पुढे उमटत गेले.... सुरुवातीला जुन्या कवितांचा नजराणा पेश करून त्यात आनंद मानत होते.... कधीतरी एखादा लेख लिहून पाहिला... तो चांगला जमला आणि एक वेगळेच समाधान मिळाले , स्वतःचेच स्वतःला.... मग एकदा समजले , आपण लिहिलेले कोणाला तरी खरेच आवडते आहे ... आपल्या शब्दांसाठी सुद्धा दूरवर कोणीतरी आतुरले आहे... मग नव्याने विचार सुरु झाला... त्यातून कल्पनांचा इवलासा झरा गवसला...त्या कल्पनांना शब्द मिळाले आणि कवितेची नदी वाहू लागली... मनातल्या खोल गाभाऱ्यातून उगम पावून थेट कागदांवर वाहणारी...पुढे कल्पना वाढल्या पण शब्द कमी पडू लागले... मग वाचन वाढले ... वाचनातून नव्या विचारांना नव्याने पालवी फुटली... नव्या कल्पनांची फुलेच फुले जणू मनाच्या बागेत उमलली होती...त्या प्रत्येक फुलावर त्या फुलपाखराची नजर... आणि मग ते सर्वच त्या ब्लॉगच्या खेळकर फुलपाखरात सामावून गेली....आणि उडत बागडत या 'उमटले मनी' नावाच्या फुलपाखराने माझे शब्द , माझ्या कल्पना थेट सातासमुद्रापलीकडच्या ओळखी-अनोळखी मनांपर्यंत पोहोचवल्या. त्यांनाही त्या आवडू लागल्या हे विशेष. फुलपाखरू म्हणू किंवा झाड म्हणू किंवा शेकडो कथाकवितांना आपल्यामध्ये सामावून घेणारा समुद्र... माझ्यासाठी 'उमटले मनी' हा एक आरसा आहे... हो . एक असा जादुई आरसा ज्यात मला जे जे वाटते, अनुभवते ते ते सर्व कळत नकळत लेखणीतून उमटले जाते... माझ्या कल्पनांना , बंधनांना मोकळी वाटच मिळाली आहे जणू...
१ लक्ष... एक फार मोठी संख्या... अगदी कोणत्याही बाबतीत या संख्येला एक अनन्यसाधारण महत्त्व. आज तिचा स्पर्श 'उमटले मनी ' ला झाला आणि यशाची पायरी चढली, असा कुठे तरी भास झाला. पण या यशात माझ्या शब्द -कल्पनांसोबतच कितीतरी दृश्य-अदृश्य शक्तींची साथ आहे हे नाकारता येणार नाही. सर्वात मोठी शक्ती आहे ही इतकी सुंदर , रसाळ अशी माझी मातृभाषा- मराठी. या भाषेशी दोस्ती करायला लावणारी माझी मराठी शाळा... तेथील शिक्षक शिक्षिका....अश्विनी जोशी , अनिता पाटील ,शिंदे,योजना , प्रार्थना मोरे ,घोरपडे ,निरंजना साळवी,पेठे अशी कितीतरी नावे घ्यावीशी वाटतात जेव्हा या माझ्या प्रिय संग्रहाचा खरा उगम मी शोधू पाहते तेव्हा. खरेतर मी मराठी शिकले ते फक्त दहावीपर्यंतच आणि तेही या सर्व गुरूंकडून झालेल्या भाषेच्या संस्कारांमुळेच.पुढे मराठीशी पुस्तकस्वरूपी नाते म्हणजे कथा कादंबऱ्या आल्या...चित्रपट आणि मालिकांमधून मी त्या कथेचा आनंद घेण्यापेक्षा या भाषेला नव्याने आणि वेगळ्या प्रकारे अनुभवून घ्यायचे... अगदी तसेच गाण्यांसोबतही ... गाण्यांचे बोल, त्याच्यातील मतितार्थ ही एक आणखी सुंदर शाळा भाषा , शब्द , कल्पनांचे अनोखे सौन्दर्य व्यक्त करणारी आणि स्वतःला त्यातून व्यक्त होण्यास मदत करणारी...रोज घडणाऱ्या घडामोडी , नवे अनुभव ,भेटणारे नवी-जुनी माणसे ,आणि त्यासोबतच निसर्ग हे सर्व सर्व 'उमटले मनी'च्या प्रत्येक शब्दासाठी असलेली प्रेरणा आहे. ब्लॉग सुरु झाला तेव्हा अनेकांची अनेक मते... त्यातून खूप काही शिकले... प्रत्येक चांगले कार्य अखंडित चालू राहण्यासाठी लागणारे प्रोत्साहन वेळोवेळी मित्र-नाते मंडळी , ओळखी-अनोळखी वाचक या सर्वांकडून मिळत गेले आणि हा आजपर्यंतचा शब्दकल्पनांचा प्रवास सुरेख सुरु राहिला. या सर्वासाठी या सर्वांचेच मानावे तितके आभार कमीच...धन्यवाद.

- रुपाली ठोंबरे .
Congratulations Rupali
ReplyDeleteKhup khup abhinandan rupali.. great achievement, may u keep soaring higher👍
ReplyDeleteखुप सुंदर रूपाली, अभिनंदन अत्यंत प्रतिभावान आहेस तू..दशलक्ष वाचक होतील.. आशिर्वाद..
ReplyDeletecongradulation.. chan lihilay..
ReplyDeleteअभिनंदन रुपाली. आपल्यात काहीतरी प्रतिभा नक्कीच आहे आणि ती आहे याचा आपल्याला वेळीच आविष्कार झाला हेही जास्त म्हटवाचे. तेव्हाच तर तुमचा अनेकांना फायदा होतो. आजच्या युगात लेखनकला मागे पडत चालली आणि त्यावेळेस आपला लेखनाच्या क्षितिजावर उदय झाला. आपले लेखन वाचून इतरांचीही प्रतिभा चाळवेल आणि आम्हा वाचकांचे मनोरंजन घडेल. असेच लिहित रहा आणि उत्तरोत्तर यशाच्या पायऱ्या चढत रहा.
ReplyDelete